संगमनेर तालुका साडे नऊ हजार रुग्णसंख्येच्या उंबरठ्यावर! जिल्ह्यात आजही उच्चांकी रुग्णवाढ; संगमनेर तालुक्यात 84 तर अकोल्यात 68 रुग्ण..

नायक वृत्तसेवा, संगमनेर

गंभीर झालेल्या कोविड बाधितांचा जीव वाचविण्यासाठी फायदेशीर ठरणार्‍या ‘रेमडेसिवीर’ लशीच्या जिल्ह्यातील कृत्रिम तुटवड्यावर चर्चा सुरु असतांनाच आज जिल्ह्याच्या रुग्णसंख्येत आणखी 1 हजार 652 नव्या बाधितांची भर पडली आहे. आजही अहमदनगरच्या महापालिका क्षेत्रात सर्वाधीक रुग्णवाढ झाली, तर कर्जतमध्ये अचानक कोविडचा उद्रेक होवून आज तेथून तब्बल 166 रुग्ण समोर आले. राहाता व अहमदनगर ग्रामीण क्षेत्रातूनही शंभरपेक्षा अधिक बाधित समोर आले असून आज बाधितांच्या यादीत आठव्या क्रमांकावर गेलेल्या संगमनेर तालुक्यातून 84 तर अकराव्या स्थानावरील अकोल्यातून 68 रुग्ण समोर आले आहेत. आजच्या रुग्णवाढीने संगमनेर तालुक्याने बाधितांचे 94 वे शतक ओलांडून 9 हजार 470 रुग्णसंख्या गाठली आहे. आज तालुक्यातील 114 जणांना उपचारांती घरी सोडण्यात आले आहे. सद्यस्थितीत तालुक्यातील सक्रीय रुग्णांची संख्या 740 झाली आहे.

     1 एप्रिलपासून भरात आलेल्या कोविडने गेल्या सात दिवसांतच दररोज तब्बल सरासरी 1 हजार 750 या रुग्णगतीने जिल्ह्याच्या एकूण रुग्णसंख्येत 12 हजार 246 रुग्णांची भर घातली आहे. कोविडच्या दुसर्‍या संक्रमणाचा आत्तापर्यंतचा सर्वात जास्त फटका अहमदनगर महापालिका क्षेत्राला बसला असून एकट्या नगर शहरातूनच दररोज 491 गतीने 3 हजार 435 रुग्ण समोर आले आहेत. चालू महिन्यात राहाता तालुक्यातील  कोविड संक्रमणाने अचानक वेग घेतल्याचे निरीक्षणही समोर आले असून गेल्या सातच दिवसांत सरासरी 165 रुग्ण रोज या वेगाने राहाता तालुक्याच्या रुग्णसंख्येत तब्बल 1 हजार 157 रुग्णांची भर पडली आहे. श्रीरामपूर व कोपरगाव तालुक्यातील रुग्णवाढीनेही याच महिन्यात गती घेतली असून तेथून गेल्या सात दिवसांत सरासरी 121 रुग्ण दररोज या वेगाने अनुक्रमे 848 व 847 रुग्ण समोर आले आहेत.

     गेल्यावर्षी जिल्ह्यात कोविडचे संक्रमण सुरु झाल्यापासूनच अहमदनगर महापालिका क्षेत्राच्या खालोखाल असलेल्या  संगमनेर तालुक्यातील रुग्णगतीही गेल्यावर्षीच्या सरासरीच्या दुपटीहून अधिक असून गेल्या सात दिवसांत सरासरी 113 रुग्ण या वेगाने तालुक्यात एकूण 789 रुग्णांची भर पडली आहे. नगर ग्रामीणमध्येही संक्रमणाचा वेग वधारला असून तेथून दररोज 105 रुग्ण या वेगाने आत्तापर्यंतच्या सात दिवसांत 735 रुग्णांची भर पडली आहे. पाथर्डी सरासरी 94 गतीने 657 रुग्ण, राहुरी सरासरी 85 गतीने 594 रुग्ण, अकोले सरासरी 70 रुग्ण या गतीने 490 रुग्ण, नेवासा व कर्जत सरासरी 64 रुग्ण या गतीने अनुक्रमे 451 व 449 रुग्ण, शेवगाव सरासरी 61 रुग्ण या वेगाने 429 रुग्ण, पारनेर सरासरी 44 रुग्ण या गतीने 311 रुग्ण, जामखेड सरासरी 38 रुग्ण या वेगाने 265 रुग्ण तर श्रीगोंदा सरासरी 33 रुग्ण या गतीने आत्तापर्यंतच्या एप्रिलमधील सात दिवसांत 230 रुग्णांची भर घालणारा तालुका ठरला आहे.

     आजही शासकीय प्रयोगशाळेचे 458, खासगी प्रयोगशाळेचे 492 व रॅपीड अँटीजेन चाचणीद्वारा 702 अशा जिल्ह्यातील एकूण 1 हजार 652 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यात सर्वाधीक रुग्ण अहमदनगर महापालिका क्षेत्रातून 362, कर्जत येथून 166, राहाता 146, नगर ग्रामीण 134, कोपरगाव 99, राहुरी 97, पाथर्डी 88, संगमनेर व शेवगाव 84, श्रीरामपूर 70, अकोले 68, नेवासा 65, भिंगार लष्करी परिसर 62, जामखेड 46, पारनेर 28, श्रीगोंदा 11, अन्य जिल्ह्यातील 36, अन्य राज्यातील एक व लष्करी रुग्णालयातील पाच जणांचा यात समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता 1 लाख 7 हजार 168 झाली आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यातील 95 हजार 175 रुग्णांनी उपचार पूर्ण करुन घर गाठले असून आजच्या स्थितीत जिल्ह्यातील 10 हजार 738 जणांवर उपचार सुरु आहेत. आत्तापर्यंत जिल्ह्यातील 1 हजार 255 रुग्णांचा कोविडने बळी घेतला असून जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचा दरही घसरुन खाली येत 88.81 टक्के झाला आहे. आज जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या कोविड केअर सेंटर व कोविड आरोग्य केंद्रातून 1 हजार 680 जणांना घरी सोडण्यात आले आहे. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात एकाही कोविड मृत्यूची नोंद झालेली नाही.

     आज संगमनेर तालुक्यातही 84 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यातील 53 अहवाल शासकीय प्रयोशाळेकडून व 31 अहवाल खासगी प्रयोगशाळेकडून प्राप्त झाले आहेत. आजच्या तालुक्यातील एकूण रुग्णांमध्ये शहरातील केवळ 18 तर ग्रामीण भागातील 64 रुग्णांचा समावेश आहे, दोन रुग्ण अन्य तालुक्यातील आहेत. शहरातील रुग्णांमध्ये मालदाड रोडवरील 37 वर्षांच्या दोघा तरुणांसह 63, 51, 32 व 24 वर्षीय महिला, अकोले बायपास वरील 64 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, तहसील कचेरी जवळील 71 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, शिवाजी नगरमधील 30 वर्षीय तरुण, सुकेवाडी रस्त्यावरील 36 वर्षीय महिला, गणेशनगर मधील 35 वर्षीय महिला, शासकीय विश्रामगृह परिसरातील 24 वर्षीय महिला, शिवशक्तिनगर मधील 17 वर्षीय महिला, सह्याद्री महाविद्यालयाजवळील 30 वर्षीय तरुण व केवळ संगमनेर असा उल्लेख असलेल्या 65 वर्षीय महिला व 54 वर्षीय इसमासह 37 व 32 वर्षीय तरुणांचा समावेश आहे.

     तर ग्रामीणभागातील मालुंजे डिग्रस येथील 31 वर्षीय तरुण, चिंचोली गुरव येथील 27 वर्षीय तरुण, प्रतापपूर येथील 64 वर्षीय महिला व 52 वर्षीय इसम, आश्‍वी बु. येथील 37 व 32 वर्षीय महिलांसह 21 व 20 वर्षीय तरुण, आश्‍वी खुर्दमधील 63 वर्षीय इसमासह 15 वर्षीय तरुणी, निमागव भोजापूर येथील 39 वर्षीय तरुण, समनापूर येथील 42 वर्षीय महिला, निमगाव बु. येथील 53 वर्षीय महिला, जवळे कडलग येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, 52 वर्षीय इसम व 24 आणि 22 वर्षीय महिला, चणेगाव येथील 25 व 21 वर्षीय तरुण, घारगाव येथील 49 वर्षीय इसमासह 28 व 27 वर्षीय तरुण, निमगाव जाळीतील 39 वर्षीय तरुण, नांदुरी दुमाला येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 25 वर्षीय महिला, सादतपूर येथील 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिक व 60 वर्षीय महिला, सावरगाव घुले येथील 33 वर्षीय तरुण, सावरगाव तळ येथील 54 वर्षीय महिलेसह 29 वर्षीय तरुण व 10 वर्षीय मुलगा,

     उंबरी बाळापूर येथील 42 वर्षीय महिलेसह 27 व 22 वर्षीय तरुण, जाखुरी येथील 18 वर्षीय तरुणी, झरेकाठी येथील 42 वर्षीय तरुणासह 27 वर्षीय महिला, पिंपळगाव माथा येथील 18 वर्षीय तरुण, संगमनेर खुर्दमधील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 60 व 34 वर्षीय महिला, पिंपळगाव कोंझिरा येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 48 वर्षीय महिला व 24 वर्षीय तरुण, पेमगिरी येथील 27 वर्षीय तरुण, चिंचपूर येथील 76 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 41 वर्षीय तरुण, चंदनापूरी येथील 19 वर्षीय महिला, वेल्हाळे येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, सायखिंडी येथील 39 वर्षीय तरुण, वडगाव लांडगा येथील 58 वर्षीय इसम, घुलेवाडीतील 45 वर्षीय इसमासह 36, 33, 30, 27 व 25 वर्षीय तरुण आणि 52, 45, 28, 25 व 23 वर्षीय महिला, मालपाणी नगरमधील 36 वर्षीय तरुण आणि पोखरी हवेली येथील 39 वर्षीय तरुण अशा तालुक्यातील एकूण 82 जणांचे तर श्रीरामपूर येथील वॉर्ड क्र.3 मधील 42 वर्षीय महिला व अहमदनगरच्या टिळक रोडवरील 71 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे तालुक्याची एकूण रुग्णसंख्या आता 9 हजार 470 झाली असून आज 114 जणांना उपचारांती घरी सोडण्यात आले. आजच्या स्थितीत तालुक्यात 740 सक्रीय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.   

Visits: 23 Today: 1 Total: 121198

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *