माजी मंत्री पिचडांचे मार्गदर्शन भावी पिढीला नेहमीच दिशादर्शक ः झिरवाळ विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि आमदार हिरामण खोसकर यांची सदिच्छा भेट

नायक वृत्तसेवा, राजूर
राजकारणात व समाजकारणात माजी मंत्री मधुकर पिचड यांचे महत्व आजही टिकून आहे. त्यांचे मार्गदर्शन भावी पिढीला नेहमीच दिशादर्शक ठरेल असा विश्वास विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी व्यक्त केला आहे.

ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा येथील कार्यक्रम आटोपून उपाध्यक्ष झिरवाळ थेट राजूरमध्ये (ता. अकोले) दाखल झाले. त्यांनी इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांच्यासह माजी मंत्री मधुकर पिचड यांची निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी माजी आमदार वैभव पिचड उपस्थित होते. पिचड कुटुंबियांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

माजी मंत्री पिचड यांच्या तब्येतीची विचारपूस करत आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा केली. त्यानंतर सुगाव खुर्द येथील पत्रकार अमोल वैद्य व स्वीय सहाय्यक सचिन वैद्य यांच्या विनंतीवरून सदिच्छा भेट दिली. त्यावेळी सुगाव खुर्द ग्रामपंचायत, सेवा सोसायटी, ज्ञानेश्वर दूध संस्था, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी यूनियनच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. विविध विषयांवर मनमुराद गप्पा मारत भोजनाचा मनसोक्त आस्वाद घेतला.

याप्रसंगी आमदार खोसकर यांचे स्वीय सहाय्यक गोकुळ थेटे, आयटीआयचे प्राचार्य विद्याचंद्र सातपुते, अशोक सावंत, सरपंच शुभांगी वैद्य, उपसरपंच डॉ. धनंजय वैद्य, सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब वैद्य, पंचायत समितीचे माजी उपसभापती संतोष देशमुख, ज्ञानेश्वर दूध संस्थेचे माजी अध्यक्ष दयानंद वैद्य, संचालक शांताराम वैद्य, सतीश वैद्य, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मण वैद्य, संजय वैद्य, संदीप वैद्य, सूर्यभान वैद्य, तान्हाजी वैद्य, साईनाथ वैद्य, दिनकर वैद्य, कलावती वैद्य, शालिनी वैद्य, शीतल वैद्य, निर्मला वैद्य, संगीता वैद्य, सुंदर वैद्य, यश वैद्य, रिद्धी-सिद्धी वैद्य आदी उपस्थित होते.

शेवटी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी यूनियनच्यावतीने विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळ यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी यूनियनचे अध्यक्ष संदीप बोडके, उपाध्यक्ष दौलत नवले, सचिव संतोष नाईकवाडी, उपकार्याध्यक्ष संदीप वैद्य, सदस्य सुयोग कर्पे आदी उपस्थित होते. तसेच खासगी आयटीआयला अनुदान मिळावे आणि इतर प्रश्नांबाबत आपण शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन प्राचार्य सातपुते यांना दिले. तर ग्रामपंचायतीचे वीजबिल हे विकास कामांसाठी आलेल्या 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून राज्य शासनाने वसूल करू नये; याबाबत राज्य शासन फेरविचार करत असल्याचे स्पष्ट करुन नाशिककडे रवाना झाले.

Visits: 162 Today: 1 Total: 1572962

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *