निळवंडे प्रकल्पाच्या किमतींमध्ये वाढ होण्याची शक्यता ः चकोर

नायक वृत्तसेवा, संगमनेर
उत्तर नगर व नाशिक जिल्ह्यातील एकूण सात तालुक्यांमधील 182 गावांच्या शिवारातील सुमारे 1 लाख 59 हजार एकर इतके सिंचन क्षेत्र निर्मिती करणार्‍या व वरील दोन्ही जिल्ह्यांतील दुष्काळी भागास संजीवनी ठरणार्‍या निळवंडे प्रकल्पाच्या उर्वरित कामासाठी सन 2021-22 च्या अर्थसंकल्पात राज्य सरकारने केलेली 365 कोटी रुपये व नाबार्डकडून 101 कोटी रुपये असा एकूण 476 कोटी निधीची तरतूद स्वागतार्ह आहे. तथापि कालव्यांच्या व वितरण प्रणालीच्या कामांसाठी कराव्या लागणार्‍या भूसंपादनातील अडचणी, वाढीव आर्थिक मोबदला व कालवा संकल्पनातील करावे लागणारे बदल इत्यादींमुळे निळवंडे प्रकल्पाच्या किंमतीत सुधारित अंदाजानुसार सुमारे 550 कोटी रुपये म्हणजेच 25 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते अशी माहिती भाजपा अभियांत्रिकी सेल अहमदनगरचे जिल्हाध्यक्ष अभियंता हरिश्चंद्र चकोर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

निळवंडे धरणाच्या अकोले तालुक्यातील रखडलेल्या दोन्ही कालव्यांच्या कामांना दीड वर्षापूर्वी माजी मंत्री मधुकर पिचड व माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या पुढाकाराने शेतकर्‍यांसमवेत झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे खर्‍या अर्थाने गती मिळालेली आहे. तथापि कालव्यांच्या व वितरण प्रणालीच्या कामांसाठी लागणार्‍या भूसंपादनातील अडचणी, नवीन कायद्याप्रमाणे वाढीव भूसंपादन मोबदल्यायची शेतकर्‍यांची मागणी व कालवा संकल्पनात करावे लागलेले बदल इत्यादींमुळे तत्कालीन शासनाने मंजूर केलेल्या चतुर्थ सु.प्र.मा. प्रमाणे निळवंडे प्रकल्पाची किंमत 2369.95 कोटी इतकी असून उपरोक्त प्रमाणे नमूद केलेल्या बदलांमुळे 590 कोटी ज्यादा ही किंमत सुधारित अंदाजानुसार सुमारे 2970 कोटी म्हणजेच 25 टक्के पर्यंत जाऊ शकते. त्यासाठी पुनश्च या प्रकल्पास पंचम सुधारित प्रशासकीय मान्यता घेणे अपरिहार्य ठरणार असल्याचे चकोर यांनी बोलताना स्पष्ट केले आहे.

Visits: 18 Today: 1 Total: 115648

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *