संगमनेर तालुक्यात कोविड संक्रमणाचा विस्फोट! पठारभागात शंभरावर रुग्ण आढळले; एकट्या साकूरमध्ये 64 रुग्ण..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
सावजाच्या शोधात असलेल्या कोविडला नियमांचे उल्लंघन करुन बिनधास्त वावरणार्‍यांचे घोळके सापडू लागल्याने संगमनेर तालुक्यात संक्रमणाचा पुन्हा एकदा विस्फोट झाला आहे. तब्बल दोन महिन्यानंतर तालुक्यातून दोनशेहून अधिक रुग्ण समोर आले असून सक्रीय रुग्णांच्या संख्येने रुग्णालये दाटू लागली आहेत. आज तालुक्यात जिल्ह्यातील सर्वाधीक 291 रुग्ण आढळले असून त्यात पठारभागातील 24 गावांतील 107 रुग्णांचा समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे पठारची संपन्न बाजारपेठ समजल्या जाणार्‍या साकूरमधून आज तब्बल 64 रुग्ण समोर आले आहेत. त्यामुळे तालुक्याची रुग्णसंख्या झपाट्याने पुढे सरकतांना आता 24 हजार 731 झाली आहे.


दुसर्‍या संक्रमणाला कारणीभूत ठरलेल्या चुकांकडे दुर्लक्ष करुन त्याच चुका पुन्हा होवू लागल्याने संगमनेरसह जिल्ह्यातील काही तालुके पुन्हा एकदा कोविड संक्रमणाच्या सावटाखाली आले असून त्याचा सर्वाधीक फटका संगमनेर व पारनेर या दोन तालुक्यांना बसत आहे. जिल्ह्यात सध्या तिसर्‍या श्रेणीतील निर्बंध लागू असल्याने विवाह सोहळ्यांना अधित्तम पन्नास तर अंत्यविधीसाठी अधित्तम 20 जणांच्या उपस्थितीची परवानगी आहे. मात्र या दोन्ही तालुक्यातील नागरिकांना कोविडचा विसर पडल्यासारखी स्थिती असून शेकडों जणांच्या उपस्थितीत विवाह सोहळे साजरे होत आहेत. अंत्यविधीसाठीही उपस्थितीची मर्यादा असतांना त्याकडे साफ दुर्लक्ष होत असल्याने तालुक्याच्या संक्रमणात धक्कादायक वाढ होत आहे.


आज शासकीय प्रयोगशाळेचे सतरा, खासगी प्रयोगशाळेचे 229 व रॅपीड अँटीजेनच्या निष्कर्षातून 45 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले. त्यात शहरातील 27 जणांचा तर पठारभागातील 107 जणांचा समावेश आहे. शहरातील गणेशनगर मधील 43 वर्षीय तरुण, बाजारपेठेतील 26 वर्षीय महिला, देवीगल्लीतील 34 वर्षीय महिला, संगमनेर असा पत्ता असलेल्या 79 व 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांसह 45 वर्षीय दोन इसम, 35, 28, 27, 26, 23 वर्षीय दोघे व 19 वर्षीय तरुण, 78, 45, 40 वर्षीय दोघी, 39, 35, 31, 30, 29 वर्षीय तिघी, 24 वर्षीय महिला व 21 वर्षीय तरुणीचा समावेश आहे. याशिवाय आजच्या अहवालात निमोण येथील 17 वर्षीय तरुणाचे नाव दोनवेळा नोंदविले गेले असून राहुरी तालुक्यातील गुहा येथील 55 वर्षीय महिला, पुणे जिल्ह्यातील आळेफाटा येथील 37 वर्षीय तरुण, अकोले तालुक्यातील राजूर येथील 33 वर्षीय तरुण व गणोरे येथील 27 वर्षीय महिलेचाही समावेश आहे.

याशिवाय तालुक्यातील वरुडी पठार येथील 29 वर्षीय तरुण, बोटा येथील 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 46, 42 व 40 वर्षीय महिला व 17 वर्षीय तरुण, घुलेवाडीतील 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 36, 29, 28, 26 व 18 वर्षीय तरुण, 30 व 29 वर्षीय महिला व 14 वर्षीय मुलगी, साकूर येथील 80, 70 व 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांसह 57, 55 वर्षीय दोघे, 50, 49 व 45 वर्षीय तिघे इसम, 42, 40 वर्षीय दोघे, 38, 36, 35, 30, 29 वर्षीय दोघे, 26, 25 वर्षीय दोघे, 23, 22, 21, 20 व 18 वर्षीय दोघे तरुण, 16, 15, 12, सात व सहा वर्षीय मुले, 60 वर्षीय दोन, 55, 52, 50, 49, 47 वर्षीय दोन, 40, 38 वर्षीय दोन, 37, 35 वर्षीय चार, 32, 30, 29, 25 वर्षीय दोन व 23 वर्षीय महिला, 22, 20 व 18 वर्षीय दोघी तरुणी, 14, 13 व 11 वर्षीय मुली, गुंजाळवाडी येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 55 वर्षीय इसम, 38 व 21 वर्षीय तरुण, 51 वर्षीय दोन, 49, 45, 40, 38, 30 व 29 वर्षीय महिला व 11 वर्षीय मुलगी,


सुकेवाडीतील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 58 वर्षीय दोन इसम, 69, 62, 55, 54, 50 व 36 वर्षीय महिला आणि 20 वर्षीय तरुणी, राजापूर येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 51, 49 व 48 वर्षीय इसम, 40, 39 व 36 वर्षीय तरुण आणि 14 वर्षीय मुलगा, निमोण येथील 81 वर्षीय महिलेसह 44 वर्षीय इसम व 17 आणि 15 वर्षीय मुले, पळसखेडे येथील 32 वर्षीय महिला, चिंचोली गुरव येथील 45 वर्षीय इसमासह 42, 35 व 31 वर्षीय तरुण, 45 व 30 वर्षीय महिला व 14 वर्षीय मुलगी, तळेगाव दिघे येथील 65 व 63 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांसह 55, 46 व 34 वर्षीय महिला आणि बारा वर्षीय मुलगा, चिंचपूर येथील 28 वर्षीय तरुणासह 10 वर्षीय मुलगी, निमगाव जाळीतील 65 वर्षीय महिलेसह 43 वर्षीय तरुण व 9 वर्षीय मुलगा, नांदूर येथील 55 वर्षीय इसमासह 42 वर्षीय तरुण व 22 वर्षीय तरुणी, निळवंडे येथील 50 वर्षीय इसमासह 40 वर्षीय महिला, पिंपळे येथील 70 वर्षीय ज्येष्ठासह 45 वर्षीय दोन इसम, 40 वर्षीय महिला व 20 वर्षीय तरुणी, आश्‍वी खुर्दमधील 60 वर्षीय महिलेसह 40 व 27 वर्षीय तरुण व 19 वर्षीय तरुणी, अकलापूर येथील 65, 35 व 33 वर्षीय महिला, 29 व 17 वर्षीय तरुण,


महालवाडीतील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, अंभोरे येथील 28 वर्षीय तरुणासह 21 वर्षीय तरुणी, वरवंडीतील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, दाढ बु. येथील 30 वर्षीय महिला, घारगाव येथील 16 वर्षीय मुलगा, कुरकूटवाडीतील 31 वर्षीय महिला, मोधळवाडीतील 25 वर्षीय महिला, पिंपळगाव माथा येथील 70 व 40 वर्षीय महिलेसह 50 वर्षीय इसम व 24 वर्षीय तरुण, हिवरगाव पठारावरील 35 वर्षीय महिला, बिरेवाडीतील 43 वर्षीय महिला, वेल्हाळे येथील 56 वर्षीय इसमासह 42 वर्षीय महिला व 22 वर्षीय तरुण, कौठे कमळेश्‍वर येथील 36 वर्षीय तरुण व 18 वर्षीय तरुणी, निमगाव येथील 75 वर्षीय वयोवृद्ध, जवळे कडलग येथील 74 वर्षीय वयोवृद्ध, पिंपरणे येथील 50 वर्षीय इसमासह 34 वर्षीय महिला, कुरकुंडीतील 29 वर्षीय महिला, मुंजेवाडीतील 38 व 36 वर्षीय तरुण, लोहारे येथील 23 वर्षीय तरुण, मालदाड येथील 52 वर्षीय इसमासह 32 वर्षीय तरुण, कालेवाडीतील 37 वर्षीय तरुणासह 35 वर्षीय महिला, माळेगाव हवेली येथील 22 वर्षीय तरुण,


म्हसवंडी येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 50 वर्षीय इसम व 45 वर्षीय महिला, कासारा दुमाला येथील 85 वर्षीय वयोवृद्धासह 54 वर्षीय इसम, धांदरफळ खुर्द येथील 23 वर्षीय दोन महिला, वडझरी खुर्द येथील 47 वर्षीय इसम, हिवरगाव पावसा येथील 65 व 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांसह 61 वर्षीय महिला, 21 वर्षीय तरुण व 10 वर्षीय मुलगा, हंगेवाडीतील 58 वर्षीय इसम, जांबुत खुर्दमधील 48 वर्षीय महिलेसह 30 वर्षीय तरुण, सोनेवाडीतील 40 वर्षीय महिला, वाघापूर येथील 22 वर्षीय तरुण, रायते येथील 32 वर्षीय तरुण, 32 वर्षीय महिला व 13 वर्षीय मुलगा, खांबे येथील 28 व 18 वर्षीय तरुणासह 25 वर्षीय महिला, मल्हारवाडीतील 23 वर्षीय महिला, वडगाव लांडगा येथील 73 वर्षीय वयोवृद्धासह 23 वर्षीय महिला, आंबी खालसा येथील 33 वर्षीय तरुण, मोरेवाडीतील 39 वर्षीय महिलेसह 13 वर्षीय मुलगी, एठेवाडीतील 45 वर्षीय इसमासह 41 व 26 वर्षीय तरुण आणि 20 वर्षीय तरुणी, माळेवाडीतील 35 वर्षीय महिला, डिग्रस येथील 40 वर्षीय महिलेसह 38 वर्षीय तरुण,


शेडगाव येथील 71 व 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांसह 50 वर्षीय इसम, 25 वर्षीय महिला, 17 वर्षीय मुलगा व एक वर्षीय बालिका, मांडवे येथील 18 वर्षीय तरुण, संगमनेर खुर्द येथील 27 वर्षीय तरुण, चासकरवाडीतील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, आंबी दुमाला येथील 31 वर्षीय तरुणासह 23 वर्षीय दोन महिला, पिंपळगाव कोंझिरातील 57 वर्षीय महिला, समनापूर येथील 37 वर्षीय महिला, कोकणगाव येथील 32 वर्षीय तरुण, खळी येथील 71, 47, 45 व 35 वर्षीय महिला, 70 वर्षीय ज्येष्ठासह 51 वर्षीय इसम, 13 वर्षीय मुलगी व 11 वर्षीय मुलगा, पिंपळगाव देपा येथील 55 वर्षीय इसम, ओझर येथील 55 व 42 वर्षीय महिलांसह 40 व 21 वर्षीय दोन तरुण, बारा वर्षीय मुलगा, रहिमपूर येथील 31 वर्षीय तरुण, पानोडीतील 65 व 40 वर्षीय महिला, सावरगाव तळ येथील 47 वर्षीय महिला, निमगाव पागा येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक व निंभेरे येथील 73 वर्षीय ज्येष्ठासह 61 व 38 वर्षीय महिला अशा तालुक्यातील एकूण 286 जणांसह अन्य ठिकाणच्या पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्याची रुग्णसंख्याही आज वाढली असून आज तब्बल 1 हजार 224 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यातील तेरा जणांचा मृत्यूही झाला आहे. आजच्या अहवालातून संगमनेर तालुक्यात 291 तर पारनेर तालुक्यात 166 रुग्ण आढळले आहेत. उर्वरीत तालुक्यात कर्जत 96, जामखेड 94, नगर ग्रामीण 85, श्रीगोंदा 68, राहुरी 64, पाथर्डी व राहाता प्रत्येकी 55, नेवासा 52, शेवगाव व श्रीरामपूर प्रत्येकी 42, अकोले 40, कोपरगाव 36, महापालिका क्षेत्रातील 24, इतर जिल्ह्यातील बारा व भिंगार लष्करी परिसरातील दोघांचा त्यात समावेश आहे. आजच्या रुग्णवाढीने जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या 2 लाख 96 हजार 322 झाली असून 5 हजार 422 जणांवर उपचार सुरु आहेत. आत्तापर्यंत जिल्ह्यातील 2 लाख 84 हजार 748 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले असून 6 हजार 152 जणांचा कोविडने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा सरासरी रुग्ण बरे होण्याचा दर 96.09 टक्के आहे. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यातील तेरा जणांचा बळी गेला आहे.

Visits: 164 Today: 2 Total: 1106113

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *