संगमनेर व अकोले तालुक्याची कोविड स्थिती चिंताजनक अवस्थेत! आजही रुग्णसंख्येचा विस्फोट; संगमनेरातील सक्रीय रुग्णांची संख्या नऊशेच्या घरात.. चोवीस तासांत जिल्ह्यात पंधरा जणांचा कोविडने घेतला बळी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
जिल्ह्यात कोविड संक्रमणाच्या दुसर्या लाटेचा अक्षरशः उद्रेक झाला असून दररोज एकमेकांचे विक्रम मोडणार्या प्रचंड रुग्णसंख्येने संपूर्ण जिल्ह्याची अवस्था चिंताजनक स्थितीत नेवून पोहोचवली आहे. संगमनेर व अकोले तालुक्याची परिस्थितीही गेल्या काही दिवसांपासून बिघडली असून रुग्णालयातील खाटा तुडूंब झाल्या आहेत. आजही जिल्ह्यात रुग्णसंख्येचा नवा विक्रम झाला असून तब्बल 2 हजार 233 रुग्ण समोर आले आहेत. त्यामुळे जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता 1 लाख 9 हजार 401 वर पोहोचली आहे. संगमनेरातही आज तब्बल 198 रुग्ण आढळले असून त्यात शहरातील 46 जणांचा समावेश आहे. आजच्या रुग्णवाढीने तालुका आता 9 हजार 668 रुग्णसंख्येवर पोहोचला असून तालुक्यातील सक्रीय रुग्णांची संख्याही आता 886 वर गेली आहे. आज तालुक्यातील अवघ्या 63 रुग्णांना उपचारांती घरी सोडले गेले आहे.

एप्रिलच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यातील कोविडचे संक्रमण वेगात आले असून दररोजच्या मोठ्या रुग्णसंख्येमुळे जिल्ह्यातील आरोग्यस्थिती चिंताजनक पातळीवर पोहोचली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनाकडून तातडीच्या उपाययोजना सुरु करण्यात आल्या असून तालुक्यातील चौदा ठिकाणी कोविड केअर सेंटरची उभारणी केल्यानंतर आता डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरची संख्या वाढविण्यावर भर दिला जात आहे. त्यासाठी स्थानिक खासगी रुग्णालयांचे सहकार्य घेतले जात आहे. शहरी रुग्णांसाठी पालिकेच्या आवारातील कुटर रुग्णालयाच्या केनडी हॉलमध्ये व जोर्वे नाका परिसरातील आझाद मंगल कार्यालयात सुरु करण्यात आलेले कोविड केअर सेंटरही तुडूंब झाले असून शहरासाठी आणखी एका कोविड केअर सेंटरची चाचपणी सुरु झाली आहे. जिल्ह्यातील वाढत्या प्रादुर्भावाला गृहविलगीकरणातील रुग्ण कारणीभूत असल्याची चर्चा असून जिल्हाधिकार्यांच्या आदेशानंतरही अशा रुग्णांबाबत कठोर पाऊले उचलली जात नसल्याने जिल्ह्याचा प्रवास चिंतेकडून चिंताजनककडे सुरु झाला आहे.

आजही जिल्ह्यात आजवरच्या कोविड रुग्णसंख्येचे सर्व विक्रम मोडणारी रुग्णसंख्या समोर आली आहे. अर्थात जिल्हा रुग्णालयातील शासकीय प्रयोगशाळेसाठी घेण्यात आलेले ‘आरटीपीसीआर’ मशिन पूर्ण क्षमतेने कार्यान्वीत करण्यात आल्याने चाचण्यांचा वेग वाढला असून त्यामुळे रुग्णगती वाढल्याचे चित्र दिसत असल्याचे बोलले जात आहे. मात्र केवळ चाचण्या करुन चालणार नाही तर समोर आलेल्या रुग्णांवर आवश्यकतेनुसार उपचारांची व्यवस्था असेल तरच जिल्ह्याचे स्वास्थ टिकून राहणार असल्याने बाधित असलेल्या प्रत्येकाला उपचार कसे मिळतील याकडे अधिक गांभिर्याने पाहण्याची गरज आहे. पुढील काही दिवसांत जिल्ह्यातील संक्रमणात आणखी वाढ होण्याची भिती खुद्द जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी संगमनेर येथे व्यक्त केली होती. प्रशासन त्या दृष्टीने तयारी करीत आहे.

आज शासकीय प्रयोगशाळेच्या 859, खासगी प्रयोगशाळेच्या 549 आणि रॅपीड अँटीजेन चाचणीद्वारा 825 अशा जिल्ह्यातील एकूण 2 हजार 233 जणांचे स्राव चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात सर्वाधीक 611 रुग्ण अहमदनगर महापालिका क्षेत्रातून समोर आले असून कर्जत 201, संगमनेर 198, नगर ग्रामीण 187, अकोले 128, राहाता 117, पाथर्डी 114, राहुरी 107, शेवगाव 103, कोपरगाव 99, श्रीरामपूर 79, पारनेर 70, नेवासा 55, भिंगार लष्करी परिसर 54, जामखेड 47, श्रीगोंदा 40, इतर जिल्ह्यातील 17 व लष्कराच्या रुग्णालयातील सहा जणांचा समावेश आहे. आजच्या विक्रमी रुग्णवाढीने जिल्हा आता 1 लाख, 9 हजार 401 रुग्णसंख्येवर पोहोचला असून फेब्रुवारीत असलेली जिल्ह्याची 131 रुग्ण प्रतिदिवस ही सरासरी आता एप्रिल पहिल्या आठच दिवसांत तब्बल 1 हजार 810 रुग्ण दररोज इतक्या मोठ्या सरासरीवर पोहोचली आहे. जिल्ह्यातील 1 हजार 319 रुग्णांना आज उपचारानंतर घरी सोडण्यात आले. आत्तापर्यंत उपचार पूर्ण करणार्यांची एकूण संख्या आता 96 हजार 494 झाली असून रुग्ण बरे होण्याचा दर 88.20 टक्क्यांवर आला आहे. आज जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या 15 जणांचा कोविडने बळी घेतला असून एकूण मृतांची संख्या आता 1 हजार 270 झाली आहे.

आजच्या अहवालातून संगमनेर तालुक्यातील 198 जणांना संक्रमण झाल्याचे समोर आले आहे. आजच्या एकूण अहवालांपैकी शासकीय प्रयोगशाळेकडून 151, खासगी प्रयोगशाळेकडून 44 आणि रॅपीड अँटीजेन चाचणीद्वारा तीन अशा एकूण 198 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यात शहरातील 46 तर ग्रामीण क्षेत्रातील 152 रुग्णांचा समावेश आहे. आजच्या अहवालातून शहरातील मालदाड रोडवरील 70 व 69 वर्षीय ज्येष्ठांसह 57 व 45 वर्षीय इसम, 38 व 25 वर्षीय दोघे तरुण, 67, 38 व 32 वर्षीय महिला आणि 10 वर्षीय मुलीसह सात आणि दोन वर्षीय बालके, जनता नगरमधील 66 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 40 वर्षीय दोघे, 39 व 34 वर्षीय तरुण आणि 38 व 36 वर्षीय महिला, इंदिरानगरमधील 50 वर्षीय इसमासह 21 वर्षीय तरुण, विजयनगरमधील 27 वर्षीय महिला, शासकीय विश्रामगृह परिसरातील 55 वर्षीय इसम, विद्यानगर मधील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 54 व 43 वर्षीय इसम आणि 51 व 36 वर्षीय महिला,

मेनरोडवरील 46 वर्षीय इसमासह 65 वर्षीय महिला आणि 12 वर्षीय मुलगी, नेहरु चौकातील 65 वर्षीय महिलेसह दोन वर्षीय बालिका, प्रेरणानगर येथील 24 वर्षीय तरुण, वाडेकर गल्लीतील 42 वर्षीय महिला, पद्मनगरमधील 41 व 32 वर्षीय तरुणांसह 27 वर्षीय महिला, अकोले नाक्यावरील 46 वर्षीय महिला व संगमनेर असा पत्ता असलेल्या 37, 32, 29 व 17 वर्षीय तरुणांसह 29 वर्षीय महिला आणि सहा वर्षीय मुलगा, ग्रामीण भागातील डोळासणे येथील 35 व 23 वर्षीय महिलांसह 13 वर्षीय मुलगा, देवकौठे येथील 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 35 वर्षीय महिला, चिंचपूर येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 45 वर्षीय इसम, 28 वर्षीय तरुण, 40 वर्षीय महिला, 13 वर्षीय मुलगी व सात वर्षीय मुलगा, प्रतापपूर येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, उंबरी बाळापूर येथील 42 वर्षीय महिलेसह 29 व 27 वर्षीय तरुण, निमगाव जाळीतील 76 व 71 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांसह 56 व 47 वर्षीय इसम, 70, व 65 वर्षीय महिला आणि 19 वर्षीय तरुण,

जोर्वे येथील 36 व 25 वर्षीय महिलांसह 28 व 25 वर्षीय महिला व सोळा वर्षीय मुलगा, घुलेवाडी येथील 92 व 79 वर्षीय वयोवृद्धासह 53, 51, 50 व 49 वर्षीय इसम, 40, 38, 29, 20 व 18 वर्षीय तरुण, 51, 42, 41 व 25 वर्षीय महिला, 18 वर्षीय तरुणी, 8, 7 व चार वर्षांची दोन मुले, घागराव येथील 60 वर्षीय महिलेसह 30 वर्षीय तरुण, पिंपळगाव माथा येथील 22 वर्षीय तरुण, माळेगाव येथील 26 वर्षीय महिला, तळेगाव दिघे येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 45 व 43 वर्षीय इसम, 37, 31, 23 व 18 वर्षीय तरुण आणि 38 वर्षीय दोघींसह 30 वर्षीय महिला व नऊ वर्षीय बालिका, आश्वी खुर्दमधील 45 वर्षीय दोघा इसमांसह 29 व 24 वर्षीय तरुण आणि 24 वर्षीय महिला, आश्वी बु. येथील 38, 33 व 31 वर्षीय महिला, दाढ खुर्दमधील 52 वर्षीय इसमासह 40 वर्षीय महिला, वडगाव पान येथील 45 वर्षीय महिलेसह 28 व 25 वर्षीय तरुण, राजापूर येथील 77 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, समनापूर येथील 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, निमगाव बु. येथील 81 वर्षीय वयोवृद्धासह 31 वर्षीय तरुण व सात वर्षीय मुलगा,

कासारे येथील 45 वर्षीय इसमासह 22 वर्षीय तरुण, हिवरगाव पावसा येथील 51 वर्षीय महिलेसह टोल प्लाझावरील 30 वर्षीय तरुण, शिबलापूर येथील 33 वर्षीय तरुण, जवळे बाळेश्वर येथील 35 वर्षीय महिलेसह 10 वर्षीय मुलगा, शेडगाव येथील 40 वर्षीय महिलेसह 16 वर्षीय मुलगी व 13 वर्षीय मुलगा, धांदरफळ बु. येथील 24 वर्षीय तरुण, निळवंडे येथील 37 वर्षीय तरुण, गुंजाळवाडी येथील 53, 49, 48 व 45 इसमांसह 30 व 24 वर्षीय तरुण आणि 23 वर्षीय महिला, गोल्डन सिटीतील 45 वर्षीय इसमासह 37 वर्षीय तरुण, पोखरी हवेली येथील 56 वर्षीय इसम, सावरगाव तळ येथील 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 30 वर्षीय तरुण, मलकापूर येथील 46 वर्षीय इसमश सुकेवाडीतील 72 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 70 वर्षीय महिला आणि 33 व 20 वर्षीय तरुण, नांदुरी दुमाला येथील 52 वर्षीय इसमासह 37 वर्षीय तरुण आणि 30 वर्षीय महिला, माळेगाव पठार येथील 45 वर्षीय इसम, निमोण येथील 73 वर्षीय महिला, खराडी 32 वर्षीय तरुण,

पिंपरणे येथील 75 वर्षीय महिला, बोटा येथील 29 वर्षीय तरुण, संगमनेर खुर्दमधील 60 वर्षीय महिलेसह 22 वर्षीय तरुण, सारोळे पठार येथील 69 वर्षीय महिला, साकूर येथील 18, 17, 13, 15 व 13 वर्षीय विद्यार्थी व 18 व 14 वर्षीय विद्यार्थीनी, बोडखेवाडी येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, रायतेवाडी येथील 70, 42 व 34 वर्षीय महिला, निमगाव टेंभी येथील 23 वर्षीय तरुण, वैदुवाडीतील 27 वर्षीय महिला, कौठे धांदरफळ येथील 24 वर्षीय तरुण, जवळे कडलग येथील 20 वर्षीय तरुण, पिंपळगाव कोंझिरा येथील 41 वर्षीय तरुण, चिकणी येथील 30 वर्षीय तरुण,

चंदनापूरीतील 50 वर्षीय इसमासह 60 वर्षीय महिला व 35 व 21 वर्षीय तरुण, शिंदोडी येथील 55 वर्षीय महिला, झरेकाठी येथील 31 वर्षीय तरुण, खळी येथील 25 वर्षीय तरुण, मेंढवण येथील 40 वर्षीय तरुण, कोकणगाव येथील 52 वर्षीय इसम, पावबाकीतील 12 वर्षीय मुलगी, चिखलीतील 21 वर्षीय महिलेसह 11 वर्षीय मुलगी, चिंचोली गुरव येथील 30 वर्षीय तरुण व कौठे खुर्द येथील 34 व 32 वर्षीय तरुण अशा तालुक्यातील एकूण 198 जणांना कोविडचे संक्रमण झाले आहे. त्यामुळे संगमनेर तालुका आता 9 हजार 668 रुग्णसंख्येवर पोहोचला आहे. आज तालुक्यातील अवघ्या 63 जणांना घरी सोडण्यात आले, तर तालुक्यात तब्बल 886 रुग्ण सक्रीय संक्रमित आहेत.

