पाटबंधारे व बांधकाम खाते पतसंस्थेकडून सभासदांना लाभांश ः आवारी
पाटबंधारे व बांधकाम खाते पतसंस्थेकडून सभासदांना लाभांश ः आवारी
नायक वृत्तसेवा, अकोले
अहमदनगर जिल्हा पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचारी सहकारी पतसंस्थेने सभासदांच्या बँक खात्यावर सुमारे 92 लाख रुपयांची लाभांशाची रक्कम वर्ग केली असल्याची माहिती पतसंस्थेचे अध्यक्ष शांताराम आवारी यांनी दिली.
कोरोना महामारीमुळे राज्य शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने सहकारी संस्थांना 31 मार्च, 2021 पर्यंत वार्षिक सर्व साधारण सभा घेण्यास परवानगी दिल्याने 10 नोव्हेंबर, 2020 रोजी सभा बोलावून तात्काळ सभासदांना लाभांश वाटपाबाबतचा निर्णय घेऊन जिल्हा उपनिबंधक, विभागीय सहनिबंधक आणि जिल्हा बँक मुख्यालय यांची कॅश क्रेडिटमधून लाभांश वाटपाची रक्कम उचल करण्यासाठी दोन दिवसांत तात्काळ मंजुरी घेऊन सभासदांच्या वैयक्तिक राष्ट्रयीकृत बँक खात्यावर 13 नोव्हेंबर, 2020 रोजी वर्ग करण्यात आली आहे. संस्थेचे स्वतःचे भाग भांडवल 9.56 कोटी, संचित ठेवी 35.35 कोटी, वार्षिक उलाढाल 245 कोटी, 80.62 कोटी कर्जवाटप केलेले आहे. तर संस्थेला सन 2019-20 या आर्थिक वर्षात 8.55 कोटींचा ढोबळ नफा झालेला असून, सर्व खर्च व तरतुदी जाऊन संस्थेस 92.77 लाखांहून अधिक निव्वळ नफा झाला असल्याचे अध्यक्ष शांताराम आवारी आणि उपाध्यक्ष दीपक वाळके यांनी सांगितले. संस्थेच्या कारभारात संचालक, सभासद आणि कर्मचार्यांचे मोलाचे सहकार्य लाभत असल्याने संस्था प्रगतीपथावर असल्याचेही अध्यक्ष आवारी यांनी नमूद केले आहे.