संगमनेर तालुक्यातील बाधितांच्या संख्येत आजही पडली भर! शहरासह तालुक्यातील सोळा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरात कोविडचा प्रादुर्भाव वाढतच असून आजही शहरासह तालुक्याच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. रविवारी रात्री तालुक्याच्या बाधित संख्येत तब्बल 48 रुग्णांची भर पडल्यानंतर आजही शासकीय व खासगी प्रयोगशाळेसह रॅपिड एंटीजेन चाचणीतून तालुक्याच्या रुग्णसंख्या सोळा जणांची भर पडली आहे. विशेष म्हणजे या अहवालातून शहरातील अवघ्या तिघांना तर तालुक्यातील 13 जणांना संक्रमण झाल्याचे समोर आले आहे. तालुक्याच्या बाधित संख्येत आज 16 जणांची भर पडली असून रुग्णसंख्या 1 हजार 720 वर पोहोचली आहे.

रविवारी (ता.30) रात्री शासकीय प्रयोगशाळेकडून 26 तर खासगी प्रयोगशाळेकडून 22 असे एकुण 48 संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यातून शहरातील सुदर्शन वसाहतीमध्ये पहिल्यांदाच कोविडचा शिरकाव झाला. या वसाहतीमधील 54 वर्षीय इसमासह 25 वर्षीय तरुण, 45, 42 व 21 वर्षीय महिला, मालदाड रोडवरील 69, 58 व 54 वर्षीय इसमांसह 21 वर्षीय तरुण व 25 वर्षीय महिला, घोडेकर मळा भागातील 65 व 30 वर्षीय महिलेसह 12 व 4 वर्षीय बालक, साळीवाड्यातील 36 वर्षीय तरुण व 32 वर्षीय महिला, माळीवाड्यातील 52 वर्षीय इसमासह 45 वर्षीय तरुण, घासबाजारातील 47 वर्षीय इसम, पावबाकी रस्त्यावरील 23 वर्षीय तरुण, साईनगरमधील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, गणेशनगर परिसरातील 44 वर्षीय तर शिवाजीनगर परिसरातील 37 वर्षीय तरुणाला कोविडची लागण झाल्याचे समोर आले.

शहरातील 23 जणांसह तालुक्यातील 25 संशयितांचे अहवालही रविवारी पॉझिटिव्ह आले होते. तालुक्यातील कौठे धांदरफळ येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, ढोलेवाडी येथील 45 व 20 वर्षीय महिलांसह 20 वर्षीय तरुण, हिवरगाव पावसा येथील 40 व 26 वर्षीय तरुणासह 65 व 45 वर्षीय महिला, संगमनेर खुर्दमधील 22 व 18 वर्षीय तरुण, खराडी येथील 50 वर्षीय महिला, कोल्हेवाडी येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक व 41 वर्षीय तरुण, मनोली येथील 50 व 32 वर्षीय महिलांसह 59 व 52 वर्षीय इसम, सावरगाव तळ येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, गुंजाळवाडी शिवारातील गोल्डन सिटीमधील 32 वर्षीय महिला, 10 वर्षीय बालिका व सात वर्षीय बालक, साकूरमधील 57 वर्षीय महिला व 27 वर्षीय तरुण, कुरणमधील 52 वर्षीय इसम व घुलेवाडीतील 47 वर्षीय महिला बाधित असल्याचे त्यातून स्पष्ट झाले. त्यामुळे रविवारीच तालुक्यातील बाधितांनी सतरावे शतक ओलांडीत 1 हजार 704 संख्या गाठली होती.

आज त्यात पुन्हा सोळा रुग्णांची भर पडली आहे. आज शासकीय प्रयोगशाळेतील तीन खासगी प्रयोगशाळेतील तीन व रॅपिड एंटीजेन चाचणीतून दहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. खाजगी प्रयोगशाळेच्या अहवालातून शहरातील मालदाड रोड परिसरातील 39 वर्षीय तरुण, गणेशनगर परिसरातील 45 वर्षीय तरुण, घुलेवाडीतील 17 वर्षीय तरुणी, तर शासकीय प्रयोगशाळेच्या अहवालातून घोडेकर मळा परिसरातील 37 वर्षीय तरुणासह घुलेवाडी येथील 21 वर्षीय तरुण व ढोलेवाडी येथील 52 वर्षीय इसमाला कोविडची लागण झाली आहे.

प्रशासनाने आज केलेल्या रॅपिड एंटीजेन चाचणीतून घुलेवाडीतील 50, 47 व सतरा वर्षीय महिला 13 वर्षीय मुलाला तसेच चिंचपूर येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक चिकणी येथील 46, 33 व 26 वर्षीय तरुणांसह 31 वर्षीय महिला, तर बोटा येथील 45 वर्षीय तरुणाला संक्रमण झाल्याचे समोर आले आहे. तालुक्याच्या बाधित रुग्ण संख्येत आजही सोळा जणांची भर पडल्याने तालुक्यातील बाधितांचा आकडा 1 हजार 720 वर जाऊन पोहोचला आहे.

- तालुक्यातील एकुण बाधित संख्या 1 हजार 720
- तालुक्यातील एकुण सक्रीय संक्रमित रुग्ण 296
- आज रुग्णालयातून घरी परतलेल्या रुग्णांची संख्या 36
- आत्तापर्यंत पूर्णतः बरे होवून परतलेल्यांची संख्या 1 हजार 404
- तालुक्यातील रुग्ण बरे होण्याचे सरासरी प्रमाण 82.11 टक्के
- आत्तापर्यंत तालुक्यातील कोविडचे बळी 26
- कोविडने मृत्यु होण्याचा सरासरी दर 1.52 टक्के

- आत्तापर्यंत झालेल्या एकुण स्त्राव चाचण्या 7 हजार 93
- शासकीय प्रयोगशाळेत झालेल्या एकुण तपासण्या 2 हजार 899
- खासगी प्रयोगशाळेत झालेल्या एकुण तपासण्या 985
- रॅपिड अँटीजेनद्वारा करण्यात आलेल्या एकुण चाचण्या 3 हजार 209
- एकुण चाचण्यातून पॉझिटिव्ह समोर येण्याची सरासरी 24.10 टक्के

