जिल्ह्यासह संगमनेर तालुक्यातून कोविडची माघार सुरु! जिल्ह्यात सलग दुसर्‍या दिवशी निचांकी रुग्णसंख्या; तालुक्याच्या रुग्णसंख्येतही मोठी घट..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
मागील आठ दिवसांपासून जिल्ह्याच्या रुग्णसंख्येला लागलेली ओहोटी कायम असून आज सलग दुसर्‍या दिवशी जिल्ह्यात निचांकी रुग्ण आढळले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आजच्या एकूण रुग्णसंख्येत संगमनेर तालुक्याच्या रुग्णसंख्येतही मोठी घट नोंदविली गेली असून शहरातील अवघ्या 19 जणांसह तालुक्यातील अवघ्या 131 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, त्यातही चौघे अकोले तालुक्यातील आहेत. आजच्या रुग्णवाढीने तालुका आता 21 हजार 478 रुग्णसंख्येवर पोहोचला आहे. आज जिल्ह्याच्या रुग्णसंख्येतही मोठी घट होवून अवघे 1 हजार 408 रुग्ण समोर आले. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून रुग्णसंख्येचे धक्क्यामागून धक्के सोसणार्‍या जिल्ह्यासह संगमनेर तालुक्याला मोठा दिलासा मिळाला आहे.


गेल्या चार दिवसांत बुधवारचा अपवाद वगळता संगमनेर तालुक्यातील रुग्णसंख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे. आजही त्यात सातत्य राहील्याने गेल्या दोन-अडिच महिन्यांपासून उच्चांकी रुग्णवाढीने भयभीत झालेल्या संगमनेरकरांना मोठा दिलासा मिळाल्याचे चित्र दिसू लागले आहे. तालुक्याच्या सरासरीतही घट होत असून मोठ्या कालावधीनंतर तालुक्याची सरासरी तिनशेहून खाली आली आहे. मे महिन्यातील 1 ते 21 या तीन आठवड्यांमध्ये तालुक्यातील संक्रमण अतिशय तेजीत होते. या कालावधीत तालुक्यातील सरासरी रुग्णवाढीचा वेग तब्बल 325 रुग्ण दररोज इतका प्रचंड होता. मात्र गेल्या सात दिवसांचा विचार करता त्यात टप्प्याटप्प्याने घट झाली असून मागील सात दिवसांची सरासरी एप्रिलच्या सरासरीपेक्षाही कमी म्हणजे 211 रुग्ण दररोज या गतीपर्यंत खाली आली आहे. उच्चांकी रुग्णसंख्येचे धक्के सहन करणार्‍या संगमनेरकरांना हा मोठा दिलासा आहे.


आज शासकीय प्रयोगशाळेचे 28, खासगी प्रयोगशाळेचे 70 आणि रॅपीड अँटीजेन चाचणीद्वारा 33 अशा एकूण 131 अहवालातून तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले आहेत. त्यात संगमनेर शहरातील देवी गल्लीतील 67 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, नवीन नगर रस्त्यावरील 69 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, अकोले नाक्यावरील 38 वर्षीय तरुण, पंचायत समिती परिसरातील 45 वर्षीय इसम, सावरकर मार्गावरील 39 वर्षीय तरुण, बुद्ध विहार परिसरातील 36 वर्षीय महिला, तांदुळ बाजारातील (रंगारगल्ली) 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, वडजे मळ्यातील 38 वर्षीय तरुण, ऑरेंज कॉर्नरवरील 30 वर्षीय महिला, मालदाड रोडवरील 64 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 59 वर्षीय महिला, सावता माळी नगरमधील 53 वर्षीय महिला, नायकवाडपूर्‍यातील 36 वर्षीय महिला व संगमनेर असा पत्ता असलेल्या 82 व 71 वर्षीय महिलांसह 39, 37, 22 व 19 वर्षीय तरुणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.


आजच्या अहवालातून तालुक्यातील 62 गावे आणि वाड्या-वस्त्यातून 107 संक्रमित रुग्ण आढळले असून त्यात वाघापूर येथील 28 वर्षीय महिलेसह 14 वर्षीय मुलगी, धांदरफळ बु. येथील 80 वर्षीय वयोवृद्धासह 76 वर्षीय महिला, पोखरी हवेलीतील 27 वर्षीय तरुण, साकूर येथील 29 वर्षीय तरुण, जाखुरी येथील 71 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, समनापूर येथील 53 वर्षीय इसम, निळवंडे येथील 38 वर्षीय तरुण, वडगाव पान येथील 20 वर्षीय तरुणी, कनोली येथील 24 वर्षीय तरुण, मनोली येथील 28 वर्षीय तरुण, आंबी खालसा येथील 45 वर्षीय इसम, दाढ खुर्द येथील 32 वर्षीय महिला, मंगळापूर येथील 35 वर्षीय तरुण, पावबाकीतील 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, निंभाळे येथील 48 वर्षीय इसम, तळेगाव दिघे येथील 55 वर्षीय इसमासह 40 वर्षीय महिला व पाच वर्षीय बालिका, रायतेवाडीतील 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, सोनेवाडीतील 35 वर्षीय तरुण,


जोर्वे येथील 42 वर्षीय तरुणासह 12 वर्षीय बालिका, माळेगाव हवेलीतील 54 वर्षीय इसम, पेमगिरीतील 32 वर्षीय तरुण, 32 वर्षीय महिला व दोन वर्षीय बालक, पिंपळगाव माथा येथील 50 वर्षीय महिला, चिकणी येथील 51 वर्षीय इसम, खंदरमाळ येथील 35 वर्षीय महिला, घारगाव येथील 51 वर्षीय इसम, लोहारे येथील 40 वर्षीय तरुण, निमज येथील 46 वर्षीय इसम, चिखलीतील 40 वर्षीय महिला, चणेगावातील 30 वर्षीय तरुण, निमगाव जाळीतील 27 व 22 वर्षीय तरुणांसह 25 वर्षीय महिला, कोकणगाव येथील 67 वर्षीय महिलेसह 14 वर्षीय मुलगा, रहिमपूर येथील 31 वर्षीय तरुण, आश्‍वी बु. येथील 70 व 38 वर्षीय महिला आणि 30 वर्षीय तरुण, उंबरी बाळापूर येथील 34 वर्षीय तरुणासह 30 वर्षीय महिला, निमगाव भोजापूर येथील 48 वर्षीय इसम, खळी येथील 48 वर्षीय इसम, शिंदोडीतील 58 वर्षीय महिला,


वरवंडी येथील 51 वर्षीय इसमासह 36 वर्षीय तरुण, 59 व 30 वर्षीय दोन महिला आणि 10 वर्षीय मुलगा, नांदूर येथील 38 वर्षीय महिलेसह 30 वर्षीय तरुण व 19 वर्षीय तरुणी, सुकेवाडीतील 47 व 24 वर्षीय महिलांसह 45 वर्षीय इसम, पळसखेडे येथील 14 वर्षीय मुलगा, कर्‍हे येथील 50 वर्षीय महिलेसह 27 वर्षीय तरुण, गुंजाळवाडीतील 50 वर्षीय इसमासह 27 व 17 वर्षीय तरुण आणि 46 वर्षीय महिला, मालदाड येथील 38, 36 व 20 वर्षीय तरुण आणि 15 व 13 वर्षीय मुली, आनंदवाडीतील 55 वर्षीय महिला, सावरगाव तळ येथील 58 वर्षीय इसमासह 25 वर्षीय तरुण, टाकेवाडीतील 35 वर्षीय महिलेसह सहा वर्षीय बालिका, खांडगाव येथील 38 वर्षीय तरुण, हिवरगाव पावसा येथील 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, गुंजाळवाडी पठारावरील 55 वर्षीय महिला, चंदनापूरीतील 22 वर्षीय तरुण, संगमनेर खुर्दमधील 30 व 23 वर्षीय तरुण,


सायखिंडीतील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 50 वर्षीय इसम व 65 वर्षीय महिला, जवळे कडलग येथील 85 व 55 वर्षीय महिला, झरेकाठी येथील 19 वर्षीय तरुण, मालुंजे येथील 27 व 21 वर्षीय तरुण, आश्‍वी खुर्दमधील 72 वर्षीय महिलेसह 51 वर्षीय इसम व 26 वर्षीय तरुण, खांबे येथील 60 वर्षीय महिलेसह 50 वर्षीय इसम, शिरापूर येथील 22 वर्षीय महिला व घुलेवाडी शिवारातील 64 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 52 व 47 वर्षीय इसम, 39 वर्षीय तरुण आणि 62 व 23 वर्षीय महिला तसेच अकोले तालुक्यातील राजूर येथील 23 वर्षीय तरुण, कोतुळ येथील 41 वर्षीय तरुण, मुथाळणे येथील 30 वर्षीय तरुण, नागवाडी येथील 40 वर्षीय तरुण व नायकवाडी येथील चाळीस वर्षीय महिला अशा एकूण 131 जणांना कोविडचे संक्रमण झाले आहे.

जिल्ह्यात सलग दुसर्‍या दिवशी ‘निचांकी’ रुग्ण!

गेल्या आठवठ्यापासून अपवाद वगळता जिल्ह्याची दैनंदिन रुग्णसंख्या दोन हजारांच्या खाली आली आहे, त्यामुळे मोठ्या कालावधीनंतर जिल्हावासियांना मोठा दिलासा मिळाला आहे. आजच्या अहवालाचे विशेष म्हणजे जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्याने आज दोनशे रुग्णसंख्या गाठली नसून पारनेर, शेवगाव, संगमनेर व अकोले या चार तालुक्यातूनच शंभराहून अधिक रुग्ण समोर आले आहेत. आज जिल्ह्यातील सर्वाधीक 173 रुग्ण पारनेर तालुक्यात तर 172 रुग्ण शेवगाव तालुक्यात आढळले. त्या खालोखाल संगमनेर 131, अकोले 119, श्रीरामपूर 94, जामखेड व पाथर्डी प्रत्येकी 92, राहुरी 89, कोपरगाव 86, नगर ग्रामीण 74, अहमदनगर महापालिका क्षेत्र 68, कर्जत 47, इतर जिल्ह्यातील 46, नेवासा व श्रीगोंदा प्रत्येकी 39, राहाता 32, भिंगार लष्करी परिसर 14 आणि इतर राज्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. आजच्या रुग्णवाढीने जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता 2 लाख 58 हजार 195 झाली आहे.

Visits: 88 Today: 1 Total: 1113296

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *