चंदनापुरी घाटात टायर फुटून टेम्पोचा अपघात

नायक वृत्तसेवा, घारगाव
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांची श्रृंखला आजही कायम आहे. शुक्रवारी (ता.9) सकाळी चंदनापुरी घाटातील हॉटेल लक्ष्मीजवळ मालवाहतूक करणार्या टेम्पोचा टायर फुटल्याने अपघात झाला. यामध्ये वाहनचालक बालंबाल बचावला असून, वाहनाचे नुकसान झाले आहे.

पुणे येथून जनरेटर घेऊन नाशिकच्या दिशेने जाणारा मालवाहतूक टेम्पो (क्र.एमएच.14, जीयू.8759) हा पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटातील हॉटेल लक्ष्मीजवळ येताच टायर फुटला. त्यानंर महामार्गाच्या कडेला जाऊन विसावला. यामध्ये वाहनचालक बालंबाल वचावला असून, वाहनाचे नुकसान झाले आहे. अपघातानंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. या अपघाताची माहिती मिळताच महामार्गाचे सहाय्यक किसन वाळे, संतोष पोखरकर, किशोर पराड, ज्ञानेश्वर रहाणे आणि डोळासणे महामार्ग मदत पोलीस मदत केंद्राच्या पोलिसांनी अपघातग्रस्त टेम्पो क्रेनच्या सहाय्याने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली.
