श्रीरामपूर शहर पोलिसांनी संशयित टेम्पो पकडला टेम्पोसह 59 दूध भुकटीची पाकिटे घेतली ताब्यात

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
दूध भेसळीसाठी वापरल्या जाणार्‍या संशयावरून 59 भुकटीची पाकिटे भरलेला टेम्पो शहर पोलिसांनी सोमवारी (ता.24) रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास येथील अशोक टॉकीज परिसरात पकडला आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, घटनास्थळी दोन शेजार्‍यांमध्ये रात्रीच्या वेळी वाद झाल्याने एकाने वादाची माहिती पोलिसांना कळविली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तेथून पोलिसांनी एका टेम्पोसह 25 किलो वजनाच्या दूध भेसळीसाठी वापरल्या जाणार्‍या संशयावरून 59 भुकटीची पाकिटे ताब्यात घेतली.

याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाला रात्रीच माहिती देत पोलीस ठाण्यात नोंद केली. याबाबत आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी दिवसभरात अन्न आणि औषध तपासणी पथकाला पोलिसांकडून तीन ते चार वेळा निरोप पाठविण्यात आला. मात्र गुन्हा दाखल करण्याच्या कारवाईसाठी अन्न आणि औषध तपासणी पथकाकडून तत्परता दाखवली नसल्याने सायंकाळी उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नसल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. पोलिसांनी तातडीने ही कारवाई केली असून अन्न आणि औषध प्रशासनाच्या मदतीने गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी दिली.

Visits: 91 Today: 1 Total: 1109813

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *