टायर फुटल्याने ट्रक उलटला; वाहतूक विस्कळीत

नायक वृत्तसेवा, घारगाव
टायर फुटल्यामुळे मल्चिंग पेपर घेऊन जाणारा आयशर ट्रक पलटी झाल्याची घटना घटना नाशिक-पुणे महामार्गावरील घारगाव (ता.संगमनेर) परिसरात बुधवारी (ता.1) घडली आहे. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असून अपघातात ट्रक आणि ट्रकमधील मालाचे नुकसान झाले आहे. तर तब्बल नऊ तास वाहतूक खोळंबली होती.

नाशिक येथून सातार्‍याला मल्चिंग पेपर घेवून जात असलेला आयशर ट्रक (एम.एच.43, यू.8159) संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात पहाटे तीन वाजेच्या सुमारास आला असता ट्रकचा पुढील टायर फुटला. त्यामुळे सातारा येथील चालक सुनील शिंदे यांचा गाडीवरील ताबा सुटला. त्यानंतर ट्रक उपरस्त्यावर पलटी झाला. या भागात नेहमी वर्दळ असते. पहाटे अपघात झाल्याने मोठी जीवितहानी टळली. वाहतूक विस्कळीत झाली असून तब्बल नऊ तास वाहतूक खोळंबा झाला होता. या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.

Visits: 186 Today: 1 Total: 2165535

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *