पिंपळस शिवारात दोन बिबट्यांचा मुक्काम

पिंपळस शिवारात दोन बिबट्यांचा मुक्काम
नायक वृत्तसेवा, राहाता
शहराजवळील पिंपळस शिवारात गोदावरी उजव्या कालव्याच्या कडेला दोन बिबट्यांनी मुक्काम ठोकला आहे. यामुळे सकाळी व संध्याकाळी फिरायला येणार्‍या नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.


राहाता शहराजवळील पिंपळस शिवारातील सुमंत महाराज आश्रम रस्त्यावर दररोज शहरवासिय सकाळी व संध्याकाळी ि फिरायला येतात. मात्र, येथे दोन बिबट्यांनी मुक्काम ठोकल्याने त्यांच्यासह परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, या बिबट्यांनी तीन कुत्र्यांचा नुकताच फडशा पाडला आहे. त्यातील एक कुत्रे वीस फूट उंच असलेल्या बाभळीच्या झाडावर नेऊन ठेवले आहे. त्यामुळे वन विभागाने संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी येथे तातडीने पिंजरे लावणे गरजेचे आहे.

Visits: 263 Today: 1 Total: 2128703

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *