मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त संगमनेरात शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्यावतीने मेडीकव्हर हॉस्पिटलच्या सहकार्यातून मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.

a

राज्यावर कोरोनाचे संकट तसेच पूरस्थिती असल्याने यंदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढदिवस साजरा न करण्याचे आदेश शिवसैनिकांना दिले होते. त्यानुसार पूरग्रस्तांना मदत, सर्वसामान्य आणि गरजूंना मदत आणि गोरगरीब रुग्णांना वैद्यकीय मदतीकरिता विविध सामाजिक उपक्रम राज्यभरात घेण्यात आले. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे मार्गदर्शक तथा राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेनुसार राज्यात विविध ठिकाणी आरोग्य शिबिरे, महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत तपासण्या व शस्त्रक्रिया असे उपक्रम घेण्यात आले. संगमनेर शहरातील जाणता राजा मैदानानजीक असलेल्या मेहेर विद्यालयातील आरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सदर शिबिर यशस्वीतेसाठी मेडीकव्हर हॉस्पिटलचे डॉक्टर, कर्मचारी, शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी परिश्रम घेतले.

Visits: 169 Today: 1 Total: 2170127

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *