‘प्रहार’च्या पाठपुराव्यातून सौंदाळा गावाला पूर्णवेळ ग्रामसेवक गटविकास अधिकार्यांनी आंदोलन करण्यापूर्वीच केली नियुक्ती
नायक वृत्तसेवा, नेवासा
राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अभिजीत पोटे, जिल्हा कार्याध्यक्ष नवाज शेख व सौंदाळा शाखाध्यक्ष गोरक्षनाथ अरगडे यांच्या नेतृत्वाखाली सौंदाळा गावाला पूर्णवेळ ग्रामसेवक मिळावा म्हणून गटविकास अधिकारी शेखर शेलार यांना नुकतेच निवेदन देण्यात आले होते. याची दखल घेत ग्रामसेवकाची नियुक्ती करण्यात आल्याची लेखी गटविकास अधिकारी शेखर शेलार यांनी दिल्याने प्रहारचे ग्रामस्थांतून आभार व्यक्त होत आहे.
सौंदाळा गावाला त्वरीत कायमस्वरूपी ग्रामसेवकाची नेमणूक करावी. अन्यथा गटविकास अधिकार्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्याचे निवेदन 19 जुलै रोजी देण्यात आले होते. त्यानुसार 28 जुलै रोजी प्रहारच्यावतीने ठिय्या आंदोलन होणार होते. या निवेदनाची दखल घेत गटविकास अधिकारी शेलार यांनी त्वरीत सौंदाळा गावाला ग्रामसेवकाची नेमणूक करत प्रहारच्या मागण्या मान्य करत आंदोलन स्थगित करण्यासाठी पत्र दिले.
तीन वर्षांपासून सौंदाळा गावाला ग्रामसेवक नसल्याने सौंदाळा ग्रामस्थांना व गावाच्या विकासासाठी अडचणी येत होत्या. नेवासा गटविकास अधिकारी शेखर शेलार यांच्या दालनात ग्रामस्थांसह प्रहारच्या ठिय्या आंदोलनाचे निवेदन देताच आंदोलनापूर्वीच दोन दिवस आधी ग्रामसेवक नियुक्त करण्यात आले. याकामी प्रहार किसान आर्मीचे प्रमुख रघुनाथ अरगडे, जिल्हा सल्लागार अॅड. पांडुरंग अवताडे, जिल्हा संघटक ज्ञानेश्वर सांगळे, जिल्हा संघटक बाळासाहेब खर्जुले, तालुका कार्याध्यक्ष अनिल विधाटे, कामगार तालुकाध्यक्ष निवृत्ती जावळे, कामगार तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब टिळेकर, तालुका उपाध्यक्ष नागनाथ आगळे, तालुका संघटक नवनाथ कडू, तालुका सरचिटणीस जालिंदर अरगडे, सौंदळा शाखा उपाध्यक्ष अरविंद अरगडे, बंडू अरगडे, संदीप पाखरे, राजेंद्र चामुटे, बाळासाहेब ठुबे, आप्पा अरगडे, रामदास अरगडे, बाळासाहेब अरगडे, संकेत बोधक, विजय धाकतोडे व ग्रामस्थांनी पाठपुरावा केला.