दर्शन मेडीकल शॉपीचा मंगळवारी शुभारंभ

नायक वृत्तसेवा, संगमनेर
अल्पावधीतच तत्पर सेवा देत असंख्य ग्राहकांचा विश्वास संपादन करणार्‍या दर्शन मेडीकल शॉपीच्या दुसर्‍या शाखेचा मंगळवारी (ता.20) आषाढी एकादशीनिमित्ताने शुभारंभ होणार आहे. संध्याकाळी 6 वाजता कोल्हार-घोटी राज्यमार्गानजीक असलेल्या दौलत पेट्रोल पंपासमोर होणार आहे.

या शुभारंभ प्रसंगी आमदार डॉ. सुधीर तांबे, सहकारमहर्षी थोरात कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, उपाध्यक्ष संतोष हासे, जिल्हा परिषद सदस्य आर. एम. कातोरे, पंचायत समितीचे उपसभापती नवनाथ अरगडे, पंचायत समिती सदस्या सुनीता कानवडे, अकोले ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय घोगरे, कासारवाडीचे सरपंच राजेंद्र त्रिभुवन, भोलेनाथ दूध संस्थेचे अध्यक्ष शिवाजी घुले आदी उपस्थित राहणार आहेत. तरी या शुभारंभवेळी ग्राहक व हितचिंतकांनी उपस्थित रहावे असे आवाहन मेडीकल शॉपीचे संचालक अमोल गुंजाळ व प्रवीण गोपाळे यांनी केले आहे.

Visits: 163 Today: 1 Total: 2165166

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *