संगमनेर व अकोले तालुक्यावर ‘अखेर’ कोविडचा बॉम्ब फुटलाच! तालुक्यात कोविडच्या इतिहासातील आजवरची सर्वाधिक रुग्णसंख्या आली समोर..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या 1 मार्चपासून जिल्ह्यात सुरू झालेल्या कोविडच्या संक्रमणाने उग्र स्वरुप धारण केले असून दररोजच्या वाढत्या रुग्णसंख्येने तालुका हादरलेला असतांना आज कोविडच्या आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक रुग्णसंख्या समोर आली आहे. आज शासकीय प्रयोगशाळेचे 31, खासगी प्रयोगशाळेचे 116 व रॅपिड अँटीजेन चाचणीद्वारा एक अशा विक्रमी 148 जणांचे अहवाल संक्रमित आले आहेत. त्यात शहरातील 54, ग्रामीण भागातील 88 तर अन्य तालुक्यातील सहा रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे तालुक्याची रुग्णसंख्या एका झटक्यात 8 हजार 46 वर जावून पोहोचली आहे. त्यातील 554 रुग्ण सक्रीय आहेत. जिल्ह्यातही आज विक्रमी रुग्णवाढ झाली असून आज एकाच दिवशी तब्बल 1 हजार 338 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत.

गेल्या सुमारे महिन्यापासून तालुक्यात दररोज मोठ्या संख्येने रुग्ण समोर येत आहेत. कोविड नियंत्रणात आणताना केंद्र व राज्य शासनाकडून अनेक मर्यादा घालण्यात आल्याने जिल्हाधिकार्‍यांना सर्वकाही सुरळीत ठेवून बाधितांची संख्या कमी करण्याची कवायत करावी लागत आहे. त्यामुळे नियंत्रणाऐवजी जिल्हा पुन्हा एकदा अनियंत्रित होत असून रोजच्या वाढत्या सरासरीने जिल्हा पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या दिशेने पुढे जात आहे. संगमनेरात मो या प्रमाणात रुग्णवाढ होवूनही ना तालुक्यातील आठवडे बाजारांवर मर्यादा आली ना व्यवहारांवर. त्यामुळे कोविड रुग्णवाढीचा आलेख असाच झेपावत राहणार असल्याचा जाणकारांचा अंदाज आहे. आज अकोले तालुक्यातही विक्रमी 74 रुग्ण समोर आले आहेत. तालुक्याच्या कोविड इतिहासातील ही सर्वाधिक रुग्णवाढ आहे.

आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालातून शहरातील कोल्हेवाडी रोडवरील 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 45 वर्षीय इसम व 27 वर्षीय तरुण, साईनाथ चौकातील 60 वर्षीय इसम, महात्मा फुले नगरमधील 78 व 28 वर्षीय महिला, देवीगल्लीतील 43 वर्षीय तरुण, शिवाजीनगरमधील 80 वर्षीय ज्येष्ठासह 30 वर्षीय दोघे व 28 वर्षीय तरुण आणि 55 व 53 वर्षीय महिला, इंदिरानगर मधील 72 व 23 वर्षीय महिलांसह 28 वर्षीय तरुण, गोविंदनगर मधील 58 वर्षीय इसमासह 36 वर्षीय तरुण व 61 आणि 35 वर्षीय महिला, मालदाड रोडवरील 70 वर्षीय ज्येश्ठासह 46 वर्षीय इसम, 43, 38 व 22 वर्षीय तरुण आणि 44, 41, 26 वर्षीय दोघी महिला व 16 वर्षीय तरुणी, मेहेरमळा येथील 89 वर्षीय ज्येष्ठासह 40 व 28 वर्षीय महिला,

वृंदावन कॉलनीतील 9 वर्षीय बालिका, कुंथूनाथ सोसायटीतील 48 वर्षीय महिला, पावबाकी रोडवरील 52 वर्षीय दोघे इसम, नायकवाडपुर्‍यातील 39 वर्षीय महिला, विद्यानगर मधील 65 वर्षीय ज्येष्ठासह 34 वर्षीय तरुण व 47 वर्षीय महिला, नवीन नगर रोडवरील 45 व 43 इसम, श्रीराम सोसायटीतील 79 वर्षीय ज्येष्ठ, रंगारगल्लीतील 84 वर्षीय ज्येष्ठ, साईबन कॉलनीतील 29 वर्षीय तरुण, चैतन्यनगरमधील 28 वर्षीय तरुण, स्टेडियम जवळील 65 वर्षीय महिला, स्वामी समर्थ नगरमधील 81 वर्षीय महिला आणि गणेशनगर मधील 52 वर्षीय इसमासह 26 वर्षीय तरुण.

ग्रामीण भागातील गुंजाळवाडी शिवारातील 73 व 63 वर्षीय ज्येष्ठांसह 49 व 45 वर्षीय इसम आणि 35, 20 व 17 वर्षीय तरुण, घुलेवाडी शिवारातील 61 वर्षीय ज्येष्ठासह 45 वर्षीय इसम, 42, 41, 39 व 22 वर्षीय तरुण आणि 61, 60, 57 व 43 वर्षीय महिला, राजापूर येथील 50 व 25 वर्षीय महिला आणि 29 वर्षीय तरुण, पारेगाव येथील 80 वर्षीय महिला, आश्वी बु. येथील 52 व 40 वर्षीय महिला आणि 31 वर्षीय तरुण, आश्वी खुर्दमधील 33 वर्षीय महिला, कासारवाडीतील 37 वर्षीय महिलेसह 19 वर्षीय तरुणी, वडगावपान मधील 22 वर्षीय तरुण, रायतेवाडीतील 26 वर्षीय तरुण, मेंढवण येथील 57 वर्षीय इसम, सायखिंडीतील 49 वर्षीय इसम, बिरेवाडीतील 55 वर्षीय इसम, जवळे कडलग येथील 36 वर्षीय तरुण,

मंगळापूर येथील 55 वर्षीय इसमासह 35 वर्षीय तरुण, निमगाव बु. येथील 73 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, संगमनेर खुर्द परिसरातील 39 वर्षीय तरुणासह 41, 31 व 26 वर्षीय महिला, 16 वर्षीय तरुणी आणि 3 व 1 वर्षीय बालक, वेल्हाळे येथील 75 वर्षीय ज्येष्ठासह 35 वर्षीय तरुण, वाघापूर येथील 40 वर्षीय महिला, साकूर येथील 50 व 39 वर्षीय महिलांसह 31 व 21 वर्षीय तरुण, औरंगपूर येथील 48 वर्षीय इसम, मालुंजे येथील 86 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, चंदनापूरीतील 51 वर्षीय इसम, धांदरफळ बु. येथील 32 वर्षीय तरुण, मिरपूर येथील 42 व 20 वर्षीय महिला, नांदुरी दुमाला येथील 49 वर्षीय इसम, घारगाव येथील 85 वर्षीय ज्येष्ठासह 48 वर्षीय इसम आणि 48 व 45 वर्षीय महिला, हिवरगाव पावसा येथील 29 वर्षीय तरुण,

कोल्हेवाडी येथील 65 वर्षीय ज्येष्ठासह 39 वर्षीय तरुण व एक वर्षीय बालक, खांडगाव येथील 59 वर्षीय इसमासह 24 वर्षीय तरुण व 9 वर्षीय बालिका, कौठे कमळेश्वर येथील 37 वर्षीय तरुण, निमोण येथील 32 वर्षीय तरुण, जोर्वे येथील 64 वर्षीय महिला, सांगवी येथील 52 वर्षीय महिला व 34 वर्षीय तरुण, पिंपरणे येथील 3 वर्षीय बालक, शिबलापूर येथील 39 वर्षीय तरुण, माहेगाव हवेली येथील 76 वर्षीय ज्येष्ठासह 45 वर्षीय इसम आणि 38 वर्षीय महिलेसह 13 वर्षीय मुलगी, पिंपळगाव कोंझिरा येथील 39 वर्षीय इसमासह 38 वर्षीय तरुण व समनापूर येथील 53 वर्षीय महिलेसह 38 वर्षीय तरुण अशा 88 जणांचा तर अन्य तालुक्यातील बाळापूर येथील 27 वर्षीय तरुण, गणोरे येथील 88 वर्षीय ज्येष्ठ, डोंगरगाव येथील 50 वर्षीय इसम, मढी येथील 66 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, एकरुखे येथील 30 वर्षीय तरुण व राहाता येथील 23 वर्षीय तरुणांचे अहवालही पॉझिटिव्ह आले आहेत. आजच्या रुग्णवाढीने तालुका आता 8 हजार 46 झाली असून सक्रीय रुग्णांची संख्या 554 वर पोहोचली आहे.

गेल्यावर्षी एप्रिलमध्ये सुरू झालेल्या तालुक्यातील कोविड संक्रमणानंतर इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण समोर येण्याची आजची ही पहिलीच वेळ आहे. विशेष म्हणजे आज संगमनेर तालुक्यातील 142 जणांसह 148 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात तब्बल 116 जणांचे (78 टक्के) अहवाल खासगी प्रयोगशाळांकडून प्राप्त झाले आहेत. आजच्या रुग्णवाढीत टॉप पाचमध्ये अकोले तालुक्याचाही समावेश झाला असून तेथील 74 जणांना संक्रमण झाल्याचे समोर आले आहे.

Visits: 100 Today: 2 Total: 1104959

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *