बायोडिझेल डीलर असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी धुमाळ

बायोडिझेल डीलर असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी धुमाळ
नायक वृत्तसेवा, अकोले
बायोडिझेल डीलर महाराष्ट्र राज्य असोसिएशनचे अध्यक्षपदी रतन देवरे तर उपाध्यक्षपदी प्रवीण धुमाळ यांची निवड करण्यात आली आहे. तर कायदेशीर सल्लागार म्हणून अ‍ॅड के. डी. धुमाळ यांची नेमणूक करण्यात आली आहे.


अकोले तालुक्यातील वीरगाव येथे महाराष्ट्र राज्यातील बायोडिझेल डीलर यांची बैठक संपन्न झाली. यावेळी राज्यातील सर्व डीलर यांची संघटना स्थापन करण्याचा ठराव संमत झाला. त्यात कार्यकारिणी निवडण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी रतन देवरे, उपाध्यक्ष प्रवीण धुमाळ, अशोक नागोटे, किशोर साळुंके, सचिव योगेश पाटील, सहसचिव शांतीलाल पवार, सदस्य हरीष अहिरे, जगदीश निकम, गणेश रायसोनी, माधव धुमाळ, ज्ञानदेव सरोदे, महंमद असरुद्दीन, मनोज पाटील, संजय गवळी, नामदेव ढमक, योगेश जैन आदिंची निवड करण्यात आली आहे.

Visits: 118 Today: 1 Total: 1109068

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *