साईबाबा मंदिर सुरक्षा कर्मचार्‍यांना बॉम्ब शोधक व नाशक पथकाकडून प्रशिक्षण विविध प्रात्यक्षिके सादर करुन दिली अत्यावश्यक माहिती; अधिकार्‍यांची उपस्थिती

नायक वृत्तसेवा, शिर्डी
साईबाबा संस्थानच्या सुरक्षा कर्मचार्‍यांना मंदिर सुरक्षा म्हणून बॉम्ब शोधक व नाशक पथकामार्फत प्रशिक्षण देण्यात आले. सदर प्रशिक्षण संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांच्या उपस्थितीत पार पडले.

यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, प्रशासकीय अधिकारी डॉ. आकाश किसवे, राजेंद्र जगताप, मंदिर सुरक्षा पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, शिर्डी वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक नारायण न्याहाळदे, संरक्षण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अण्णासाहेब परदेशी, बॉम्ब शोधक व नाशक पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश घोळवे, शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास देवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दातरे, राहाता पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कंदाळे, शिर्डी नगरपंचायतचे अग्निशमन अधिकारी विलास लासुरे, प्रताप कोते, शीघ्र कृती दलाचे रक्षक, संस्थान सुरक्षा रक्षक कर्मचारी व अग्निशमनकर्मचारी उपस्थित होते.

दरम्यान, 7 जून, 2021 रोजी श्री साई मंदिर सुरक्षा आढावा बैठक घेण्यात आली होती. त्यानुसार मंदिर सुरक्षाकामी संस्थान सुरक्षा कर्मचार्‍यांना प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करावे असा निर्णय घेण्यात आला होता. त्याअनुषंगाने बुधवारी सकाळी 11 वाजता हनुमान मंदिराच्या शेजारील मैदानात बॉम्ब शोधक व नाशक पथकाकडून प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी बॉम्ब शोधक व नाशक पथकामार्फत विविध प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. विविध साहित्यांसह श्वानाद्वारे बॉम्ब कसा शोधायचा तसेच अशा परिस्थितीत कोणकोणती सुरक्षा घ्यावायची याबाबत माहिती देण्यात आली. याचबरोबर बॉम्ब शोधल्यानंतर त्याचा नाश कसा करायचा याबाबतचेही प्रात्याक्षिक दाखवून याकरिता आवश्यक साहित्यांची माहितीही दिली.

Visits: 116 Today: 1 Total: 1112415

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *