‘कृष्णा टेक्सटाईल मार्केट’ दालनाचा दिमाखात शुभारंभ

‘कृष्णा टेक्सटाईल मार्केट’ दालनाचा दिमाखात शुभारंभ
नायक वृत्तसेवा, संगमनेर
नवरात्रीच्या दुसर्‍या माळेचे औचित्य साधत रविवारी (ता.18) संगमनेर शहरातील जुन्या पुणे-नाशिक महामार्गावर सह्याद्री महाविद्यालयासमोर ‘कृष्णा टेक्सटाईल मार्केट’ या दालनाचा मोठ्या दिमाखात शुभारंभ आमदार डॉ.सुधीर तांबे, साईभक्त इंगळे बाबा, उद्योगपती गिरीश मालपाणी यांच्या हस्ते झाला. यावेळी दालनाचे संचालक गोविंद गिल, भंवरलाल शर्मा, श्रीनिवास भंडारी आदी उपस्थित होते.


संगमनेर शहरात बाजारपेठेपासून अगदी मोकळ्या वातावरणात प्रशस्त दालनात वाहनतळाची सुविधा असलेल्या या आकर्षक दालनास ग्राहकांनी एकदा अवश्य भेट द्यावी असे आवाहन यावेळी संचालक श्रीनिवास भंडारी यांनी केले. दुमजली दालनात सर्व प्रकारचे कपडे, साड्या, नऊवार, रेडिमेड कपडे, ड्रेस मटेरियल, कुर्ता, पायजमा, कुर्तीज, लेगीज, पटियाला, हॅन्डलूम अशा असंख्य प्रकारचे कपडे उपलब्ध आहेत. हे दालन ग्राहकांच्या पसंतीस नक्कीच उतरेल अस शुभाशीर्वाद इंगळे बाबा यांनी दिला. तर उद्योगपती मालपाणी यांनी भंडारी आणि शर्मा परिवाराला शुभेच्छा देत संगमनेरच्या वैभवामध्ये आणखी एका कापड दालनाची भर घातल्याबद्दल कौतुक केलं. शहरातील बाजारपेठेत नेहमीच अनेक व्यापार्‍यांना वाहनतळाची समस्या जाणवते. मात्र हे दालन शहरापासून थोडसं दूर असलं तरी वाहने उभी करण्यासाठी मोठी जागा आहे. यामुळे ग्राहकांना मनसोक्त कपडे खरेदी करण्याचा आनंद लुटला येईल, असे आमदार डॉ.तांबे शुभारंभ प्रसंगी म्हणाले. याप्रसंगी माताजी अयोध्यादेवी गिल, गोविंद गिल, मनोज भंडारी, भंवरलाल शर्मा, जसराज शर्मा, अशोक शर्मा, कृष्णा गिल आदी उपस्थित होते. दरम्यान, या दालनाच्या नाशिक येथील गंगापूर रोड, अशोक स्तंभ, पाथर्डी फाटा येथे शाखा आहेत.

Visits: 130 Today: 2 Total: 1108207

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *