बचत गटांचे कर्ज माफ करुन अनुदान द्या!
बचत गटांचे कर्ज माफ करुन अनुदान द्या!
नेवासा काँग्रेसची तहसीलदारांकडे निवेदनातून मागणी
नायक वृत्तसेवा, नेवासा
बचत गटांचे कर्ज माफ करा, त्यासाठी सरकारी अनुदान द्या अशी मागणी नेवासा तालुका काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबत तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना नुकतेच निवेदन देण्यात आले आहे.

या निवेदनात काँग्रेसने म्हंटले आहे की, मागील सहा महिन्यांच्या कोरोना संकटामुळे महिला बचत गटांचे सर्व कामे ठप्प होती. त्यामुळे कोणत्याही प्रकारची आर्थिक आवक नसल्याने बचत गट धोक्यात आलेले असून अशा परिस्थितीमध्ये अनेक मायक्रो फायनान्सर बँका आणि शासकीय बँका यांनी बचत गटांना हप्ते वसुलीसाठी जाचक प्रकिया राबवत आहे. तरी बचत गटांना दिलेले कर्ज हे माफ करुन त्यासाठी सरकारने अनुदानाची योग्य तरतूद करावी. तसेच नव्याने बचत गट उभारणीसाठी शासनाने अनुदानाच्या स्वरुपात मदत जाहीर करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

सदर निवेदन देतेवेळी काँग्रेस समितीच्या अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे, तालुकाध्यक्ष संभाजी माळवदे, जिल्हा सचिव सुदाम कदम, सेवा दलाचे अरुण सरोदे आदी काँग्रेस कार्यकर्त्यांसह महिला बचत गटाच्या मनीषा उमाप, ताराबाई लबडे, जयश्री मिसाळ, सुशीला मिसाळ, सुमन मिसाळ, मीराबाई लबडे, सुनीता लबडे, ताराबाई मिसाळ, सुरेखा मिसाळ आदी महिला उपस्थित होत्या.

