इंधर दरवाढीविरोधात युवक काँग्रेसची स्वाक्षरी मोहीम

नायक वृत्तसेवा, संगमनेर
पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्यावतीने रविवारपासून (ता.11) एक कोटी स्वाक्षरी मोहिमेची सुरूवात करण्यात आली आहे. या माध्यमातून दरवाढ कमी करण्यासाठी केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यात येणार आहे.

संगमनेरातील शेतकी संघ येथे या स्वाक्षरी मोहिमेचा शुभारंभ काँग्रेसचे गटनेते तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाला. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष सांगळे, निखील पापडेजा, सोमेश्वर दिवटे, गौरव डोंगरे, शेखर सोसे, सचिन खेमनर, भागवत कानवडे, रमेश गफले, विजय उदावंत, तानाजी शिरतार, सागर कानकाटे, सुमित पानसरे, ऋत्विक राऊत, दीपक कदम, प्रथमेश मुळे, हैदरअली सय्यद, मनीष राक्षे, अमित गुंजाळ, मनीष कागडे, तात्या कुटे, तुषार वनवे आदिंसह युवक काँग्रेसचे कार्यकर्ते व विविध पदाधिकारी उपस्थित होते. संपूर्ण राज्यभरात 11 ते 15 जुलै दरम्यान हे स्वाक्षरी अभियान राबविले जाणार असून एक कोटी सह्यांचे निवेदन तयार करून राष्ट्रपती महोदयांना दिले जाणार आहे. यावेळी महसूल मंत्री थोरात यांच्यासह सत्यजीत तांबे यांनी केंद्र सरकार इंधन दरवाढीवरुन जोरदार निशाणा साधला.
