नेवाशात नगरपंचायतची मास्क नसणार्यांवर दंडात्मक कारवाई

नायक वृत्तसेवा, नेवासा
शहरात मास्क न घालणार्या नागरिकांसह व्यापार्यांवर नगरपंचायतचे मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (ता.17) पथकाने दंडात्मक कारवाई केली आहे.

नेवासा शहरात बाहेर गावाहून येणार्या नागरिकांसह व्यवसाय करणार्या काही लोकांना देखील मास्क नसतो हे निदर्शनास आल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा शहरात वाढू नये म्हणून सायंकाळच्या सुमारास नगरपंचायतचे पथक मुख्यपेठेसह संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर रस्ता, नगरपंचायत चौक, बाजारतळ परिसर, बसस्थानक परिसर व श्रीरामपूर रस्ता आदी ठिकाणी फेरफटका मारुन मास्क न घालणार्या व्यक्तींवर तसेच काही व्यापार्यांवर देखील दंडात्मक कारवाई करण्यात आली. या पथकात कार्यालयीन अधिकारी गुप्ता, वाघमारे, कडपे, कर्मचारी मनीषा मापारी, अनिता सोनवणे आदिंचा सहभाग होता. अद्यापही कोरोनाचे संकट टळले नसून, नागरिकांसह व्यापार्यांनी नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन मुख्याधिकारी गर्कळ यांनी केले आहे.
