संगमनेर तालुक्याच्या कोविड संक्रमणात चिंताजनक वाढ! पठारभागातील संक्रमणाची गती आजही वाढली; तालुक्यातील मृतांचा आकडाही चारशेजवळ..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या बुधवारपासून जिल्ह्यातील काही तालुक्यांसह संगमनेर तालुक्याच्या सरासरी रुग्णगतीत वाढ झाली असून वाढत्या रुग्णसंख्येने तालुक्याच्या चिंताही वाढवल्या आहेत. मागील अवघ्या सात दिवसांत तालुक्याची सरासरी रुग्णगती दैनिक चाळीसवरुन थेट 55 रुग्णांवर गेली असून गेल्या सात दिवसांचा सरासरी वेग तब्बल 82 रुग्ण प्रति दिवस झाला आहे. काही नागरिकांचा हलगर्जीपणा आणि प्रशासनाचे सोयीस्कर दुर्लक्ष यातून ग्रामीणभागातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून पठारभागातील अवस्था चिंताजनक स्थितीकडे सरकू लागली आहे. आजही जिल्ह्यातील सर्वाधीक 108 रुग्ण संगमनेर तालुक्यातील 47 गावांमधून समोर आले असून त्यात पठारावरील 17 गावांतील तब्बल पन्नास जणांचा समावेश आहे. सद्यस्थितीत तालुक्यातील सक्रीय रुग्णांची संख्या पाचशेच्या घरात गेली असून एकूण रुग्णसंख्येने चोवीस हजारांचा टप्पाही ओलांडला आहे तर आजअखेर शासकीय नोंदीनुसार तालुक्यातील 394 जणांचा जीवही गेला आहे.


मागील सात दिवसांपासून जिल्ह्यातील चौदा तालुक्यांमध्ये रुग्णसंख्येचा चढ-उतार बघायला मिळत आहे. आजच्या अहवालातूनही सोमवारच्या तुलनेत संगमनेर (+90), जामखेड (+32) व नगर ग्रामीणसह (19) पाथर्डी, राहाता व अकोले तालुक्यातील रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. तर नेवासा (-15) व शेवगावसह (-13) श्रीगोंदा, कोपरगाव, महापालिका क्षेत्र, पारनेर, कर्जत व श्रीरामपूर तालुक्यातून समोर येणार्‍या रुग्णांमध्ये किरकोळ घसरण झाली आहे. राहुरी तालुक्यातील रुग्णसंख्या मात्र आज स्थिर राहीली. आजही जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या पाचशेच्या पुढे असून शासकीय प्रयोगशाळेच्या 63, खासगी प्रयोगशाळेच्या 206 व रॅपीड अँटीजेनच्या 298 निष्कर्षांमधून जिल्ह्यातील 567 जणांना कोविडची लागण झाल्याचे समोर आले आहे.


आज संगमनेर तालुक्याच्या रुग्णसंख्येत सोमवारच्या तुलनेत धक्कादायक वाढ झाली असून शासकीय प्रयोगशाळेचे 31, खासगी प्रयोगशाळेचे 38 व रॅपीड अँटीजेनच्या 39 अहवालांमधून तालुक्यातील 108 जणांना संक्रमण झाले आहे. आजही तालुक्याच्या पठारभागातील संक्रमण भरात असल्याचे दिसून आले असून बाधित समोर आलेल्या 47 पैकी पठारभागातील 17 गावांमधून तब्बल पन्नास रुग्ण समोर आले आहेत. आजच्या अहवालातून रुग्णगती वाढली असली तरीही शहरातील रुग्णसंख्या मात्र नियंत्रणात असल्याचे दिसत असून आज शहरातील केवळ नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात शहरातील भारतनगर परिसरातील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, मालदाड रोडवरील सात वर्षीय मुलगा, गोविंद नगरमधील 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, कुंथुनाथ सोसायटीतील 25 वर्षीय महिला व संगमनेर असा पत्ता असलेल्या 50 वर्षीय इसमासह 46 वर्षीय महिला, 38 वर्षीय तरुण, 21 वर्षीय तरुणी व 16 वर्षीय मुलाचा त्यात समावेश आहे.


तालुक्याच्या पठारभागात आजही मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळले असून त्यात एकट्या साकूर परिसरातील सतरा रुग्णांचा समावेश आहे. आजच्या अहवालातून साकूर येथील 76 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 50 वर्षीय इसम, 39 वर्षीय तरुण, 74, 60 वर्षीय दोन, 42, 40 व 35 वर्षीय तीन महिला, 15 व 11 वर्षीय मुले, 14 व 10 वर्षीय मुली, चिंचेवाडी येथील 24 वर्षीय महिला, बिरेवाडी येथील 29 वर्षीय तरुण, घारगाव येथील 52 वर्षीय महिला, शिंदोडी येथील 58 व 55 वर्षीय इसम, हिवरगाव पठार येथील 34 वर्षीय तरुणासह 23 वर्षीय महिला व सहा वर्षीय मुलगा, पिंपळदरा येथील 46 वर्षीय महिला, म्हसवंडी येथील 49 वर्षीय इसम, माहुली येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 12 वर्षीय मुलगा, माळेवाडीतील 40 वर्षीय तरुण, आभाळवाडीतील 76 वर्षीय महिला, बोटा येथील 78 व 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांसह 32 व 33 वर्षीय तरुण, 70, 35 व 26 वर्षीय महिलांसह 17 वर्षीय तरुणी व चार वर्षीय मुलगा, डोळासणे येथील 55 वर्षीय इसम,


खंदरमाळ येथील 21 वर्षीय तरुणासह 16 वर्षीय मुलगी, वरवंडी येथील 45 वर्षीय इसम, कुरकूटवाडी येथील 74 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 48 व 45 वर्षीय इसम, 65 व 36 वर्षीय महिला, कोठे येथील 50 वर्षीय इसम, आंबी दुमाला येथील 52 व 29 वर्षीय महिलांसह 22 वर्षीय तरुणी, पानोडी येथील 46, 29 व 25 वर्षीय महिला, सावरचोळ येथील 59 वर्षीय इसम, धांदरफळ बु. येथील 41 वर्षीय तरुण, लोहारे येथील 42 व 39 वर्षीय तरुण, खांजापूर येथील 55 वर्षीय महिला, घुलेवाडीतील 40 वर्षीय तरुणासह 26 वर्षीय महिला, 20 वर्षीय दोन तरुणी, तीन व एक वर्षीय बालिका, पिंपळगाव माथा येथील 80 वर्षीय महिला, शिरसगाव धुपे येथील 40 वर्षीय तरुणासह 32 वर्षीय महिला, ओझर खुर्दमधील 35 वर्षीय तरुणासह 17 वर्षीय तरुणी, आश्‍वी खुर्दमधील 25 व 18 वर्षीय तरुण, पिंपरी येथील 30 वर्षीय तरुणासह 10 वर्षीय मुलगी,


डिग्रस येथील 46 वर्षीय महिला, उंबरी बाळापूर येथील 22 वर्षीय तरुणी, शेडागाव येथील 65 वर्षीय महिला, चिंचपूर येथील 40 वर्षीय महिला, निंभाळे येथील 37 व 30 वर्षीय तरुणांसह 16 वर्षीय मुलगी व 13 वर्षीय मुलगा, पळसखेडे येथील 34 वर्षीय तरुण, कोकणगाव येथील 68 वर्षीय महिला, कोल्हेवाडीतील 55 वर्षीय इसम, कनोली येथील 71 वर्षीय महिला, कासारा दुमाला येथील 48 वर्षीय इसम, शिबलापूर येथील 82 वर्षीय वयोवृद्ध नागरिक, धांदरफळ खुर्द येथील 19 वर्षीय तरुण, निमगाव टेंभी येथील 34 वर्षीय तरुण, पेमगिरीतील 45 वर्षीय महिला, रहाणेमळा (गुंजाळवाडी) येथील 50 वर्षीय महिला, निमगाव जाळीतील 31 वर्षीय महिला, चिंचोली गुरव येथील 80 वर्षीय वयोवृद्ध नागरिकासह 45 वर्षीय इसम, 22 वर्षीय तरुणी, 14 वर्षीय मुलगी व बारा वर्षीय मुलगा व चिकणी येथील 32 वर्षीय तरुणाचा त्यात समावेश आहे. आजच्या रुग्णवाढीने तालुक्याची एकूण रुग्णसंख्या आता 24 हजार 61 झाली असून सक्रीय रुग्णांची संख्या पाचशेच्या घरात गेली आहे. शासकीय नोंदीनुसार आत्तापर्यंत तालुक्यातील 394 रुग्णांचा कोविडने बळी घेतला आहे.

अपवाद वगळता गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या पाचशेचा टप्पा ओलांडून पुढे गेली असून आजही त्यात सातत्य कायम आहे. पाच दिवसांपूर्वी जिल्ह्यात दैनिक रुग्ण समोर येण्याची सरासरी 466 होती, मात्र मागील पाच दिवसांच्या वाढीने त्यात मोठा बदल केला असून आजच्या स्थितीत जिल्ह्यातून दररोज सरासरी 497 रुग्ण समोर येवू लागले आहेत. आजच्या अहवालातून संगमनेर तालुक्यात सर्वाधीक 108 रुग्ण समोर आले आहेत. त्या खालोखाल जामखेड 88, पारनेर 77, कर्जत व पाथर्डी प्रत्येकी 47, शेवगाव 30, नगर ग्रामीण व श्रीगोंदा प्रत्येकी 25, नेवासा 24, कोपरगाव 20, श्रीरामपूर 18, राहाता व राहुरी प्रत्येकी 16, अकोले 13, अहमदनगर महापालिका क्षेत्र सात व इतर जिल्ह्यातील सहा जणांचा त्यात समावेश आहे. आजच्या रुग्णवाढीने जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या 2 लाख 89 हजार 820 झाली असून कालपर्यंत जिल्ह्यातील 6 हजार 43 जणांचा मृत्यू झाला आहे. आजच्या स्थितीत जिल्ह्यात 3 हजार 800 सक्रीय रुग्ण आहेत.

Visits: 161 Today: 1 Total: 1102004

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *