पाथरवाला शिवारात विवाहितेचा मृतदेह आढळला

नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील पाथरवाला शिवारात एका विहिरीत विवाहितेचा मृतदेह आढळला आहे. या प्रकरणी तिच्या पतीसह सासू, सासरा व दीर अशा चौघांविरोधात गुन्हा दाखल करुन पतीस अटक केली आहे. तर अन्य आरोपी पसार आहेत.

सुरेखा शरद थोरे (वय 22, रा.पाथरवाला) असे मृत महिलेचे नाव आहे. तिचा मृतदेह जुन्या पिंप्री शहाली-नांदूर शिकारी रस्त्यावरील त्यांच्या विहिरीत सोमवारी (ता.1) सकाळी आढळला. याबाबत सुरेखाचा पती शरद, मेव्हणे बाबासाहेब खाटिक यांनी कुकाणे पोलिसांत खबर दिली. सुरेखा व शरदचे अडीच महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. पोलीस निरीक्षक विजय करे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय ठाकूर, कर्मचारी दिलीप राठोड यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पोलिसांनी मृतदेह विहिरीबाहेर काढून उत्तरीय तपासणी केली. पती शरद रामकिसन थोरे, सासरे रामकिसन भाऊराव थोरे, सासू शोभा व दीर ज्ञानदेव यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी पती शरद थोरेला अटक केली आहे.

Visits: 170 Today: 1 Total: 2167694

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *