अखेर संगमनेर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर! 72 ग्रामपंचायतींमध्ये राहणार ‘महिला राज’ तर 30 ग्रामपंचायतींमध्ये मागासवर्गीय सरपंच


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संपूर्ण राज्याच्या ग्रामीण क्षेत्राचे लक्ष लागून असलेल्या बिगर अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीचे कामकाज आजपासून सुरु झाले. यात राज्यातील 24 हजार 972 ग्रामपंचायतींमधील सरपंचपदाच्या आरक्षणाच्या सोडती काढण्यात आल्या. यात संगमनेर तालुक्यातील 143 ग्रामपंचायतींचा समावेश असून 69 ग्रामपंचायतींना आरक्षण लागू झाले आहे. उर्वरीत 74 ग्रामपंचायतीचे सरपंचपद पुढील पाच वर्षे खुल्या गटासाठी आरक्षीत झाले आहेत, त्यातील पन्नास टक्के सरपंचपदे खुल्या वर्गातील महिलांसाठी राखीव करण्यात आली आहेत.


आज (ता.27) जिल्ह्यातील 1 हजार 218 ग्रामपंचायतीतील सरपंचपदासाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम सकाळी 11 वाजता सुरु झाला. संगमनेरातील मध्यवर्ती प्रशासकीय भवनात तालुक्यातील 143 ग्रामपंचायतींच्या सदस्यांच्या उपस्थितीत आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यानुसार अनुसूचित जातीसाठी 13 ग्रामपंचायती (6 महिला), अनुसूचित जमातीसाठी 17 ग्रामपंचायती (9 महिला), नागरिकांचा मागास प्रवर्ग 39 (20 महिला) व सर्वसाधारण गटासाठी 74 (37 महिला) अशा पद्धतीने आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.


सन 2011 साली झालेल्या जनगणनेतील लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार उतरत्याक्रमाने या सोडती जाहीर करण्यात आल्या. त्यात अनुसूचित जातीसाठी आरक्षीत झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये खळी, शिंदोडी, कासारे, मनोली, सारोळे पठार, माळेगाव हवेली, वेल्हाळे, कासारा दुमाला, सावरगाव घुले, रायते, देवकौठे, साकूर व हिवरगाव पठार या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. अनुसूचित जमातीसाठी शेंडेवाडी, चिकणी, सोनेवाडी, शेडगाव, पारेगाव खुर्द, आश्वी बु., निमज, कोठे खुर्द, कनोली, पिंपरणे, समनापूर, मिरपूर, जवळे कडलग, वडगाव लांडगा, सायखिंडी, चिखली व पोखरी हवेली या ग्रामपंचायती आरक्षीत झाल्या आहेत.


संगमनेर तालुक्यात नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 27 टक्के सरपंचपदे आरक्षीत आहेत. त्यानुसार 39 ग्रामपंचायती या प्रवर्गासाठी सोडणे आवश्यक आहे. त्यानुसार 1995 नंतर 2000 साली एकदाच आरक्षीत झालेल्या पुढील 23 ग्रामपंचायतींना या प्रवर्गासाठी थेट आरक्षीत करण्यात आले आहे. त्यात जवळे बाळेश्वर, अकलापूर, डिग्रस, पानोडी, पळसखेडे, चिंचोली गुरव, चिंचपूर बु., लोहारे, औरंगपूर, वरवंडी, देवगाव, म्हसवंडी, डोळासणे, रहिमपूर, कौठे कमळेश्वर, पिंपळे, कोकणगाव, निमगाव जाळी, सुकेवाडी, शिबलापूर, करुले, राजापूर व तळेगाव या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.


तर सन 2005 मध्ये या प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या कोळवाडे, कौठे मलकापूर, वनकुटे, माळेगाव पठार, घारगाव, खांबे, झरेकाठी, प्रतापपूर, चंदनापूरी, चणेगाव, मेंढवण, कुरण, जाखूरी, वडगावपान, सावरचोळ, पिंपळगाव माथा, कोंची-मांची, बोटा, जांबूत बु., कर्जुले पठार, जोर्वे, आश्वी बु., आश्वी खुर्द, धांदरफळ खुर्द, घुलेवाडी, मंगळापूर, पारेगाव बु., वडझरी बु., बिरेवाडी, शिरापूर व झोळे या 31 ग्रामपंचायतींमधून सोडतीद्वारे (चिठ्ठ्या टाकून) राहिलेल्या 16 ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली. माळेवाडी येथील ओवी भारत शिंदे या अकरा वर्षांच्या बालिकेने काढलेल्या चिठ्ठ्यातून खांबे, कोळवाडे, कुरण, वनकुटे, मेंढवण, बोटा, कौठे कमळेश्वर, धांदरफळ खुर्द, पारेगाव बु., घारगाव, झोळे, चंदनापूरी. कोंची-मांची, मंगळापूर, चणेगाव व माळेगाव पठार या उर्वरीत सोळा ग्रामपंचायतींना नागरिकांचे मागास प्रवर्ग आरक्षण जाहीर करण्यात आले.


