संगमनेर तालुक्याच्या ‘पठारभागात’ कोविड संक्रमणाचा उद्रेक! एकट्या साकुरमध्ये एकाच दिवशी बत्तीस रुग्ण; तालुक्यातील एकोणपन्नास गावांतील सव्वाशे बाधित..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून जवळपास परतीच्या मार्गाला लागलेली कोविड संक्रमणाची दुसरी लाट तालुक्यातील काही नागरिकांच्या हलगर्जीपणासह प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पुन्हा परतू लागल्याचे चिंताजनक चित्र तालुक्यात दिसू लागले आहे. शनिवारी 97 जणांचे उच्चांकी अहवाल प्राप्त झाल्यानंतर आज सलग दुसऱ्या दिवशीही तालुक्यातील 49 गावांमधून तब्बल 117 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे तालुक्याच्या पठार भागात संक्रमणाची गती अतिशय गंभीर झाली असून अवघ्या 24 तासांतच पठार भागातून तब्बल शंभर रुग्ण समोर आले आहेत. आजच्या अहवालांमधून एकट्या साकुरमधील बत्तीस जणांना कोविडची लागण झाली आहे. ही संख्या जिल्ह्यातील आजच्या दहाव्या क्रमांकावरील तालुक्याची नोंदविली गेली आहे. आजच्या तिहेरी संख्येतील रुग्णवाढीने संगमनेर तालुका आता 24 हजार रुग्णसंख्येच्या जवळ जात 23 हजार 925 रुग्णसंख्येवर पोहोचला आहे. तालुक्यातून आत्तापर्यंत शासकीय नोंदीनुसार 387 जणांचे बळी गेले आहेत. तर अनधिकृत माहितीनुसार गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत संक्रमणातून तालुक्यातील जवळपास दीड हजाराहून अधिक जणांचे जीव गेले आहेत. इतका भयानक कालखंड भोगूनही नागरिकांमध्ये अद्यापही कोविडच्या भयाने जागा केलेली नसल्याने तालुक्यात पुन्हा एकदा धुमधडाक्यात विवाह सोहळे साजरे होऊ लागले असून साकुरच्या माध्यमातून त्याची प्रचिती मिळाली आहे.

पहिल्या लाटे नंतर संपूर्ण देशालाच कोविडच विसर पडल्याने देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये निवडणुकांचे बार उडवले गेले. हजारोंच्या उपस्थितीत झालेल्या राजकीय सभा,
कार्यकर्त्यांचे मेळावे, बैठका, मतदान प्रक्रिया आणि निकाल यातून सर्वसामान्यांपर्यंत कोविड संपल्याचा संदेश गेला. त्याची परिणीती खोळंबलेले विवाह सोहळे धूमधडाक्यात साजरे होऊ लागले. शेकडो पाहुणे मंडळींची उपस्थिती आणि जेवणावळीमूळे कोविडला मुक्त संचार करण्यास आयती संधी मिळाली. त्याचा परिणाम मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांमध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये दोन लाखाहून अधिक तर, संगमनेर तालुक्यात अठरा हजाराहून अधिक जणांना कोविडचे संक्रमण झाले. अनेक निष्पाप नागरिकांचे केवळ ऑक्सिजन उपलब्ध न झाल्याने रुग्णालयांच्या बाहेरच तडफडून जीव गेले. एक काळ तर असा होता की, आसपासच्या जिल्ह्यांमध्ये देखील ऑक्सिजनची सुविधा असलेल्या खाटा उपलब्ध होत नव्हत्या. या सर्व गोष्टी देशातील प्रत्येक नागरिकाने खूप जवळून पाहिल्या आणि अनुभवल्या आहेत. मात्र तरीही त्यातून कोणीही बोध घ्यायला तयार नसल्याचे चिंताजनक दृष्य आता पुन्हा दिसू लागले आहे.
कार्यकर्त्यांचे मेळावे, बैठका, मतदान प्रक्रिया आणि निकाल यातून सर्वसामान्यांपर्यंत कोविड संपल्याचा संदेश गेला. त्याची परिणीती खोळंबलेले विवाह सोहळे धूमधडाक्यात साजरे होऊ लागले. शेकडो पाहुणे मंडळींची उपस्थिती आणि जेवणावळीमूळे कोविडला मुक्त संचार करण्यास आयती संधी मिळाली. त्याचा परिणाम मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांमध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये दोन लाखाहून अधिक तर, संगमनेर तालुक्यात अठरा हजाराहून अधिक जणांना कोविडचे संक्रमण झाले. अनेक निष्पाप नागरिकांचे केवळ ऑक्सिजन उपलब्ध न झाल्याने रुग्णालयांच्या बाहेरच तडफडून जीव गेले. एक काळ तर असा होता की, आसपासच्या जिल्ह्यांमध्ये देखील ऑक्सिजनची सुविधा असलेल्या खाटा उपलब्ध होत नव्हत्या. या सर्व गोष्टी देशातील प्रत्येक नागरिकाने खूप जवळून पाहिल्या आणि अनुभवल्या आहेत. मात्र तरीही त्यातून कोणीही बोध घ्यायला तयार नसल्याचे चिंताजनक दृष्य आता पुन्हा दिसू लागले आहे.
सरत्या आठवड्याच्या शेवटी संक्रमणाच्या बाबतीत जिल्ह्यात चौथ्या क्रमांकावर असलेला संगमनेर तालुका शनिवारी 97 रुग्णसंख्येसह उसळी घेत थेट दुसर्या स्थानावर आला. आज तर त्यावरही कहर करीत तालुक्याने संक्रमणाच्या बाबतीत जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकाविला आहे. विशेष म्हणजे आज प्राप्त झालेले सर्व अहवाल खासगी प्रयोगशाळा आणि रॅपिड अँटीजेन चाचणीचे आहेत. शासकीय प्रयोगशाळेकडून आज एकही अहवाल प्राप्त झाला नाही. यातही ठळक बाब म्हणजे आज जिल्ह्यात केवळ संगमनेर तालुक्यात तीन आकडी संख्येत म्हणजे एकशे एकोणावीस रुग्ण समोर आले आहेत. संगमनेरच्या खालोखाल पाथर्डी तालुक्यात 80 रुग्ण आढळले आहेत.

आज शासकीय प्रयोगशाळेकडून एकही अहवाल प्राप्त झाला नाही. खासगी प्रयोगशाळेचे 97 व रॅपिड अँटीजेन चाचणीद्वारा समोर आलेल्या 22 निष्कर्षातून तालुक्यातील 119 जणांना कोविडची बाधा झाल्याचे आज समोर आले. शनिवारी तालुक्याच्या पठार भागातून 47 रुग्ण समोर आले होते. त्यात सतरा रुग्ण एकट्या साकुर परिसरातील होते. आजही पठार भागातील तेरा गावांमधून तब्बल 54 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात एकट्या साकुर परिसरातील 32 रुग्णांचा समावेश आहे. गेल्या दोन दिवसात पठार भागातून तब्बल शंभर जणांचे अहवाल पॉझिटिव प्राप्त झाले आहेत. यावरुन पठार भागात कोविड नियमांचे उल्लंघन होऊन मोठ्या प्रमाणात विवाह सोहळा साजरे होत असल्याचे उघड आहे. मात्र आपले हितसंबंध जोपासण्यासाठी कारवाई करणाऱ्यांनी डोळ्यावर हात ठेवल्याने हा हलगर्जीपणा आता संक्रमणाची परतलेली लाट पुन्हा माघारी बोलवण्यासाठी कारणीभूत ठरत आहे.

आज प्राप्त झालेल्या एकूण एकशे एकोणावीस जणांमध्ये दोन रुग्णांची नावे दुबार आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात तालुक्यातील 117 जणांना कोविडची लागण झाली आहे. त्यात शहरातील सहा जणांचा समावेश आहे. शहरातील स्वातंत्र्य चौक परिसरातील 67 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, जोर्वे रोड परिसरातील 45 वर्षीय इसमासह 38 वर्षीय महिला, नवीन नगर रस्त्यावरील 41 वर्षीय तरुण, जनतानगर मधील 49 वर्षीय महिला व संगमनेर असा पत्ता असलेल्या 18 वर्षीय तरुणाचा त्यात समावेश आहे. तालुक्यातील 49 गावातील एकशे अकरा जणांना आज कोविडचे संक्रमण झाल्याचे समोर आले. यात कोविड मुक्त झालेल्या गावांचाही समावेश आहे. पठारभागात संक्रमणाचा जोर वाढल्याचे आजच्या अहवालात दिसून आले. आज एकट्या साकुर परिसरातून तब्बल बत्तीस जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात विस पुरुष आणि बारा महिलांचा समावेश आहे.

साकुर येथील 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 56, 55, 53, 52, 51, 50, 48 व 45 वर्षीय इसमांंसह 42, 41, 37, 32, 31, 25, 23, 22, 21 व 18 वर्षीय तरुण, नऊ वर्षीय मुलगा संक्रमित झाला आहे. पठार भागातील अन्य गावांमध्ये माहुली येथील 35 व 25 वर्षीय महिला, जवळेबाळेश्वर येथील 55 वर्षीय इसम, म्हसवंडी येथील 48 वर्षीय इसमासह 40 वर्षीय तरुण, बोटा येथील 80 वर्षीय वयोवृद्ध इसमासह 44, 40, 36 व 24 वर्षीय महिला, सात वर्षीय मुलगा व चार वर्षीय मुलगी, जांबुत खुर्द येथील 73 वर्षीय महिला, खंदरमाळ येथील 90 वर्षीय वयोवृद्ध महिलेसह 65 वर्षे ज्येष्ठ नागरिक व 32 वर्षीय तरुण, कुरकुंडी येथील 50 वर्षीय महिला, शिंदोडी येथील 29 वर्षीय तरुण, मोधळवाडी येथील 70 वर्षीय महिला, बिरेवाडी येथील तीन वर्षीय बालिका, कुंभारवाडी येथील 56 वर्षीय महिला व आंबी दुमाला येथील 55 वर्षीय इसम अशा पठारावरील तेरा गावातील एकूण 54 जणांना कोविडचे संक्रमण झाले आहे.

याशिवाय तालुक्याच्या अन्य भागातील 37 गावांमध्येही आज रुग्ण आढळून आले. त्यात वाघापूर येथील तीस वर्षीय तरुण, 30 व 28 वर्षीय महिला, मालदाड येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, पेमगिरी येथील 78 वर्षीय महिला, दाढ खुर्द येथील 31 वर्षीय तरुण, चंदनापुरी येथील 46 वर्षीय महिलेसह 31 वर्षीय तरुण, आश्वी खुर्द येथील 35 वर्षीय महिला, धांदरफळ खुर्द येथील 29 वर्षीय महिला, निळवंडेतील 36 व 23 वर्षीय तरुणांसह 21 वर्षीय तरुणी, चिंचपूर येथील 65 वर्षीय महिलेसह 48 वर्षीय इसम, अंभोरे 22 वर्षीय तरुण, पोखरी हवेली येथील 70 वर्षीय महिला, पानोडी येथील 55 वर्षीय इसमासह 39 व 38 वर्षीय तरुण, 16 वर्षीय मुलगा व अठरा वर्षीय तरुणी, वडगाव पान येथील 45 वर्षीय इसम, रहिमपूर येशील 37 व 36 वर्षीय तरुणांसह 27 वर्षीय महिला, झरेकाठी येथील 45 वर्षीय महिला, कोळवाडा येथील 52 वर्षीय इसमासह 48 वर्षीय महिला, 27 व 23 वर्षीय तरुण, ओझर खुर्द येथील 35 वर्षीय तरुण,

निमज येथील 74 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 35 वर्षीय तरुण, सुकेवाडी येथील 20 वर्षीय तरुणी, धांदरफळ बुद्रुक येथील 27 वर्षीय तरुण, वडगाव लांडगा येथील 22 वर्षीय तरुण, जाखुरी येथील 40 वर्षीय महिला, खांडगाव येथील 48 वर्षीय इसम, गुंजाळवाडी येथील 26 वर्षीय महिला, जोर्वे येथील 65 वर्षीय महिला, तळेगाव दिघे येथील 50 वर्षीय महिला, सोनोशी येथील 55 वर्षीय इसम, घुलेवाडी येथील 45 वर्षीय इसमासह एकोणावीस वर्षीय तरुण, पिंपळगाव माथा येथील 39 वर्षीय तरुण, कोल्हेवाडी येथील 36 वर्षीय महिला, वेल्हाळे येथील 53 इसम, पिंपरी येथील पन्नास वर्षीय इसमासह 33 वर्षीय तरुण, 45 व 26 वर्षीय महिला आणि 20 वर्षीय तरुणी, आश्वी बुद्रुक येथील 38 वर्षीय महिला, उंबरी बाळापूर येथील 52 वर्षीय महिला, डिग्रस येथील 65 वर्षीय महिला व शिबलापुर येथील एकोणावीस वर्षीय तरुण अशा तालुक्यातील एकूण 117 जणांचे अहवाल आज पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्यामुळे तालुक्याची एकूण रुग्णसंख्या आता 23 हजार 925 झाली आहे. तालुक्यात वाढत असलेले संक्रमण चिंतेचा विषय असून वेळीच यावर नियंत्रण आणण्याची गरज आहे. काही नागरीकांचा नियमांकडे दुर्लक्ष करुन सुरु असलेला मनसोक्तपणा दुसऱ्या संक्रमणाच्या कटू आठवणी जाग्या करणारा ठरत आहे. त्यामुळे समाजासह प्रशासनानेही कठोर भूमिका घेण्याची गरज आहे. अन्यथा पुन्हा एकदा कडकडीत लॉकडाऊनचा सामना करावा लागू शकतो.

गेल्या सोळा महिन्यांच्या कालावधीत आपण सर्वांनीच कोविडची भयानकता अनुभवली आहे. आपण किंवा आपल्या खूप जवळच्या परिचयातील अनेकजणांना कोविडची लागण झाली. बहुतेकजण त्यातून सावरले. दुर्दैवाने आपण अशा अनेक जणांना या महामारीच्या फटक्यात गमावले आहे. जगातल्या प्रत्येक नागरिकाने गेल्या पंधरा महिन्यांंमध्ये आपल्या परियातील कोणालातरी गमावले आहे. तरीही आपण त्यातून कोणतीही शिकवण घेत नसल्याचेच दिसून येते. दोन दिवसांपूर्वी नेहरु चौकातील एका मोठ्या कापड दुकानात तब्बल साडेतीनशे तेे चारशे ग्राहकांची गर्दी आढळून आली. संबंधितावर याप्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात आली. पालिकेने दंंड तर वसूल केला मात्र, यातूूून संबंधित व्यापारी आणि त्याच्या दुकानात इतक्या मोठ्या संख्येने गर्दी करणाऱ्या ग्राहकांची कोविडच्याप्रति अनास्थाच दिसून आली.

Visits: 198 Today: 1 Total: 1418988
