तब्बल दिड महिन्यानंतर संगमनेर तालुक्याला मिळाला मोठा दिलासा! तालुक्याची रुग्णसंख्या दोन आकड्यांत; जिल्ह्यात आज 61 जणांचा कोविडने मृत्यू..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
मोठ्या कालावधीनंतर आज संगमनेरकरांना मोठा दिलासा मिळाला असून तब्बल 49 दिवसांनंतर तालुक्याची रुग्णसंख्या दोन आकड्यात आली आहे. एकीकडे जिल्ह्यातील रुग्णसंख्येला ओहोटी लागलेली असतांना दुसरीकडे तालुक्याच्या रुग्णसंख्येचा फुगवटा कायम होता. मात्र गेल्या चार दिवसांपासून तालुक्याच्या रुग्णसंख्येतही मोठी घसरण झाली असून आज तालुक्यातून अवघे 90 रुग्ण समोर आहेत, त्यात शहरातील केवळ सतरा तर अन्य तालुक्यातील आठ जणांचा समावेश आहे. आजच्या रुग्णवाढीने तालुक्याची एकूण रुग्णसंख्या आता 21 हजार 660 झाली आहे. आज तालुक्यातील 168 जणांना उपचार पूर्ण झाल्याने घरी सोडण्यात आले.
एप्रिलमध्ये रुग्णसंख्येचा नवा उच्चांक प्रस्थापित करणार्या संगमनेर तालुक्यात मे महिन्यातही मोठी रुग्णवाढ झाली. त्यामुळे जिल्ह्याच्या रुग्णसंख्येला ओहोटी लागलेली असतांनाही तालुक्यातील चिंता मात्र कायम होत्या. परंतु गेल्या चार दिवसांपासून तालुक्यातील संक्रमणातही एकसारखी घट होत असल्याचे दिलासादायक चित्र दिसत असून आजतर तब्बल 49 दिवसांनंतर तालुक्याची रुग्णसंख्या दोन आकड्यात आली आहे. यापूर्वी 11 एप्रिल रोजी तालुक्यात 74 रुग्ण आढळले होते, त्यानंतर कालच्या शनिवारपर्यंत तालुक्याची रुग्णसंख्या तीन आकड्यांतच समोर येत गेल्याने तालुक्याची कोविड स्थिती अतिशय चिंताजनक झाली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यानंतर आता तालुक्यातूनही कोविडची माघार सुरु झाल्याने कोविडचे दुसरे संक्रमण आटोक्यात येत असल्याचे अत्यंत दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे.
आज शासकीय प्रयोगशाळेच्या 43, खासगी प्रयोगशाळेच्या 26 आणि रॅपीड अँटीजेनच्या 21 अहवालातून संगमनेर तालुक्यातील 90 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात शहरातील अवघ्या सतरा, अन्य तालुक्यातील आठ आणि तालुक्याच्या ग्रामीणभागातील 65 जणांचा समावेश आहे. आजच्या अहवालातून शहरातील मालदाड रोडवरील 47 वर्षीय इसमासह 20, 18 व 17 वर्षीय तरुण आणि 40 वर्षीय महिला आणि 19 वर्षीय तरुणी, परदेशपूर्यातील 42 वर्षीय इसमासी 38 वर्षीय महिला, चंद्रशेखर चौकातील 17 वर्षीय तरुण, अभंग मळ्यातील 41 वर्षीय तरुण व संगमनेर असा उल्लेख असलेल्या 79 व 78 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांसह 49 वर्षीय दोघे इसम, 26 वर्षीय महिला आणि 10 व चार वर्षांची मुले बाधित झाली आहेत.
त्यासोबतच तालुक्याच्या ग्रामीणभागातील लोहारे येथील आठ वर्षीय मुलगा, कौठे कमळेश्वर येथील 47 वर्षीय इसम, डिग्रज येथील 20 वर्षीय तरुणी, सुकेवाडी येथील 50 वर्षीय महिला, पिंपळगाव कोंझिरा येथील 32 वर्षीय तरुण, सायखिंडीतील 45 वर्षीय इसम, कोल्हेवाडीतील 18 वर्षीय तरुण, औरंगपूर येथील 52 व 25 वर्षीय महिला, नांदूर खंदरमाळ येथील 50 वर्षीय इसम, झरेकाठी येथील 48 व 28 वर्षीय महिला, धांदरफळ बु. येथील 74 वर्षीय इसमासह चार वर्षीय बालक, कासारा दुमाला येथील 70 वर्षीय महिला, बोटा येथील 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, दाढ खुर्द येथील 37 वर्षीय तरुण, जोर्वे येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, रहिमपूर येथील 30 वर्षीय महिला, निमगाव जाळीतील 28 व 24 वर्षीय तरुण, ओझर खुर्दमधील 40 वर्षीय इसमासह 21 वर्षीय तरुणी,
आश्वी बु. येथील 45 वर्षीय इसमासह 25 वर्षीय महिला, शेडगाव येथील 46 वर्षीय महिलेसह 30 वर्षीय तरुण, आश्वी खुर्द येथील 65 वर्षीय महिला, राजापूरातील 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 67 वर्षीय महिला आणि 45 वर्षीय इसम, बोडखेवाडीतील 50 वर्षीय इसम, साकूर येथील आठ वर्षीय मुलगा, शिबलापूर येथील 65 व 31 वर्षीय महिला, जवळे कडलग येथील 85, 55 व 50 वर्षीय महिलांसह 39 व 22 वर्षीय तरुण, वडगाव लांडगा येथील 32 वर्षीय तरुण, 22 वर्षीय महिला व 13 वर्षीय मुलगा, खळी येथील 54 वर्षीय इसमासह 45 वर्षीय महिला, चिंचपूर येथील 50 वर्षीय महिला, वेल्हाळे येथील 53 वर्षीय इसमासह 32 वर्षीय तरुण, घुलेवाडीतील 52 व 50 वर्षीय इसमांसह 30 वर्षीय तरुण,
गुंजाळवाडीतील 30 वर्षीय तरुण, सोनेवाडीतील 53 वर्षीय महिलेसह 30 वर्षीय तरुण आणि नऊ वर्षीय बालिका, चिकणी येथील 54 वर्षीय इसम, पळसखेडे येथील 33 वर्षीय तरुणासह 16 वर्षीय मुलगा, पोखरी बाळेश्वर येथील 52 वर्षीय इसम, कर्हे येथील 47 व 40 वर्षीय महिलांसह बारा वर्षीय मुलगा, निमोण येथील 32 वर्षीय तरुण आणि अकलापूर येथील 70 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याशिवाय अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथील 21 वर्षीय तरुण, गणोरे येथील 25 वर्षीय महिला, धुमाळवाडीतील 28 वर्षीय तरुण, अहमदनगरच्या बुरुडगल्लीतील 60 वर्षीय महिला, कर्जत मधील 46 वर्षीय महिलेसह 36 वर्षीय तरुण व जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील 30 वर्षीय तरुण अशा एकूण 90 जणांना संक्रमण झाल्याचे अहवाल प्राप्त झाले आहेत.
जिल्ह्यात आज 61 जणांचा कोविडने घेतला बळी!
सलग नवव्या दिवशी जिल्ह्यातील रुग्णसंख्या घसरणीला असली तरीही कोविडच्या संक्रमणातून मृत्यूमुखी पडणार्यांची संख्या मात्र आजही समोर येत असून गेल्या चोवीस तासात जिल्ह्यातील तब्बल 61 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोविड बळींची संख्या आता 3 हजार 173 झाली आहे. जिल्ह्यात आज नेवासा, शेवगाव, पाथर्डी आणि जामखेड या चार तालुक्यातून शंभरापेक्षा अधिक रुग्ण समोर आले असून उर्वरीत दहा तालुक्यातील रुग्णसंख्या दोन आकड्यात आली आहे. जिल्ह्यात आज 1 हजार 440 रुग्ण आढळले तर 1 हजार 145 जणांना आज घरी सोडण्यात आले. जिल्ह्यात आत्तापर्यंत 2 लाख 46 हजार 187 जणांवर उपचार पूर्ण झाले असून जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याची सरासरी आता 94.24 टक्के झाली आहे.
शासकीय प्रयोगशाळेचे 465, खासगी प्रयोगशाळेचे 577 आणि रॅपीड अँटीजेनच्या 398 निष्कर्षातून आज जिल्ह्यातील 1 हजार 440 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात सर्वाधीक नेवासा तालुक्यातून 187, शेवगाव तालुक्यातून 182, पाथर्डी तालुक्यातून 120 व जामखेड तालुक्यातून 109 रुग्ण समोर आले आहेत. जिल्ह्यातील उर्वरीत तालुक्यात कोपरगाव 98, कर्जत 94, पारनेर 93, संगमनेर 90, श्रीरामपूर 87, राहुरी 69, नगर ग्रामीण 68, राहाता 59, अहमदनगर महापालिका क्षेत्र 58, श्रीगोंदा 48, अकोले 47, इतर जिल्ह्यातील 19, लष्करी रुग्णालयातील पाच, भिंगार लष्करी परिसरातील चार व इतर राज्यातील तिघांचा समावेश आहे. आजच्या रुग्णवाढीने जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या आता 2 लाख 61 हजार 223 झाली आहे.
जिल्ह्यातील आणखी एका पत्रकाराचा बळी..
कोविडच्या भयातही वाचकांच्या मनातील बातम्यांची भूक भागवण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणार्या पत्रकारांचे कोविडने बळी जाण्याची श्रृंखला आजही कायम असून आज अकोले येथील पत्रकार सुभाष खरबस यांचे कोविड संक्रमणाने निधन झाले. गेल्या 11 मे पासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. सुरुवातीला त्यांना संगमनेरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा न झाल्याने त्यांना नाशिकला हलविण्यात आले होते, मात्र तरीही त्यांचा जीव वाचू शकला नाही. खरबस यांच्या रुपाने राज्यातील 137 वा पत्रकार कोविडचा बळी ठरला आहे, मात्र राज्य सरकारने पत्रकारांसाठी कोणतीही योजना जाहीर केलेली नाही. देशातील मृत्यूमुखी पडलेल्या 67 पत्रकारांना केंद्र सरकारने प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली होती, त्यात टीव्ही9 चे पत्रकार पांडूरंग रायकर यांचाही समावेश आहे. मात्र राज्याने आत्तापर्यंत पत्रकारांना आश्वासने सोडून काहीच दिलेले नाही.