श्रीरामपूरात ‘पुन्हा’ गावठी कट्ट्यासह काडतूस पकडले

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
शहरातील सरस्वती कॉलनीत अहमदनगरच्या गुन्हे अन्वेषणच्या पथकाने कट्टा बाळगल्याप्रकरणी एकास अटक करत नाही; तोच 12 तासांच्या आत बुधवारी (ता.14) संध्याकाळी शहरातील प्रभाग दोनमधील एकाकडे कट्टा व एक जिवंत काडतूस शहर पोलिसांना आढळून आले.

प्रभाग दोनमधील नवी दिल्ली परिसरातील जैनब मस्जिदजवळ एकाकडे गावठी कट्टा असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय सानप यांना मिळाली. त्यानुसार पोलीस हेडकॉन्स्टेबल जोसेफ साळवी, पोलीस कॉन्स्टेबल किशोर जाधव, राहुल नरवडे, सुनील दिघे, महेंद्र पवार, पंकज गोसावी यांच्या पथकाने सापळा रचून सर्फराज बाबा शेख उर्फ सर्फ्या (रा.प्रभाग क्र. 2) याला तीस हजार रुपये किंमतीचा एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतुससह पोलिसांनी पकडले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई किशोर जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुरनं. 464/2021 सर्फराज बाबा शेख उर्फ सर्फ्या याच्याविरुध्द भादंवि कलम 3, 5/25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Visits: 147 Today: 1 Total: 2057576

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *