संगमनेर तालुक्यातील सात तर जिल्ह्यात बत्तीस जणांचा कोविडने मृत्यू! आजही जिल्ह्यात उच्चांकी रुग्णसंख्या; संगमनेर शहरातील संक्रमणात पुन्हा वाढ..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू असतांनाही नागरिकांचा आततायीपणा कोविड संक्रमणात भरच घालीत असून आजही जिल्ह्यासह संगमनेर तालुक्यात विक्रमी रुग्ण समोर आले आहेत. त्यातच ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरच्या पुरवठ्यातील अडथळे अद्यापही कायम असल्याने क्षणाक्षणाला रुग्णांच्या जीवाला घोर लागत आहे. वाढत्या संक्रमणात कोविडने मृत्यू होण्याच्या घटनाही वाढल्या असून आज दिवसभरात संगमनेर तालुक्यातील सात तर जिल्ह्यातील 32 जणांचा बळी गेला आहे. आज संगमनेर शहरातील संक्रमणात भर पडली असून शहरीभागातील 57 जणांसह तालुक्यातील तब्बल 226 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे तालुक्याची रुग्णसंख्या आता 12 हजार 771 झाली आहे. गेल्या चोवीस तासांत तालुक्यातील तब्बल बारा जणांचे कोविडने बळी घेतले आहेत.


मागील दोन दिवस काही प्रमाणात खालावलेल्या संगमनेर तालुक्यातील रुग्णसंख्येला आज पुन्हा एकदा भरती आली आहे. विशेष म्हणजे आज प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये जिल्हा शासकीय प्रयोगशाळेकडून एकही अहवाल मिळालेला नाही. असे असतांनाही तालुक्यातील तब्बल 226 जणांना संक्रमण झाल्याचे समोर आले आहे, यावरुन कोविडचा प्रादुर्भाव किती गतीमान आहे याचा सहज अंदाज बांधला जावू शकतो. त्यातच यावेळच्या संक्रमणातून मृत्यूचे प्रमाणही वाढले असून आज दिवसभरात सात तर गेल्या चोवीस तासांत बारा जणांचे बळी गेले आहेत. गेल्या वर्षभरात कोविडने घेतलेल्या बळींच्या संख्येला चालू महिन्यातील 22 दिवसांतच मागे टाकले आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.


आज खासगी प्रयोगशाळेचे 199 आणि रॅपीड अँटीजेन चाचणीद्वारा मिळालेल्या 27 निष्कर्षांवरुन तालुक्यातील 226 जणांना कोविडचे संक्रमण झाल्याचे समोर आले. त्यात शहरातील 57 जणांसह ग्रामीणभागातील 165 आणि इतर ठिकाणच्या चार जणांचा समावेश आहे. शहरातील अभिनवनगर मधील 24 वर्षीय तरुण, गणेशनगरमधील 73 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 45 वर्षीय इसम आणि 68 व 24 वर्षीय महिला, जनता नगरमधील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 28 व 23 वर्षीय तरुण आणि 40 व 33 वर्षीय महिला, नगर रस्त्यावरील 72 वर्षीय ज्येष्ठ नागरिक आणि 69 वर्षीय महिला, कुंभार आळ्यावरील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, मालदाड रोडवरील 47, 26 व 22 वर्षीय महिला, पार्श्‍वनाथ गल्लीतील 59 वर्षीय इसमासह 31 वर्षीय तरुण, साईनगरमधील 47 वर्षीय इसम, शिवाजीनगर मधील 47 वर्षीय इसमासह 21 वर्षीय तरुण,


इंदिरानगर मधील 70, 55, 40 व 26 वर्षीय महिला आणि 27 आणि 26 वर्षीय दोन तरुण, ताजणे मळ्यातील 39 वर्षीय महिलेसह 26 वर्षीरू तरुण, उपासणी गल्लीतील 51 वर्षीय महिला, विद्यानगरमधील 24 वर्षीय तरुण, वडजे मळ्यातील 30 वर्षीय महिला, लालाजी चौकातील 33 वर्षीय महिला, गोंविद नगरमधील 63 वर्षीय ज्येष्ठ नागरिक व 63 वर्षीय महिला, साईनाथ चौकातील 52 वर्षीय महिला, नवघर गल्लीतील 38 वर्षीय महिला, ऑरेंज कॉर्नरवरील 36 व 34 वर्षीय महिला, परदेशपुरा येथील 25 वर्षीय तरुण, भाजी बाजारातील 78 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, पंपींग स्टेशनजवळील 38 वर्षीय महिला, खंडोबागल्लीतील 42 वर्षीय तरुण, सुकेवाडी रोडवरील 56 वर्षीय इसम, सुविधा कॉलनीतील 57 वर्षीय इसम, मेहेर मळ्यातील 32 वर्षीय तरुण व संगमनेर असा पत्ता असलेल्या 75, 65, 48, 27 व 25 वर्षीय महिलांसह 52 वर्षीय इसम आणि 33, 24 व 22 वर्षीय दोन तरुण,


ग्रामीणभागातील लोहारे येथील 63 व 31 वर्षीय महिला, कासारा दुमाला येथील 46 वर्षीय इसम, मेंढवण येथील 71 वर्षीय महिला, निळवंडे येथील 44 वर्षीय महिला, करुले येथील 27 वर्षीय तरुण, पेमगिरी येथील 31 वर्षीय तरुण, ओझर बु. येथील 10 वर्षीय मुलगा, धांदरफळ बु. येथील 95 वर्षीय महिला, झोळे येथील 25 व 21 वर्षीय तरुण, वाघापूर येथील 52 वर्षीय इसमासह 51 वर्षीय महिला व 41 वर्षीय तरुण, वरवंडी येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, वडगाव पान येथील 57 व 49 वर्षीय इसमांसह 42 व 32 वर्षीय तरुण, तळेगाव दिघे येथील 30 वर्षीय महिला, निमज येथील 58 वर्षीय इसमासह 24 वर्षीय तरुण, सुकेवाडी येथील 16 वर्षीय तरुणी, माळेगाव हवेली येथील 45 वर्षीय इसम, मालुंजे येथील 72 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, निमोण येथील 50 वर्षीय दोघांसह 45 वर्षीय इसम, सायखिंडी येथील 36 वर्षीय तरुण, खांडगावच्या वैदुवाडीतील 67 वर्षीय ज्येष्ठ नागरिक,


कुरकुंडी येथील 23 वर्षीय तरुण, सावरगाव तळ येथील 56 वर्षीय इसम, खंदरमाळ येथील 47 वर्षीय महिला, शेळकेवाडीतील 50 वर्षीय महिला, सारोळे पठार येथील 80 वर्षीय वयोवृद्धासह 26 वर्षीय तरुण व 21 वर्षीय तरुणी, पिंपळगाव देपा येथील 48 वर्षीय इसम, पानोडी येथील 59 वर्षीय इसम, कुरकुटवाडी येथील 12 वर्षीय मुलगा, बोटा येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, 53 वर्षीय इसम, 32 वर्षीय तरुण व 3 व एक वर्षीय बालिका, भोजदरी येथील 65 वर्षीय महिला, मुंजेवाडीतील 20 वर्षीय तरुण, आंबी दुमाला येथील 58 वर्षीय इसमासह 25 वर्षीय महिला, 12 वर्षीय मुलगा व सात वर्षीय मुलगी, सोनुशी येथील 70 वर्षीय महिला, सोनेवाडीतील 73 वर्षीय महिला, पारेगाव बु. येथील 48 वर्षीय इसमासह 46 वर्षीय महिला व 34 वर्षीय तरुण, पारेगाव खुर्दमधील 63 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 40 वर्षीय महिला, पिंपळे येथील 52 वर्षीय महिला, पिंपळगाव कोंझिरा येथील 69 वर्षीय ज्येष्ठ नागरिक व 42 आणि 31 वर्षीय महिला,


पिंप्री लौकी येथील 73 वर्षीय महिला, पिंपरणे येथील 42 व 25 वर्षीय तरुण, रहिमपूर येथील 49 वर्षीय इसम, राजापूर येथील 49 व 45 वर्षीय इसम, रणखांब येथील 34 वर्षीय तरुण, रायतेवाडीतील 39, 35 व 30 वर्षीय तरुण आणि 22 वर्षीय महिला, समनापूर येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, 52 वर्षीय दोन इसम, 37, 32, 24 व 17 वर्षीय तरुण आणि 62, 57, 50, 33 व 22 वर्षीय महिला, संगमनेर खुर्द येथील 46 वर्षीय महिलेसह 41 वर्षीय तरुण, शिरापूर येथील 55 व 40 वर्षीय महिला, बिरेवाडीतील 60 व 45 वर्षीय महिलांसह 41 वर्षीय तरुण, मालदाड येथील 27 वर्षीय महिलेसह बारा वर्षीय मुलगी, अंभोरे येथील 52 वर्षीय इसम, चंदनापूरी येथील 54 व 45 वर्षीय इसमासह 31 वर्षीय महिला, चिंचपूर येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 52 वर्षीय महिला व 28 वर्षीय तरुण, चिखलीतील 78 वर्षीरू ज्येष्ठ नागरिक, चिंचोली गुरव येथील 75 वर्षीय महिला, देवकौठे येथील 42 वर्षीय तरुण,


घारगाव येथील 53 व 50 वर्षीय इसमांसह 46 वर्षीय महिला, 15 वर्षीय मुलगा व 15 वर्षीय मुलगी, उंबरी बाळापूर येथील 71, 55, 42, 35 व 28 वर्षीय महिला आणि 36 वर्षीय तरुण, गोल्डन सिटीतील 21 वर्षीय महिला, श्रीराम नगरमधील 24 वर्षीय महिला, गुंजाळवाडीतील 46 वर्षीय इसमासह 39, 30, 27, 22, 21 व 20 वर्षीय तरुण आणि 22 वर्षीय महिला, हिवरगाव पावसा येथील 49 वर्षीय इसम, जवळे कडलग येथील 21 वर्षीय तरुण, जोर्वे येथील 75 व 40 वर्षीय महिलांसह 42 व 32 वर्षीय तरुण आणि 17 वर्षीय दोघी तरुणी आणि 14 वर्षीय मुलगी, कनोली येथील 55 वर्षीय इसम व 41 वर्षीय तरुण, कर्‍हे येथील 67 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, 62 व 23 वर्षीय महिला, कोल्हेवाडीतील 40 वर्षीय तरुण, मनोलीतील 44 व 39 वर्षीय महिला आणि 26 वर्षीय तरुण, मिझोपूर येथील 52 वर्षीय महिला,


नान्नज दुमाला येथील 55 वर्षीय इसमासह 25 वर्षीय तरुण, निळवंडे येथील 51 वर्षीय इसमासह 25 वर्षीय महिला, निमगाव बु. येथील 21 वर्षीय तरुण, निमागव खुर्द येथील 45 वर्षीय इसम व घुलेवाडीतील 78, 53, 49, 47, 46, 43, 36, 35, 32 व 26 वर्षीय महिला आणि 59 वर्षीय इसमासह 35 वर्षीय दोन, 31 व 20 वर्षीय तरुण तसेच अंमळनेर येथील 73 वर्षीय महिला, राजूरी (श्रीरामपूर) येथील 68 वर्षीय महिला, कळवण (जि.नाशिक) येथील 53 वर्षीय महिला व राहुरी येथील 42 वर्षीय तरुण अशा एकूण 226 जणांचे अहवाल आज पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे संगमनेर तालुक्याची एकूण रुग्णसंख्या आता 12 हजार 771 झाली आहे.

जिल्ह्यातही आज उच्चाकी रुग्णवाढ झाली आहे. शासकीय प्रयोगशाळेचे 528, खासगी प्रयोगशाळेचे 1 हजार 434 आणि रॅपीड अँटीजेनमधून समोर आलेले 1 हजार 214 अशा जिल्ह्यातील 3 हजार 176 जणांना संक्रमण झाल्याचे आज समोर आले. त्यात अहमदनगर महापालिका क्षेत्रातील 615, कर्जत 336, राहाता 302, संगमनेर 226, नगर ग्रामीण 223, अकोले 197, कोपरगाव 178, श्रीरामपूर 174, राहुरी 158, पाथर्डी 141, नेवासा व शेवगाव प्रत्येकी 138, श्रीगोंदा 128, इतर जिल्ह्यातील 70, जामखेड 66, पारनेर 45, भिंगार लष्करी परिसर 26, लश्करी रुग्णालय 13 व इतर राज्यातील दोघांचा समावेश आहे. आज जिल्ह्यातील 3 हजार 65 रुग्णांना उपचारांती घरी सोडण्यात आले, तर दिवसभरात जिल्ह्यातील 32 जणांचा कोविडने बळी घेतला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोविड बळींची संख्या आता 1 हजार 688 झाली आहे. तर एकूण रुग्णसंख्या 1 लाख 48 हजार 446 तर रुग्ण बरे झालेल्यांची एकूण संख्या आता 1 लाख 24 हजार 690 झाली आहे. सध्या जिल्ह्यातील 22 हजार 68 जणांवर उपचार सुरु आहेत.

Visits: 27 Today: 1 Total: 114867

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *