पुणतांबा परिसरात वारंवार वीज पुरवठा होतोय विस्कळीत

नायक वृत्तसेवा, राहाता
गेल्या काही दिवसांपासून पुणतांबा व परिसरात वारंवार वीज पुरवठ्यात विस्कळीतपणा येत असल्याने ऑनलाईन परीक्षा, ऑनलाईनचे वर्ग प्रभावित झाले आहेत. तसेच वाड्या-वस्त्यांवरील शेतकर्‍यांचा पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांसाठी पाणी कसे आणायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर गावठाण परिसरातील वीजेवर चालणारे व्यवसाय पूर्णत: कोलमडले असून आधीच कोरोनामुळे व्यवसाय बसले असून त्यामुळे आधीच नागरिकांचे हाल होत आहेत. त्यात भरमसाठ वीजबिल आणि विस्कळीत वीजपुरवठा होत असल्याने नागरिक, व्यापारी वर्ग हतबल झाले आहेत.

सतत होणार्‍या वीजेच्या लपंडावामुळे पुणतांबा गावाला पाणी पुरवठा करणारी योजना प्रभावित झाली आहे. तर मोबाईल टॉवरच्या बॅटर्‍या पूर्ण क्षमतेने चार्ज होत नसल्याने दूरसंचार सेवा सुद्धा कोलमडली जात असल्याने डॉक्टर, मेडिकल या सेवांबरोबर संपर्क करण्यात अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे या वीजेच्या लपंडावामुळे शेतकरी त्रस्त तर नागरिक हतबल झाले आहेत. यावर महावितरण कंपनीने तत्काळ तोडगा काढून दिलासा देण्याची गरज आहे.

Visits: 108 Today: 2 Total: 1105297

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *