संगमनेर तालुक्याने ओलांडले बाधितांचे 38 वे शतक..! शहरातील रुग्णगती किंचित वाढली, तर ग्रामीण भागातील संक्रमण कायम..

नायक वृत्तसेवा, संगमनेर

महिन्याच्या सुरुवातीपासून काहीसे दिलासादायक चित्र दिसत असताना, गेल्या दोन दिवसातील चढत्या आकडेवारीने संगमनेरकरांच्या चिंतेत भर घातली आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना नियमांकडे होणारे दुर्लक्ष तालुक्यातील संक्रमणाला कारणीभूत असल्याचे निरीक्षण नोंदवताना दैनिक नायकने आजच्या विश्लेषणात ग्रामीण भागातील रुग्ण संख्येची सरासरी वाढत असल्याचे निदर्शनास आणले होते. आजच्या अहवालातून त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये अद्यापही कोविड विषयी गांभीर्य दिसून येत नसल्याने संक्रमणात सातत्य कायम आहे. आजच्या अहवालातूनही हे दिसून आले आहे. आज शहरी रुग्ण संख्येतही काहीशी वाढ झाल्याचे दिसून आले. आज तालुक्यातील 42 जणांचे अहवाल पॉझिटिव प्राप्त झाले. त्यातील तेरा अहवाल संगमनेर शहरातील आहेत. आजच्या रुग्णवाढीने  तालुक्यातील बाधितांचे  38 वे शतक पूर्ण झाले असून  रुग्णसंख्या  3 हजार 814 वर पोहोचली आहे.

 आजच्या एकूण रुग्णसंख्येत संगमनेर शहरातील 13 जणांचा समावेश आहे. त्यात मालदाड रोडवरील 64 व 47 वर्षीय इसम, रहेमतनगर परिसरातील 66 वर्षीय महिला, इंदिरानगर परिसरातील 59 वर्षीय महिला, गणेशनगर मधील 58 वर्षीय महिलेसह 28 वर्षीय तरुण, जनतानगर परिसरातील 52 वर्षीय इसमासह 24 वर्षीय तरुण, 48 वर्षीय महिला व सतरा वर्षीय तरुणी तर केवळ संगमनेर असा पत्ता नोंदवलेल्या तिघांचे अहवालही पॉझिटिव प्राप्त झाले आहेत.

आज तालुक्यातील ग्रामीण भागात 29 जणांचे अहवाल पॉझिटिव प्राप्त झाले. त्यात ओझर खुर्द येथील 28 वर्षीय तरुण, बोटा येथील 32 वर्षीय तरुण, भोजदरी येथील 67 व 50 वर्षीय इसमासह 45 वर्षीय महिला, कुरकुटवाडी येथील 40 वर्षीय महिला, झोळे येथील 43 वर्षीय महिला, चंदनापुरी येथील 32 वर्षीय तरुण, आंबी खालसा येथील 30 वर्षीय तरुण, 45 व 21 वर्षीय महिला, तसेच एक वर्षवर्षीय बालिका, पिंपळे येथील 55 वर्षीय महिला, डिग्रस येथील 35 वर्षीय तरुण, गुंजाळवाडीतील 36 वर्षीय तरुणासह निर्मलनगर परिसरातील 67 वर्षीय महिला, कोळवाडे येथील 45 वर्षीय महिलेसह 23 वर्षीय तरुण,

घुलेवाडी येथील 39 वर्षीय तरुण व 21 वर्षीय महिला, वरुडी पठार येथील 47 वर्षीय इसम, निमगाव जाळी येथील 58 वर्षीय इसम, राजापूर येथील 38 व 20 वर्षीय तरुण, पिंपळगाव कोंझिरा येथील 73 वर्षीय महिला, सारोळे पठार येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, कासारा दुमाला येथील 51 वर्षीय इसम, संगमनेर खुर्द मधील 66 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह हिवरगाव पावसा येथील 22 वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव प्राप्त झाला आहे. आज तालुक्याच्या रुग्णसंख्येत 42 रुग्णांची भर पडल्याने तालुक्याने बाधितांचे 38 वे शतक ओलांडून 3 हजार 814 रुग्णसंख्या गाठली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात आज ४५९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४७ हजार २९६ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील सरासरी प्रमाण आता ९२.०६ टक्के आहे. गेल्या चोवीस तासात जिल्ह्याच्या एकूण रुग्ण संख्येत ३६५ नव्या बाधितांची भर पडली. त्यामुळे आता जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ३ हजार २९० झाली आहे.

आज जिल्हा शासकीय प्रयोगशाळेकडून ८१, खाजगी प्रयोगशाळेकडून ६३ आणि रॅपिड अँटीजेन चाचणीतून २२१ रुग्ण समोर आले.

जिल्हा कोविड प्रयोगशाळेतून प्राप्त झालेल्या अहवालानुसार अहमदनगर महापालिका क्षेत्रातील ३३, जामखेड ०४, कर्जत ०३, नगर ग्रामीण ०३, नेवासा ०८, पारनेर ०२, श्रीगोंदा २१, लष्करी रुग्णालय येथील सात जणांना कोविडचे संक्रमण झाले आहे. 

खासगी प्रयोगशाळेकडूनही आज ६३ जणांचे अहवाल पॉझिटिव प्राप्त झाले. त्यातून अहमदनगर महापालिका क्षेत्र ३०, अकोले ०१, जामखेड ०१, कोपरगाव ०१, नगर ग्रामीण ०२, नेवासा ०५, पाथर्डी ०२, राहाता ०५, राहुरी ०२, शेवगाव ०६, श्रीगोंदा ०१, श्रीरामपूर ०५, लष्करी परिसरातील एक अशा एकूण ६३ जणांनाही लागण झाली आहे.

रॅपिड अँटीजेन चाचणीतून आज २२१ रुग्ण समोर आले. यात  महानगरपालिका क्षेत्रातील २७, अकोले १०, जामखेड १९, कर्जत १९, कोपरगाव १३, नगर ग्रामीण ०२, नेवासा १७, पारनेर १४, पाथर्डी २१, राहाता १३, राहुरी ०२, शेवगाव १३, श्रीगोंदा १२, श्रीरामपूर १०, लष्करी परिसरातील एका रुग्णाचा समावेश आहे.

आज जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर व कोविड केअर सेंटर मधून उपचार पूर्ण करणाऱ्या रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यात अहमदनगर महापालिका क्षेत्रातील  ५७, अकोले ३१, जामखेड ३६, कर्जत २४, कोपरगाव १५, नगर ग्रामीण २७, नेवासा १२, पारनेर २२, पाथर्डी ४५, राहाता ५४, राहुरी ०९, संगमनेर ३३, शेवगाव २५, श्रीगोंदा ३२, श्रीरामपूर १४, लष्करी परिसरातील ०१, लष्करी रुग्णालयातील १७ आणि इतर जिल्ह्यातील पाच जणांचा समावेश आहे.

  • जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांनी ओलांडला ४७ हजारांचा टप्पा..
  • बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या : ४७ हजार २९६..
  • जिल्ह्यात उपचार सुरु असलेले रुग्ण : ३ हजार २९०..
  • जिल्ह्यातील  आजवरचे  एकूण मृत्यू : ७८९..
  • जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या : ५१ हजार ३७५..
  • जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.०६ टक्के..
  • जिल्ह्यात आज ४५९ रुग्णांना डिस्चार्ज तर ३६५ बाधितांची नव्याने भर..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *