वीरगावमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त 35 दात्यांचे रक्तदान
नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील वीरगाव येथील शहीद अमोल अस्वले चॅरिटेबल ट्रस्ट येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. यावेळी कोरोना संकटात अपुरा ठरत असलेला रक्त पुरवठा लक्षात घेऊन रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सुमारे 35 दात्यांनी रक्तदान करुन राष्ट्रीय कर्तव्य निभावले.
यावेळी माजी आमदार वैभव पिचड, जिल्हा परिषदेचे भाजप गटनेते जालिंदर वाकचौरे, माजी पंचायत समिती सदस्य अरुण शेळके, पोलीस सुनीता अस्वले, शहीद अमोल अस्वले यांचे वडील किसन अस्वले, शहीद अमोल अस्वले चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष गणेश अस्वले, सचिव रोहिदास तोरकड, सदस्य बाबासाहेब शेळके, पांडुरंग अस्वले, विश्वास भांगरे, निरंक कुमकर, गोकुळ अस्वले, योगेश भांगरे, गणेश थोरात, सचिन देशमुख, सतीष अस्वले, ज्ञानेश्वर शेळके, रोहिदास कुमकर, सुदाम तोरकड, भगवान अस्वले, नितीन राक्षे, महेश राक्षे, संदीप राक्षे, भीमराव मालुंजकर, ज्ञानेश्वर खुळे, पोपट अस्वले, गणेश कुमकर, रावसाहेब अस्वले, दशरथ कुमकर, मंगेश शेळके, अंकुश ढमाले, ग्रामपंचायत सदस्य संतोष अस्वले आदिंसह तरुण उपस्थित होते.