तालुक्याच्या रुग्ण संख्येत आणखी पंचवीसची भर! शहरातील सात जणांसह तालुक्यातील अठरा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह!!

तालुक्याच्या रुग्ण संख्येत आणखी पंचवीसची भर!

शहरातील सात जणांसह तालुक्यातील अठरा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह!!

नायक वृत्तसेवा, संगमनेर

संगमनेर तालुक्यात दररोज मोठ्या संख्येने रुग्ण सापडण्याची शृंखला पुन्हा एकदा सुरू झाली असून आजही तालुक्यातील विविध ठिकाणांसह शहरातून एकूण 25 रुग्ण समोर आले आहेत. यातील तिघांचे अहवाल खासगी प्रयोगशाळेकडून तर उर्वरित अहवाल रॅपिड एंटीजेन चाचणीतून प्राप्त झाले आहेत. आजच्या रुग्णवाढीने तालुक्याची रुग्णसंख्या 1 हजार 237 वर पोहोचली आहे.

आज प्राप्त झालेल्या अहवालातून रंगार गल्ली परिसरातील वीस वर्षीय तरुण, साळीवाडा परिसरातील 62 वर्षीय, 31 वर्षीय पुरुषांसह 58 वर्षीय महिला, गोल्डन सिटी परिसरातून वीस वर्षीय तरुण, 52 वर्षीय महिला, गणेशनगर परिसरातून चोपन्न वर्षीय महिला असे एकूण सात जणांचे अहवाल पॉझिटिव आले आहेत.

त्यासोबतच तालुक्याच्या ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात कोविडचा प्रसार झाला असून आजही ग्रामीण भागात 18 रुग्णांची नव्याने भर पडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे कोविडच्या विषाणूंनी 70 वर्षीय इसमाच्या रूपाने हंगेवाडीतही प्रवेश केला आहे. त्याच बरोबर सुकेवाडी येथील 55 वर्षीय महिला, गुंजाळवाडी येथील वीस वर्षीय तरुण, चिंचोली गुरव येथील 90 वर्षीय वयोवृद्ध इसमासह 45 वर्षीय, 38 वर्षीय व 35 वर्षीय तरुण, 16 वर्षीय व बारा वर्षीय मुले तसेच 60 वर्षीय व 35 वर्षीय महिला, कनोली येथून 50 वर्षीय, 36 वर्षीय पुरुषांचसह 15 वर्षीय मुलगा व 46 वर्षीय महिला, बोटा शिवारातील माळेवाडी येथील 31 वर्षीय तरुण, चंदनापुरीतील 23 वर्षीय तरुणी व निमोण मधील 50 वर्षीय महिलेला संक्रमण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आज तालुक्याच्या रूग्ण संख्येत पंचवीस रुग्णांची भर पडून बाधितांची संख्या 1 हजार 237 वर जाऊन पोहोचली आहे.

Visits: 118 Today: 3 Total: 1103410

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *