तालुक्याने ओलांडले बाधितांचे एकविसावे शतक! शहरासह तालुक्यात आजही आढळले 72 संक्रमित रुग्ण

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या 26 ऑगस्टपासून संगमनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोविड रुग्णांची भर पडण्याची सुरु झालेली श्रृंखला आजही कायम आहे. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण समोर येत असल्याने तालुक्याने आज बाधितांचे 21 वे शतकही ओलांडले आहे. आजही शासकीय व खासगी प्रयोगशाळेसह रॅपिड अँटीजेन चाचणीच्या निष्कर्षातून तालुक्याच्या रुग्णसंख्येत 72 रुग्णांची भर पडली आहे. आजच्याही एकुण बाधितांमध्ये शहरातील केवळ 11 रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील रुग्णसंख्या आता ओहोटीला लागल्याचे समजण्यास वाव आहे.

आज खासगी प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेल्या नऊ जणांच्या अहवालातून शहरातील मोमीनपुरा येथील 43 वर्षीय तरुण, नवीन नगर रोड परिसरातील 64 वर्षीय इसमासह 31 वर्षीय तरुण, बाजारपेठेतील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, मालदाड येथील 52 वर्षीय इसमासह 51 वर्षीय महिला, घुलेवाडीतील 50 वर्षीय महिला, चिखलीतील 54 वर्षीय महिला व कौठे धांदरफळ मधील 48 वर्षीय इसमाचा अहवाल पॉझिटिव आला आहे. त्यासोबतच रॅपिड अँटीजेन चाचणीतून 21 जणांचे अहवाल पॉझिटिव आले असून त्यात सर्वच्या सर्व रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. या अहवालातून कवठे मलकापूर येथेही कोविडचा विषाणू पोहोचला असून तेथील 61 वर्षीय इसमासह 32 वर्षीय तरुण,

चंदनापुरी येथील 43 व 39 वर्षीय तरुणांसह 42 व 19 वर्षीय महिला, सुकेवाडीतील 36 वर्षीय महिला, धांदरफळ खुर्द मधील 41 वर्षीय महिला, कौठे धांदरफळ मधील 49 वर्षीय महिला, वडगाव पान मधील 68 वर्षीय इसम, कोल्हेवाडील 10 वर्षीय बालक व पाच वर्षीय बालिका, आश्वी खुर्द परिसरातील 65 ते 42 वर्षीय महिला, चनेगाव मधील 27 वर्षीय महिला, देवकौठे येथील 36 वर्षीय तरुण, घुलेवाडीतील 60 व 58 वर्षीय महिलांसह 42 वर्षीय तरुण, मंगळापुर मधील 40 व 26 वर्षीय महिला आदींचा समावेश आहे.

यासोबतच आज शासकीय प्रयोगशाळेच्या अहवालातून 42 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यातून शहरातील सात जणांसह तालुक्यातील 35 जण संक्रमित असल्याचे समोर आले आहे. त्यात शहरातील मालदाड रोड परिसरातील तीस वर्षीय तरुण, इंदिरानगर परिसरातील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांसह 54 वर्षीय महिला, माळीवाडा परिसरातील 20 व 19 वर्षीय तरुणी, स्वामी समर्थ नगर परिसरातील 31 वर्षीय महिलेसह सात वर्षीय बालक संक्रमित झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

तर तालुक्यातील चिंचपूर येथील 90 वर्षीय वयोवृद्धासह 16 वर्षीय तरुणी, चिंचोली गुरव येथील 52 वर्षीय इसम, कनोली येथील 40 वर्षीय महिला, रहिमपुर येथील 40 वर्षीय तरुण, मनोली येथील 27 व 25 वर्षीय तरुणांसह 27 वर्षीय महिला, निमगाव जाळी येथील 41 वर्षीय तरुण, चिखलीतील 58 व 48 वर्षीय इसमासह 16 व 18 वर्षीय तरुण, तसेच 40 व 21 वर्षीय महिला, खराडी येथील 50 व 45 वर्षीय महिलांसह 17 वर्षीय तरुण, जांबुत खुर्द येथील 49 वर्षीय इसम, कुरकुटवाडी येथील 38 वर्षीय महिला, चंदनापुरीतील 35 वर्षीय महिला कालेवाडी येथील 44 वर्षीय महिला, हिवरगाव पठार येथील 48 वर्षीय महिला,

चिकणी येथील 34 वर्षीय तरुण, साकुर येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांसह 48 वर्षीय महिला, घुलेवाडीतील 42 वर्षीय महिलेसह 29 वर्षीय तरुण, देवगाव येथील 48 वर्षीय इसम व वाघापूर येथील 27 वर्षीय तरुण आदी 42 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. शासकीय व खासगीप्रयोग शाळेसह रॅपिड अँटीजेन चाचणी द्वारा तालुक्याच्या रूग्ण संख्येत आजही तब्बल 72 रुग्णांची भर पडल्याने तालुक्याची रुग्णसंख्येने बाधितांचे एकविसावे शतक ओलांडून 2 हजार 157 चा आकडा गाठला आहे.

ऑगस्टच्या शेवटच्या दहा दिवसांमध्ये सुरु झालेल्या रुग्णवाढीचा सिलसिला सप्टेंबरने पहिल्या दिवसांपासूनच स्विकारला, धक्कादायक बाब म्हणजे या महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच कोविड बळी जाण्यासही सुरुवात झाली. या महिन्याच्या पहिल्या तारखेपासून दृष्टीक्षेप टाकला असता 1 सप्टेंबररोजी माळीवाड्यातील 70 वर्षीय इसमाच्या मृत्युसह 42 रुग्णांची भर, 2 सप्टेंबर रोजी समनापूर येथील 62 वर्षीय इसमाच्या मृत्युसह 37 रुग्णांची भर, 3 सप्टेंबररोजी मालदाड येथील 35 वर्षीय तरुणासह 16 रुग्णांची भर, 4 सप्टेंबररोजी 80 रुग्णांची विक्रमी भर, 5 सप्टेंबररोजी चंदनापूरी येथील 39 वर्षीय तरुणाच्या मृत्युसह 66 रुग्णांची भर, 6 सप्टेंबररोजी गिरीराजनगरमधील 59 वर्षीय इसम, चिखलीतील 76 वर्षीय महिला, घुलेवाडीतील 80 वर्षीय इसम व शहरातील पंपींग स्टेशनजवळील 73 वर्षीय महिला अशा एकुण चार जणांचे बळी जावून रुग्णसंख्येत 41 बाधितांची वाढ झाली, सोमवारी 52 रुग्णांची, मंगळवारी 30 रुग्णांची तर आज पुन्हा एकदा विक्रमी 72 रुग्णांची भर पडली.

संगमनेर शहरासह तालुक्यातील विविध गावांमधून काल पर्यंत 8 हजार 150 जणांची स्त्राव चाचणी करण्यात आली आहे. त्यातील 3 हजार 399 शासकीय प्रयोगशाळेकडून, 3 हजार 314 रॅपिड अँटीजेन चाचणीतून तर 1 हजार 237 खासगी प्रयोगशाळेकडून तपासण्यात आले आहेत. तालुक्यातील चाचणी केलेल्या एकुण संशयितातून संक्रमित अहवाल येण्याचे प्रमाण 25.55 टक्के आहे. सद्यस्थितीत तालुक्याची रुग्णसंख्या 2 हजार 157 765 असून त्यात 776 रुग्ण शहरातील तर 1 हजार 381 रुग्ण ग्रामीणभागातील आहेत. आजच्या स्थितीत तालुक्यात प्रती दिवस 48.44 या दराने रुग्णवाढ होत आहे. तर ऑगस्टमध्ये सात जणांचा मृत्यु होवूनही सरासरी दर 1.51 टक्के होता, आजच्या स्थितीत गेल्या आठ दिवसांत दररोज एक मृत्यु होवूनही तो 1.44 टक्क्यांवर आला आहे.

