‘तक्षशिला’ अभ्यासिकेतील तीन विद्यार्थ्यांचे सुयश
नायक वृत्तसेवा, अकोले
येथील सीताराम पा. गायकर प्रतिष्ठान संचलित तक्षशिला स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेतील तीन विद्यार्थ्यांनी सुयश मिळवले आहे. नुकताच त्यांचा जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
अनेक विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेऊन तक्षशिला अभ्यासिकेच्या माध्यमातून अकोले शहरात अहमदनगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणार्या सीताराम पा. गायकर प्रतिष्ठानने खुले व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. या अभ्यासिकेचे विद्यार्थी कोतूळ येथील अर्जुन देवकर याची सी. आर.पी.एफ.मध्ये, मुथाळणे येथील दीपक बेनके व बहिरवाडी येथील सूरज बंगाळ यांची बी.एस.एफ.मध्ये निवड झाली आहे. या सुयशाबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कारखान्याचे संचालक राजेंद्र डावरे, सामाजिक कार्यकर्ते शांताराम धुमाळ, युवा सामाजिक कार्यकर्ते नीलेश गायकर, पत्रकार गणेश आवारी, अॅड.अनिकेत चौधरी, माजी उपसरपंच श्याम वाकचौरे, युवक कार्यकर्ते सतेज गायकर, सामाजिक कार्यकर्ते अनिकेत आवारी, पोलीस पाटील दत्तात्रय वाकचौरे, पत्रकार सचिन खरात आणि अभ्यासिकेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.