‘त्या’ तरुणाची ओळख अद्यापही पटेना!

नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्याच्या दुर्गम भागातील येसरठाव शिवारात अर्धवट जळालेल्या अवस्थेत 25 ते 30 वर्षाच्या तरुणाचा मृतदेह आढळून खळबळजनक घटना रविवारी (ता.21) सकाळी उघडकीस आली आहे. अद्यापही तरुणाची ओळख पटलेली नसून पोलिसांनी ओळख पटविण्यासाठी आवाहन केले आहे.

याबाबत अकोले पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, येसरठाव येथील ठोगिरे यांच्या पासोडी नावाच्या शेतात रविवारी सकाळी धारदार शस्त्राने वार करुन अर्धवट जळालेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. याबाबत ज्ञानेश्वर कोंडिबा ठोगिरे यांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक दीपक ढोमणे यांनी पथकासह घटनास्थळाची पाहणी केली. त्यावेळी 5.7 फूट उंची, गळ्यात ओमसह धातूची साखळी व सँडल असे वर्णन आढळून आले. या प्रकरणी अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून, ओळख पटविण्यासाठी आवाहन केले आहे.
