‘डॉक्टर्स डे’ निमित्ताने डॉक्टरांचा वृक्षभेट देऊन सन्मान

नायक वृत्तसेवा, संगमनेर
‘डॉक्टर्स डे’चे औचित्य साधून सारथी फाऊंडेशन संगमनेरच्यावतीने शहरातील नामांकित तथा कौशल्यप्रणित डॉक्टरांना वृक्षभेट देऊन सन्मान करण्यात आला.

प्रातिनिधीक स्वरुपात डॉ. प्रवीणकुमार पानसरे, डॉ. अमोल सानप, डॉ. जयप्रकाश खैरनार, डॉ. आकांक्षा सोनांबेकर, डॉ. रणजीत सातपुते, डॉ. शैलेश तोडकरी, डॉ. दीपक तांबे, डॉ. दत्तात्रय शेळके, डॉ. अनिता शेळके, डॉ. प्रमोदिनी सानप, डॉ. जयश्री दातीर, डॉ. निकुंज दातीर आदिंचा सन्मान सारथी फाऊंडेशनचे सचिव अजय हांडे, प्रकल्प प्रमुख मंगेश वाघमारे, ऋषीकेश पावसे, ऋषीकेश घोडेकर, प्रतीक पावडे, संजय हलकरी, नवनाथ गिर्हे आदिंच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संस्थेची कार्यपद्धती आणि भविष्यातील वाटचालीची थोडक्यात माहिती दिली. संस्थेच्या कामाचे कौतुक करत संस्थेच्या कुठल्याही प्रकारच्या उपक्रमाच्या सहकार्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे आश्वासन सर्व डॉक्टरांच्यावतीने यावेळी देण्यात आले.त् याचबरोबर डॉक्टरांच्या रोजच्या कार्यपद्धतीला समजावून घेण्याचा व त्यांच्या दैनंदिन व्यवहारात येणार्या अडचणींचा आशय जाणून घेण्याचा प्रयत्न सारथी फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांच्यावतीने करण्यात आला. सदर कार्यक्रम सारथी फाऊंडेशनचे अध्यक्ष अक्षय बोंबले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. वैद्यकीय अनुषंगाने समाजासाठी उपयोगी ठरेल अशा एका नव्या प्रकल्पावर सारथी फाऊंडेशन लवकरात लवकर काम करण्याच्या तयारीत आहे असे यानिमित्ताने डॉक्टरांशी होणार्या चर्चेत सारथीकडून मांडण्यात आले.
