संगमनेर शहराचा प्रवास कोविड मुक्तीच्या दिशेने! तालुक्याच्या ग्रामीण भागातील संक्रमणात मात्र आज झाली किंचितशी वाढ..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या सव्वा वर्षापासून कोविड संक्रमणाचा घाव सोसणार्‍या संगमनेर शहराला सलग दुसर्‍या दिवशी मोठा दिलासा मिळाला असून आजही शहरात अवघे चारच रुग्ण समोर आले आहेत. मात्र मंगळवारच्या तुलनेत ग्रामीण संक्रमणात काहीशी वाढ झाली असून पिंप्री लौकी व उंबरी बाळापूरमधून अधिक रुग्ण समोर आले आहेत. आजच्या अहवालातून तालुक्यातील 56 जणांना कोविडची लागण झाल्याचे समोर आले असून त्यात ग्रामीणभागातील 52 रुग्णांचा समावेश आहे. आजच्या रुग्णवाढीने तालुका आता 22 हजार 515 रुग्णसंख्येवर पोहोचला आहे. आज जिल्ह्यालाही मोठा दिलासा मिळतांना सलग तिसर्‍या दिवशी रुग्णसंख्या पाचशेच्या खाली असून जिल्ह्यात आज 437 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता 2 लाख 73 हजार 879 झाली आहे.

गेल्या 16 महिन्यांपासून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये धुमाकूळ घालणार्‍या कोविडचे संक्रमण आता उतारावर आहे. त्यामुळे दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी घट झाली असून जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील खासगी कोविड केअर हेल्थ सेंटर्स रिकामे झाल्याचे समाधानकारक चित्र सध्या दिसत आहे. मात्र असे असले तरीही जिल्ह्यातील काही तालुक्यांच्या ग्रामीणभागातून अजूनही रुग्ण समोर येत असल्याने शहरी भागातील संक्रमणात घट तर ग्रामीण भागातील संक्रमणात वाढ होत असल्याचे विरोधाभासी चित्रही काही ठिकाणी दिसून येत आहे. आजच्या एकूण रुग्णसंख्येत पाथर्डी व संगमनेर या दोन तालुक्यांमध्ये पन्नापेक्षा अधिक तर उर्वरीत सर्व तालुक्यांमधून पन्नासपेक्षा कमी रुग्ण समोर आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोविड संक्रमणाची दुसरी लाट जवळपास ओसरल्याचे अत्यंत दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे.

आज शासकीय प्रयोगशाळेचे सहा, खासगी प्रयोगशाळेचे 17 आणि रॅपिड अँटीजेन चाचणीतून प्राप्त 33 निष्कर्षातून संगमनेर तालुक्यातील 56 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात संगमनेर असा पत्ता नोंदविलेल्या शहरातील 57 व 52 वर्षीय इसमांसह 45 वर्षीय महिला व 41 वर्षीय तरुणाचा समावेश आहे. उर्वरीत सर्व अहवाल तालुक्याच्या ग्रामीण भागातील असून त्यात सर्वाधीक रुग्ण पिंप्री लौकीतून समोर आले आहेत. तेथील 50 वर्षीय इसमासह 35, 34 व 23 वर्षीय महिला आणि 14 वर्षीय मुलगी, उंबरी बाळापूर येथील 62 वर्षीय महिलेसह 42 वर्षीय तरुण आणि 18 वर्षीय तरुणीसह 16 वर्षीय मुलगी, निमगाव खुर्द येथील 60, 50 व 48 वर्षीय महिला,

कोकणगाव येथील 50 व 45 वर्षीय इसमांसह 15 वर्षीय मुलगा, साकूर येथील 31 वर्षीय तरुणासह 12 वर्षीय मुलगा व तीन वर्षीय बालिका, पानोडी येथील 46 व 35 वर्षीय महिलांसह 40 वषीय तरुण, वेल्हाळे येथील 51 वर्षीय इसम, घुलेवाडीतील 58 वर्षीय इसमासह 50 वर्षीय महिला, वडगाव पान येथील 34 वर्षीय तरुण, सिंदोडीतील 40 वर्षीय तरुण, देवगाव येथील सात वर्षीय बालक, हिवरगाव पठार येथील 48 वर्षीय इसमासह 26 वर्षीय तरुण, सुकेवाडीतील 18 वर्षीय तरुणी, खराडीतील 25 वर्षीय तरुण, कनोलीतील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, कासारवाडीतील 39 वर्षीय तरुण,

निमगाव जाळीतील 70 वर्षीय महिलेसह 51 वर्षीय इसम, पोखरी येथील 23 वर्षीय महिला, निमगाव बु. येथील 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, संगमनेर खुर्दमधील 35 वर्षीय तरुण, निमज येथील 26 वर्षीय तरुण, वरवंडी येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, खळी येथील 27 वर्षीय तरुणासह 14 वर्षीय मुलगा, प्रतापपूर येथील 66 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, हंगेवाडी येथील 35 वर्षीय महिला, दाढ खुर्द येथील 37 व 35 वर्षीय तरुण, झरेकाठी येथील 50 वर्षीय महिला, शेडगाव येथील 17 वर्षीय तरुणासह 14 वर्षीय मुलगी, कोठे बु. येथील 49 वर्षीय महिलेसह 33 वर्षीय तरुण व निमोण येथील 32 वर्षीय तरुणाची अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आजच्या वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे तालुक्याची सरासरी रुग्णगतीही काहीशी वाढली असून सरासरी 65 रुग्ण समोर येत आहेत. आजच्या रुग्णसंख्येने तालुका आता 22 हजार 515 रुग्णसंख्येवर पोहोचला आहे.

जिल्ह्यातील रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांपासून मोठी घट होत असल्याचे समोर आले आहे. त्या श्रृंखलेत आज सलग तिसर्‍या दिवशी जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या पाचशेपेक्षा कमी असल्याने जिल्हावासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज जिल्ह्यातील पाथर्डी येथून 60, संगमनेर 56, पारनेर 47, राहुरी 42, राहाता 36, श्रीरामपूर 35, श्रीगोंदा 28, अकोले 27, कर्जत 24, शेवगाव 16, नेवासा 15, नगर ग्रामीण 14, कोपरगाव 12, अहमदनगर महापालिका क्षेत्र 11, जामखेड 10 व इतर जिल्ह्यातील चार जणांचा समावेश आहे. आजच्या रुग्णसंख्येने जिल्ह्याची एकूण संख्या आता 2 लाख 73 हजार 879 झाली आहे.

Visits: 156 Today: 3 Total: 1109305

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *