मुरुम तस्कराची महसूल कर्मचाऱ्यास दमदाटी..! सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांनी टाकले गजाआड..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
बेकायदा गौण खनिजाची वाहतूक करताना अटकाव करणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यास दमदाटी करून ट्रॅक्टर घेऊन पळून जाण्याची घटना तालुक्यातील राजापूर येथे घडली. याप्रकरणी संबंधितावर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी शरद नाना हासे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अटकेची प्रक्रिया सुरू आहे.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज शुक्रवारी (ता.29) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास राजापूर येथील इंदिरा पतसंस्थे समोरील रस्त्यावरून एक ट्रॅक्टर भरधाव वेगाने जात होता. ते पाहून महसूल कर्मचारी उमेश विठ्ठल देवगडे यांनी ट्रॅक्टर चालकास थांबवून तपासणी केली असता त्यात मुरूम भरलेला आढळून आला. त्याच्या वाहतुकीचा परवाना आहे का असा प्रश्न केला असता संबंधित इसमाने त्यांना धक्काबुक्की करीत शिवीगाळ केली. देवगडे यांनी त्याला ट्रॅक्टर तहसील कार्यालयात घेण्याची सूचना केली असता आरोपीने त्यांना धक्का देऊन ट्रॅक्टर घेऊन पळून गेला.

या घटनेनंतर सायंकाळी सातच्या सुमारास देवगडे यांनी याबाबत शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून, शहर पोलिसांनी संशयित आरोपी शरद नाना हासे (रा.राजापूर) याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याच्या कलम 353 सह भारतीय दंड संहितेच्या कलम 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याच्या अटकेची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी दिली.

Visits: 140 Today: 1 Total: 1099092
