पोलिसांनी राबविले ‘महामार्ग मृत्यूंजय दूत’ अभियान

नायक वृत्तसेवा, घारगाव
रस्ते अपघातातील जखमींना तत्काळ उपचार मिळावेत व मदत व्हावी. यासाठी शासनाने ‘मृत्यूंजय दूत’ यांची निर्मिती केली आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने संपूर्ण राज्यात ‘महामार्ग मृत्यूंजय दूत’ अभियान राबविण्याचे सूचित केले आहे. त्यानुसार सोमवारी (ता.1) संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील डॉ.राधेश्याम गुंजाळ वैद्यकीय महाविद्यालयाजवळ हे अभियान राबविण्यात आले.
![]()
डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्राच्यावतीने मृत्यूंजय दूत, शिक्षक, विद्यार्थी व डॉक्टरांना अपघातग्रस्तांना तत्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सर्व समावेशक माहिती असलेली छोटीशी पुस्तिका दिली. यामध्ये रुग्णवाहिका, रुग्णालयाचे ठिकाण व संपर्क क्रमांक उपलब्ध करुन दिले आहेत. यावेळी डॉ.सूरज ढगे यांनी अपघातानंतर जखमींना मदत करताना काय करावे आणि काय करु नये याचे प्रात्यक्षिक दाखविले. तसेच मृत्यूंजय दूत अभियान व स्व.बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेची सविस्तर माहिती दिली. यावेळी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे, नारायण ढोकरे, सुनील साळवे, अरविंद गिरी, कैलास ठोंबरे, उमेश गव्हाणे, संजय मंडलिक, भरत गांजवे, साईनाथ दिवटे, रमेश शिंदे, मनीष शिंदे, पंढरीनाथ पुजारी, नंदकुमार बर्डे, योगिराज सोनवणे, डॉ.राधेश्याम गुंजाळ महाविद्यालयाचे डॉ.सूरज ढगे, डॉ.ऊंडे, डॉ.मिंडे, डॉ.क्षीरसागर, गुंजाळवाडीचे सरपंच रवींद्र भोर, माजी सरपंच संदीप भागवत, प्रदीप गुंजाळ, धनंजय पेंडभाजे उपस्थित होते. सदर अभियान अप्पर पोलीस महासंचालक डॉ.भूषणकुमार उपाध्याय यांच्या संकल्पनेतून व पोलीस अधीक्षक संजय जाधव, पोलीस उपअधीक्षक प्रीतम यावलकर, अहमदनगर मंडल पोलीस निरीक्षक शंकर शिंदे, महामार्ग पोलीस विभाग पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले.