वरीलप्रमाणे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्ग वगळता उर्वरीत 74 ग्रामपंचायती खुल्या वर्गासाठी जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यात दरेवाडी, खरशिंदे, मिर्झापूर, सावरगाव तळ, सोनोशी, तिगांव, निमगाव बु., गुंजाळवाडी, रायतेवाडी, निमगांव खुर्द, कौठे धांदरफळ, हिवरगाव पावसा, दाढ खुर्द, वरुडी पठार, कर्‍हे, मालदाड, खांडगाव, खांजापूर, निमगाव टेंभी, शिरसगाव धुपे, आंबी खालसा, मांडवे बु., नांदूरी दुमाला, रणखांबवाडी, आंबी दुमाला, सादतपूर, खंदरमाळवाडी, पोखरी बाळेश्वर, नांदूर खंदरमाळ, उंबरी बाळापूर, संगमनेर खुर्द, नान्नज दुमाला, वडझरी खुर्द, कोल्हेवाडी, मालुंजे, पिंपळगाव कोंझिरा, निमोण,


वाघापूर, सांगवी, काकडवाडी, धांदरफळ बु., निमगाव भोजापूर, निंबाळे, निळवंडे, जांभूळवाडी, पिंप्री लौकी-आझमपूर, कनकापूर, पिंपळगाव देपा, हंगेवाडी, पेमगिरी, अंभोरे, कोठे बु., बोरबनवाडी, खराडी, कुरकुंडी, कुरकुटवाडी, भोजदरी, महालवाडी, ओझर बु., वडझरी बु., कर्जुले पठार, जांबूत बु., बिरेवाडी, वडगावपान, आश्वी खुर्द, प्रतापपूर, सावरचोळ, शिरापूर, घुलेवाडी, ओझर खुर्द, जोर्वे, जाखुरी, पिंपळगाव माथा व झरेकाठी या 74 ग्रामपंचायती खुल्या गटासाठी जाहीर झाल्या आहेत.


सरपंचपदाच्या एकूण 143 जागांपैकी पन्नास टक्के म्हणजे 72 जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. त्यात अनुसूचित जातीसाठी खळी, वेल्हाळे, रायते, सावरगाव घुले, शिंदोडी व सारोळे पठार ग्रामपंचायत. अनुसूचित जमातीसाठी शेंडेवाडी, चिकणी, सोनेवाडी, पारेगाव खुर्द, आश्वी बु., निमज, समनापूर, जवळे कडलग, सायखिंडी, चिखली व पोखरी हवेली. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी म्हसवंडी, रहिमपूर, पिंपळे, निमगाव जाळी, तळेगाव, कोंची-मांची, धांदरफळ खुर्द, पारेगाव बु., देवगाव, औरंगपूर, डोळासणे, कौठे कमळेश्वर, कोकणगाव, सुकेवाडी, राजापूर, बोटा, मंगळापूर, झोळे, वरवंडी व कोळवाडे या 20 ग्रामपंचायती आरक्षीत झाल्या आहेत.


सर्वसाधारण महिला गटासाठी आरक्षीत झालेल्या 37 ग्रामपंचायतींमध्ये हंगेवाडी, मालुंजे, जांभुळवाडी, पेमगिरी, ओझर खुर्द, अंभोरे, कुरकुटवाडी, धांदरफळ बु., आश्वी खुर्द, नान्नज दुमाला, जोर्वे, भोजदरी, शिरापूर, बोरबनवाडी, वडझरी बु., पिंपळगाव देपा, निमगाव भोजापूर, संगमनेर खुर्द, कनकापूर, पिंपळगाव माथा, निंबाळे, उंबरी बाळापूर, कोल्हेवाडी, ओझर बु., पिंपळगाव कोंझिरा, वाघापूर, कुरकुंडी, जांबुत बु., निळवंडे, पिंप्री लौकी- आझमपूर, कुर्जले पठार, सावरचोळ, खराडी, बिरेवाडी, घुलेवाडी, काकडवाडी व महालवाडी या 37 ग्रामपंचायतींचे सरपंचपद महिलांसाठी राखीव झाले आहे.

गेल्या 15 जानेवारी रोजी संगमनेर तालुक्यातील 94 ग्रामपंचायतीच्या निवडणूका पार पडल्या होत्या. मात्र सरपंचपदाचे आरक्षण खोळंबल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून संपूर्ण तालुक्याला याच दिवसाची प्रतिक्षा होती. निवडणूका झालेल्या व पुढे होणार्‍या ग्रामपंचायतींचे आरक्षणही आजच जाहीर झाल्याने आता गावागावात पुन्हा एकदा नव्याने निवडून आलेल्या सदस्यांची लगबग अनुभवायला मिळणार आहे.

Visits: 34 Today: 1 Total: 117453

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *