संगमनेर तालुक्यातील जंगी विवाह सोहळे ठरत आहेत ‘सुपर स्प्रेडर’! तालुक्यातील अनेक दिग्गजांना कोविडची बाधा; तीन दिवसांत एकशे दहा रुग्णांची झाली वाढ..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यात निर्माण झालेली कोविडची संभाव्य दुसरी लाट अहमदनगर महापालिका क्षेत्रासह संगमनेर व राहाता तालुक्यावर आदळल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर शासनाने राज्यातील सार्वजनिक कार्यक्रमांना संपूर्ण बंदी घालण्यासोबतच विवाह सोहळ्यांच्या उपस्थितीवर मर्यादा आणल्या आहेत. मात्र समाजातील काही धनाढ्य व पांढरपेशातील व्यक्ति त्याकडे साफ दुर्लक्ष करीत असल्याने तालुक्यातील कोविडचा आकडा पुन्हा एकदा गतीत आला असून गेल्या तीनच दिवसांत तालुक्याच्या रुग्णसंख्येत 110 नवीन बाधितांची भर पडली आहे. त्यामुळे तालुक्यातील बाधितांची संख्या आता 6 हजार 928 वर जावून पोहोचली आहे.

गेल्या 17 फेब्रुवारीपासून संगमनेर तालुक्यातील कोविड संक्रमणात मोठी वाढ झाल्याचे निरीक्षण समोर आले आहे. मनाई असतानाही प्रमाणापेक्षा जास्त नागरिकांच्या उपस्थितीत साजरे होणारे विवाह सोहळे त्यामागचे मुख्य कारण असल्याचेही त्यातून समोर आले आहे. स्थानिक प्रशासनाने तालुक्यातील मंगल कार्यालये, लॉन्स व अन्य खासगी ठिकाणांच्या संचालकांना यापूर्वीच उपस्थितीबाबत नोटीसा बजावल्याने त्यांच्याकडून नियमांची सक्तीने अंमलबजावणी केली जात आहे. त्याचा परिणाम अनेक जणांकडून आधीच नोंदणी केलेली मंगल कार्यालये रद्द करुन चक्क आपल्या गावात, घरासमोर, शेतात अथवा एखाद्या धार्मिक स्थळी मांडव घालून सकाळीच जंगी सोहळ्यांचे आयोजन होत आहे.

गेल्या महिन्यात पालिकेतील एका पदाधिकार्‍याच्या घरातील लग्न सोहळ्यासह शहरातील एका मोठ्या व्यापार्‍याच्या घरातील लग्न सोहळा आणि चार दिवसांपूर्वी ग्रामीणभागात झालेला एक जंगी सोहळा तालुक्यात कोविडची दुसरी लाट आणण्यास कारणीभूत ठरला असल्याची जोरदार चर्चा संगमनेरात सुरु आहे. फेब्रुवारीच्या मध्यात तालुक्यातील कोविडचा प्रादुर्भाव अगदी एकेरीत आला होता. मात्र नियमांची पायमल्ली करुन झालेल्या यासह एका कार्यक्रमांने ‘सुपर स्पेडर’ची भूमिका बजावित तालुक्याला पुन्हा एकदा ‘लॉकडाऊन’च्या दिशेने लोटण्याचे काम केले आहे.

गेल्या तीन दिवसांत तालुक्यातील कोविडचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याचेही दिसून येत असून या कालावधीत तब्बल 110 रुग्णांची भर पडली आहे. शनिवारी (ता.27) एकूण 42 रुग्ण आढळले, त्यात शहरातील 19 तर ग्रामीणभागातील 23 जणांचा समावेश होता. रविवारी (ता.28) एकूण 27 रुग्ण समोर आले. त्यात शहरातील 17 व ग्रामीण भागातील 10 रुग्ण होते. तर आज (ता.1) एकूण 41 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, त्यात शहरातील 20 तर ग्रामीण भागातील 21 जणांचा समावेश आहे.

शनिवारी (ता.27) आढळलेल्या रुग्णांमध्ये शहरातील मेनरोड परिसरातील 52 वर्षीय इसम, साईबन कॉलनीतील 44 वर्षीय इसम, अकोले बायपास वरील 2 वर्षीय बालक, घासबाजारातील 34 वर्षीय महिलेसह चार वर्षीय बालिका, अभिनव नगरमधील 54 वर्षीय इसम, एकता चौकातील 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, नवीन नगर रस्त्यावरील 58 वर्षीय इसमासह 27 वर्षीय महिला, जनता नगरमधील 45 वर्षीय महिला, नगर पालिका रस्त्यावरील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, शिवाजीनगर मधील 66 वर्षीय महिला तर संगमनेर असा पत्ता नोंदविलेल्या 35, 23, 22, 21 व 19 वर्षीय महिला आणि 32 व 22 वर्षीय तरुणांना कोविडचे संक्रमण झाले आहे.

रविवारी (ता.28) शहरात एकूण सतरा रुग्ण आढळले. त्यात केवळ संगमनेर असा पत्ता असलेल्यात 66 वर्षीय महिला व 47 वर्षीय इसमासह मुळे गल्लीतील 25 वर्षीय तरुण, सय्यदबाबा चौकातील 54 वर्षीय इसमासह 45 वर्षीय महिला, चंद्रशेखर चौकातील 23 वर्षीय तरुण, मालदाड रोडवरील 20 वर्षीय तरुण, बाजारपेठेतील 73 वर्षीय ज्येष्ठासह 48 वर्षीय इसम, नेहरु चौकातील 39 वर्षीय महिला व मेनरोडवरील 40 वर्षीय तरुण बाधित झाला आहे.

आज (ता.1) प्राप्त झालेल्या अहवालातही शहरातील 20 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, त्यात घासबाजारातील 22 वर्षीय महिलेसह 32, 22 व 21 वर्षीय तरुण, मालदाड रोडवरील 53 वर्षीय इसम, मदिनानगर मधील 67 वर्षीय ज्येष्ठ नागरिक व 67 वर्षीय महिला, हिरे मळा येथील 38 वर्षीय महिला, देवी गल्लीतील 64 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, वकील कॉलनीतील 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 34 वर्षीय तरुण, अकोले बायपास रस्त्यावरील 52 वर्षीय इसम, जाणता राजा मैदान परिसरातील 37 वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

यासोबतच शनिवारी (ता.27) ग्रामीणभागातील 23 जणांना कोविडची लागण झाली. त्यात उंबरी बाळापूर येथील 27 वर्षीय तरुण, बोटा येथील 45 वर्षीय महिला, घुलेवाडीतील 55 वर्षीय इसम व 49 वर्षीय महिला, झोळे येथील 50 वर्षीय इसम, शेडगाव येथील 22 वर्षीय महिला, समनापूर येथील 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, संगमनेर खुर्दमधील 55 वर्षीय इसम, तळेगाव दिघे येथील 36 वर्षीय तरुण, वडगाव पान येथील 39 व 37 वर्षीय तरुण, निमगाव येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, पळसखेडे येथील 70 वर्षीय महिला, निमोण येथील 50 वर्षीय इसम, जोर्वे येथील 63 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 59 वर्षीय महिला, कासारे येथील 45 वर्षीय इसम, सारोळे पठार येथील 58 वर्षीय इसमासह 38 वर्षीय तरुण, सुकेवाडीतील 45 वर्षीय इसम, गुंजाळवाडी येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 65 वर्षीय महिला व खरशिंदे येथील 36 वर्षीय तरुण.

रविवारी (ता.28) ग्रामीण भागातील दहा जणांमध्ये कोल्हेवाडीतील 45 वर्षीय इसम, घुलेवाडीतील 45 वर्षीय इसमासह 24 वर्षीय महिला, अकलापूर येथील 49 वर्षीय इसम, पारेगाव येथील 40 वर्षीय तरुण, समनापूर येथील 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, चिखली येथील 78 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, पेमगिरी येथील 64 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, डोळासणे येथील 40 वर्षीय तरुण व कनोली येथील 55 वर्षीय महिला तर आज (ता.1) आढळलेल्या 21 जणांमध्ये वडगाव पान येथील 85 वर्षीय ज्येष्ठासह 51 वर्षीय इसम, सारोळे पठार येथील 50 वर्षीय महिला, वडगाव लांडगा येथील 53 वर्षीय इसम, प्रतापपूर येथील 44 वर्षीय इसम, हिवरगाव येथील 39 वर्षीय तरुण, चंदनापूरी येथील 58 वर्षीय इसम, लोहारे येथील 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिक,

घारगाव येथील 47 वर्षीय इसम, कौठे कमळेश्वर येथील 52 वर्षीय इसम, झरेकाठी येथील 27 वर्षीय तरुण, वेल्हाळे येथील 35 वर्षीय तरुण, चिकणी येथील 35 वर्षीय तरुण, हसनापूर येथील 82 वर्षीय महिला, पिंपळवाडी येथील 19 वर्षीय तरुण व एक वर्षीय बालिका, जवळे कडलग येथील 80 वर्षीय महिला, चिखली येथल 65 वर्षीय महिला आणि घुलेवाडीतील 52 व 35 वर्षीय महिलांसह 10 वर्षीय मुलगा बाधित झाला आहे. गेल्या तीन दिवसांत तालुक्यात एकूण 110 रुग्ण आढळले असून त्यात शहरातील 56 तर ग्रामीण क्षेत्रातील 54 जणांचा समावेश आहे. वाढलेल्या या रुग्णसंख्येने तालुक्यातील बाधितांचा आकडा आता 6 हजार 928 वर नेला आहे.


शासनाने विवाह सोहळ्यांसाठी फक्त पन्नास जणांच्या उपस्थितीची मर्यादा घातली आहे. मात्र अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करीत आपल्या आनंद सोहळ्यासाठी अनेकांचे जीव धोक्यात आणीत आहेत. विशेष म्हणजे मागील वर्षी तालुक्यातील कोविडचा प्रादुर्भाव वाढण्यासही अशा प्रकारचे लग्न सोहळे कारणीभूत ठरले होते, त्यातून कोणताही बोध न घेता तालुक्यात पुन्हा तोच प्रकार सुरु झाल्याने कोविडचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यातही अशा मोठ्या सोहळ्यांपासून लोकांना परावृत्त करण्याची जबाबदारी असणारे पांढरपेशेच या सोहळ्यांना हजर रहात असल्याने आयोजकांचा उत्साह वाढण्यासोबतच आता पांढरपेशांमध्येही कोविडचे संक्रमण वाढू लागले आहे.

Visits: 18 Today: 1 Total: 115507

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *