महाविद्यालयीन तरुणीचा वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम

नायक वृत्तसेवा, संगमनेर
येथील व्यवसाय व्यवस्थापन शास्त्राचे शिक्षण घेणार्या एका महाविद्यालयीन तरुणीने वाढदिवसानिमित्त शहरातील वाणी हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांना चिंतन, प्राणायामचे धड देत नाश्ता खाऊ घालत अनोखा उपक्रम राबविला. याबद्दल तिचे शैक्षणिक वर्तुळासह सर्वत्र कौतुक होत आहे.

सध्या कोविडचे मोठे संकट संपूर्ण जगावर घोंगावत आहे. या पार्श्वभूमीवर अनेकजण आपापल्यापरीने मदत करत आहे. यामध्ये तरुणांचा सहभाग अग्रणी राहिला आहे. अशाच कामांची प्रेरणा घेऊन येथील ऐश्वर्या सोनवणे या व्यवसाय व्यवस्थापन शास्त्राचे (एमबीए) शिक्षण घेणार्या तरुणीने वाढदिवसानिमित्त कोरोना रुग्णांची सेवा करण्याचा संकल्प केला. त्यानुसार वाणी हॉस्पिटलमध्ये जात तेथील कोरोना रुग्णांना चिंतन व प्राणायामचे धडे देत नाश्ता खाऊ घालत संकल्पाला मूर्त रुप दिले. यामुळे रुग्णांना दिलासा मिळण्यास मोठी मदत होणार आहे. यावेळी डॉ.प्रतीक वाणी, डॉ.श्रद्धा वाणी आणि इतर कर्मचारी उपस्थित होते. तर तिच्या अनोख्या उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

आजची तरुण पिढी आपला वाढदिवस मोठमोठ्या पार्ट्या करून साजरा करतात. मात्र, ऐश्वर्या सोनवणे हिने राबविलेल्या उपक्रमाचा आदर्श इतरांनी घ्यावा. या जागतिक महामारीमध्ये रुग्णांसाठी व आरोग्य कर्मचार्यांसाठी जे काही आपल्या परीने करता येईल ते करण्याचा प्रयत्न करावा.
– डॉ.प्रतीक वाणी, संगमनेर
