सलग दुसर्या दिवशी जिल्ह्यासह संगमनेरच्या रुग्णसंख्येत मोठी घट! सर्वाधीक प्रादुर्भाव असलेल्या देशातील दहा जिल्ह्यात समाविष्ट झालेल्या जिल्ह्याची आश्चर्यकारक माघार..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
चालू महिन्यात जिल्ह्याच्या रुग्णसंख्येला लागलेली ओहोटी कायम असून महिन्याच्या पहिल्या पाच पैकी तीन दिवस समोर आलेली रुग्णसंख्या हजारांच्या आत असल्याने जिल्हा सुखावला आहे. त्यातच दैनंदिन रुग्ण समोर येण्याच्या गतीतही आश्चर्यकारकरित्या मोठी घसरण झाल्याने शासनाच्या ‘मिशन बिगीन अगेन’अंतर्गत जिल्ह्यातील निर्बंध हटण्याचा मार्गही प्रशस्त झाला आहे. या श्रृंखलेत सातत्य कायम असून आजही जिल्ह्यात अवघे 843 रुग्ण आढळले आहेत. संगमनेर तालुक्यातही सलग दुसर्या दिवशी दुहेरी रुग्णसंख्या समोर आली असून शहरातील सोळा जणांसह अन्य तालुक्यातील चार व ग्रामीणभागातील 68 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे तालुक्याच्या रुग्णसंख्येने 22 हजारांचा पल्ला ओलांडला असून एकूण रुग्णसंख्या आता 22 हजार 71 झाली आहे.
मागील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील सरासरीचा आढावा घेतल्यानंतर शासनाने ज्या जिल्ह्यात रुग्ण समोर येण्याची गती 10 टक्क्यांपेक्षा कमी आहे व तेथील ऑक्सिजन खाटांवर 40 टक्क्यांपेक्षा कमी रुग्ण आहेत अशा जिल्ह्यांना 1 जूनपासून काही प्रमाणात सवलती जाहीर केल्या होत्या. त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यातील रुग्ण समोर येण्याची गती 8.47 टक्के होती, मात्र 30 मे रोजी जिल्ह्यातील 50 टक्के ऑक्सिजन खाटांवर रुग्ण असल्याने जिल्ह्याला या सवलतीचा लाभ मिळाला नव्हता. मात्र त्यानंतरच्या सात दिवसांत जिल्ह्यातील सरासरीत मोठी घट होण्यासोबतच मागील आठवड्यात ऑक्सिजन खाटांवर असलेले बहुतेक रुग्ण उपचार पूर्ण करुन घरी परतल्याने आजच्या स्थितीत जिल्ह्यातील केवळ 24.48 टक्के ऑक्सिजन खाटांवर रुग्ण आहेत. त्याचा परिणाम राज्यातील जलदगतीने कोविड मुक्त होत असलेल्या पहिल्या 10 जिल्ह्यांमध्ये अहमदनगरचा समावेश झाला आहे.
मागील महिन्यात जिल्ह्यात रुग्ण समोर येण्याचा सरासरी दैनिक वेग तब्बल 2 हजार 810 रुग्ण इतका प्रचंड होता. संगमनेरातही सरासरी 279 रुग्ण समोर येत होते. मात्र जूनच्या पहिल्या दिवसापासून यात मोठा बदल झाला असून जिल्ह्यातील बहुतेक सर्वच तालुक्यातील कोविड संक्रमणाचा वेग मोठ्या प्रमाणात खालावला आहे. सद्यस्थितीत संगमनेर तालुक्यातून दररोज 97 रुग्ण समोर येत असून गेल्या महिन्याच्या तुलनेत ही सरासरी तिपटीने कमी आहे. जूनच्या पहिल्या पाच दिवसांत संपूर्ण जिल्ह्यात सरासरी 990 रुग्ण या गतीने 4 हजार 950 रुग्णांची भर पडली आहे. त्यानंतर संगमनेर 484 (सरासरी 96.8), श्रीगोंदा 453 (सरासरी 90.6), पारनेर 411 (सरासरी 82.2),
पाथर्डी 397 (सरासरी 79.4), नेवासा 388 (सरासरी 77.6), नगर ग्रामीण 330 (सरासरी 66), शेवगाव 325 (सरासरी 65), अकोले 296 (सरासरी 59.2), जामखेड 295 (सरासरी 59), श्रीरामपूर 292 (सरासरी 58.4), कर्जत 259 (सरासरी 51.8), राहुरी 257 (सरासरी 51.4), राहाता 238 (सरासरी 47.6), अहमदनगर महापालिका क्षेत्र 229 (45.8) व कोपरगाव 199 (सरासरी 39.8). याप्रमाणे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमधील संक्रमण ओसरत असल्याचे स्पष्टपणे दिसत असून राज्यासह जिल्ह्यातूनही समाधानकारक चित्र उभे रहात आहेत. त्यामुळे कोविड संक्रमणामूळे गेल्या मोठ्या कालावधीपासून घरबंद असलेल्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आज शासकीय प्रयोगशाळेच्या 35, खासगी प्रयोगशाळेच्या 24 व रॅपीड अँटीजेनच्या 29 निष्कर्षांमधून तालुक्यातील 88 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात शहरातील जनता नगरमधील 52 वर्षीय महिला, सावता माळीनगर येथील 67 वर्षीय महिला, शहर पोलीस ठाण्याजवळील 40 वर्षीय तरुण, तीनबत्ती चौकातील 37 वर्षीय तरुण, अकोले नाक्यावरील 11 वर्षीय मुलगी व संगमनेर असा पत्ता नोंदविलेल्या 84, 52 व 45 वर्षीय महिलांसह 37, 35, 31, 26, 22 व 21 वर्षीय तरुण, आणि 19 व 16 वर्षीय तरुणी संक्रमित णाल्याचे समोर आले आहे.
त्यासोबतच ग्रामीणभागातील 39 गावे आणि वाडड्या-वस्त्यांवरील एकूण 68 जणांचे अहवालही पॉझिटिव्ह आले असून त्यात निमगाव येथील 75 वर्षीय वयोवृद्ध इसम, मनोली येथील 76 वर्षीय वयोवृद्ध इसम, चिंचपूर येथील 32 वर्षीय तरुण, उंबरी बाळापूर येथील 60 वर्षीय महिला, वाघापूर येथील 32 वर्षीय महिला, अंभोरे येथील 30 वर्षीय महिला, पेमगिरीतील बारा वर्षीय मुलगा, निमगाव पागा येथील 81 व 40 वर्षीय महिलांसह 45 वर्षीय इसम व 34 वर्षीय तरुण, गुंजाळवाडीतील 64 वर्षीय महिला, औद्योगिक वसाहतीतील 65 वर्षीय महिला व 21 वर्षीय तरुण, देवगावातील 40 वर्षीय तरुण, कुंभारवाडीतील 50 वर्षीय इसम, घुलेवाडीतील 85 व 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांसह 45 वर्षीय इसम, कनोलीतील 42 वर्षीय तरुण,
पिंप्री लौकीतील 30 वर्षीय तरुण, सुकेवाडीतील 74, 63, 62, 45 व 40 वर्षीय महिलांसह 46 वर्षीय इसम व 35 वर्षीय तरुण, शिबलापूरातील 25 वर्षीय महिला, चणेगावातील 55 वर्षीय महिला, साकूर येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 55 व 27 वर्षीय महिला आणि 10 वर्षीय मुलगी, भोजरीतील 19 वर्षीय तरुण, बोटा येथील 20 वर्षीय तरुणी, आश्वी बु. येथील 45 वर्षीय इसमासह 34 वर्षीय तरुण व 32 वर्षीय महिला, आश्वी खुर्दमधील 47, 46 व 27 वर्षीय महिला, खांबे येथील 27 वर्षीय तरुण व 27 वर्षीय महिला, झोळे येथील 75 वर्षीय वयोवृद्धासह 26 वर्षीय तरुण, निमगाव टेंभी येथील 47 वर्षीय इसमासह 43 वर्षीय तरुण, चंदनापूरीतील 45 वर्षीय इसमासह 14 वर्षीय मुलगा,
निमोण येथील 32 वर्षीय तरुण, चिंचोली गुरव येथील 50 वर्षीय इसम, कौठे कमळेश्वर येथील 56 व 28 वर्षीय महिलांसह 10 व 5 वर्षीय मुले, सांगवी येथील 48 वर्षीय इसम, धांदरफळ खुर्दमधील 71 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 25 वर्षीय तरुण, वरुडी पठार येथील 48 वर्षीय महिला, ओझर खुर्द येथील 48 वर्षीय इसम, पिंपरणे येथील 34 वर्षीय तरुण, प्रतापपूर येथील 32 वर्षीय तरुण, मालदाड येथील 72 वर्षीय वयोवृद्ध इसम, पारेगाव बु. येथील 63 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, अकलापूर येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, समनापूर येथील 36 वर्षीय तरुण व अन्य तालुक्यातील श्रीरामपूर येथील 70 वर्षीय महिला, रुंभोडी येथील 23 वर्षीय तरुण, सिद्धटेक येथील 33 वर्षीय तरुण आणि अखोनी येथील तीन वर्षीय बालक अशा एकूण 88 जणांचे अहवाल आज पॉझिटिव्ह आले आहेत.
जिल्ह्यातील रुग्णसंख्याही आज सलग दुसर्या दिवशी एक हजारांच्या आंत राहीली. आज जिल्ह्यात सर्वाधीक 92 रुग्ण श्रीगोंदा तालुक्यातून समोर आले, त्या खालोखाल पारनेर व संगमनेर प्रत्येकी 88, नेवासा 67, जामखेड 60, पाथर्डी 57, नगर ग्रामीण 54, श्रीरामपूर 51, शेवगाव 49, राहाता 47, राहुरी 42, अकोले 40, कर्जत 32, कोपरगाव 30, अहमदनगर महापालिका क्षेत्र 27, इतर जिल्ह्यातील 17 आणि भिंागार लष्करी परिसरातील दोघांचा त्यात समावेश आहे. आजच्या रुग्णवाढीने जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता 2 लाख 67 हजार 85 झाली आहे.