इंधन दरवाढ व महागाई विरोधात श्रीरामपूरात काँग्रेसची सायकल रॅली शेतकरी, कामगार व सर्वसामान्य जनतेच्या विरोधात केंद्र सरकार असल्याची टीका

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
इंधन दरवाढ आणि जीवनाश्यक वस्तूंच्या महागाई विरोधात काँग्रेस पक्षाचे राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या अनुषंगाने श्रीरामपूर येथे आमदार लहू कानडे, श्रीरामपूर तालुका व शहर काँग्रेस समितीच्यावतीने गुरुवारी (ता.15) सायकल रॅली काढून केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला.
![]()
या आंदोलनात उपनगराध्यक्ष करण ससाणे, ज्येेष्ठ नेते इंद्रभान थोरात, सचिन गुजर, संजय फंड, अरुण नाईक, संजय छल्लारे, मुजफ्फर शेख, दिलीप नागरे, शशांक रासकर, बाबासाहेब दिघे, ज्ञानेश्वर मुरकुटे, राजेंद्र पाऊलबुद्धे, रमेश कोठारी, सतीष बोर्डे, अशोक पवार, सुधीर नवले, अभिजीत लिप्टे, सुभाष तोरणे, रितेश रोटे, विजय बोर्डे आदी सहभागी झाले होते.

डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकार असताना जगभरात कच्चा तेलाच्या किंमती आभाळाला भिडलेल्या असतानाही देशभरातील पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किंमती नियंत्रणात होत्या. तथापि मोदी सरकारच्या काळात इंधनाचे दर वाढले आहेत. देशावर कोरोनाचे संकट असताना केंद्र सरकारकडून जनतेला पुरेसा औषधसाठा, ऑक्सिजन पुरवठा झाला नाही, त्यात गॅसच्या किंमती वाढवत इंधनावरील टॅक्स वाढवून सर्वसामान्यांची लूट केली आहे. एका बाजूला सर्वसामान्य जनतेचे जगणे महाग केले तर दुसर्या बाजुला गरीब शेतकर्यांच्या जमिनी भांडवलदारांना मिळाव्यात म्हणून शेतकरी विरोधी कायदे केले. अशाप्रकारे जनतेची मोठी फसवणूक सुरू असल्याची जोरदार टीका आमदार लहू कानडे यांनी करुन भाजप सरकार हे शेतकरी विरोधी, कामगार विरोधी व सर्वसामान्य जनतेच्या विरोधातले सरकार आहे, याची जाणीव त्यांना करून देण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचे नमूद केले.

यावेळी मान्यवरांची भाषणे झाली. लक्ष्मण कुमावत, रियाज पठाण, प्रेमचंद कुंकूलोळ, सरपंच सुनील शिरसाठ, सुनील शिनगारे, प्रताप देवरे, सुरेश पवार, राजेंद्र औताडे, रमेश आव्हाड, आबा पवार, दीपक कदम, सुनील क्षीरसागर, आशिष धनवटे, संतोष परदेशी, शरद पवार, प्रवीण नवले, भैय्या शाह, प्रशांत राऊत, तुषार अभंग, मच्छिंद्र मासाळ, इसाक पठाण, अन्सार शेख, सुरेश ठुबे, युवक काँग्रेसचे अक्षय नाईक, सनी मंडलिक, प्रतीक बोरावके, कृष्णा पुंड, अमोल नाईक, सिद्धार्थ छल्लारे आदी उपस्थित होते.
