चिकणीमध्ये कॉ.धोंडिबा वर्पे यांना स्मृतीदिनानिमित्त अभिवादन
चिकणीमध्ये कॉ.धोंडिबा वर्पे यांना स्मृतीदिनानिमित्त अभिवादन
नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यातील शेतकर्यांच्या मागण्यांसाठी आवाज उठविणारे डाव्या विचारसरणीचे संगमनेर तालुक्यातील चिकणी येथील नेतृत्व स्व.कॉम्रेड धोंडिबा विष्णू वर्पे यांच्या स्मृतींना आज (शुक्रवार ता.11) उजाळा देत प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.
राज्यातील शेतकरी कामगारांच्या मागण्यांसाठी दिल्लीला निघालेल्या पहिला मोर्चाचे नेतृत्व तरुण नेते स्व.कॉम्रेड धोंडिबा वर्पे यांचेकडे होते. दरम्यान, 11 सप्टेंबर, 1963 रोजी पाचोरा स्टेशनवर गाडी सुरु झाल्यावर दुपारी 1 वाजता सिग्नलच्या खांबाचा धक्का लागून त्यांचा दुर्देवी मृत्यू आला. यावेळी त्यांचे वय अवघे 25 वर्षाचे होते. त्यांच्या निधनामुळे अहमदनगर जिल्ह्यातील कामगार व शेतकरी चळवळीची अपरिमित हानी झाली. एका चांगल्या संघटक नेत्याला कम्युनिष्ट पार्टीला मुकावे लागले. ते संगमनेर तालुका कम्युनिष्ट पार्टीचे सचिव होते. तसेच अहमदनगर जिल्हा कौन्सिलचे सभासद व संगमनेर-अकोले तालुका लालबावटा विडी कामगार यूनियनचे उपाध्यक्षही होते. त्यावेळेस शोकसभेत एक मोठा निधी उभा करुन संगमनेर येथे त्यांचे स्मारक बांधण्याचे समितीने ठरविले होते. आज चिकणीमध्ये महाराष्ट्र विडी कामगार यूनियनचे नेते क्रॉम्रेड कारभारी उगले यांच्या प्रमुख उपस्थितीत स्मृतीदिन साजरा करण्यात आला. यावेळी अरुण नाईवाडी, राजेंद्र वर्पे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष आनंद वर्पे, शिवाजी वर्पे, राजेंद्र चांगदेव वर्पे, सुखदेव वर्पे, मोहन वर्पे आदी उपस्थित होते.