नाभिक महासंघाच्या संगमनेर तालुकाध्यक्षपदी बिडवे

नाभिक महासंघाच्या संगमनेर तालुकाध्यक्षपदी बिडवे
तर सलून असोसिएशनच्या अध्यक्षपदी वाघ यांची निवड
नायक वृत्तसेवा, संगमनेर
राष्ट्रीय नाभिक एकता महासंघाच्या संगमनेर तालुका अध्यक्षपदी साईभक्त किशोर बिडवे यांची तर सलून असोसिएशनच्या अध्यक्षपदी बाळासाहेब वाघ यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.


राष्ट्रीय अध्यक्ष भगवान बिडवे नुकतेच अहमदनगर दौर्‍यावर आले असता घुलेवाडी येथे झालेल्या नाभिक समाज बैठकीत या निवडी करण्यात आल्या. राष्ट्रीय नाभिक एकता महासंघाच्या माध्यमातून आपणास समाज एकसंघ करुन समाजाच्या सर्व अडचणी दूर करायच्या आहेत. समाजाने समाजाच्या अडचणी, गरजा समजावून घ्यावे असे आवाहनही राष्ट्रीय अध्यक्ष बिडवे यांनी मार्गदर्शनपर भाषणात केले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष किरण बिडवे, सरचिटणीस मनोज वाघ, सुभाष बिडवे, किरण बिडवे यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडीबद्दल सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक क्षेत्रातील असंख्य मान्यवरांनी अभिनंदन केले आहे. लवकरच तालुका कार्यकारिणी जाहीर केली जाईल असे नवनिर्वाचित अध्यक्षांनी सांगितले. शेवटी गणेश बिडवे यांनी सर्वांचे अभार मानले. बैठक यशस्वीतेसाठी राजेंद्र कोल्हाळ, रवींद्र भराडे, सागर बोर्‍हाडे, केवल मंडळ, राजेंद्र गायकवाड, मंगेश सस्कर, प्रमोद जाधव, प्रकाश बिडवे, गणेश बिडवे, सचिन सस्कर, प्रसाद सस्कर, गणेश जाधव, मनोज जाधव, संजय जाधव, ओंकार बिडवे, साईश बिडवे, आशिष बिडवे, सुधीर बिडवे, शिवशंकर सस्कर, सनी सस्कर, विनोद सस्कर, शेखर सस्कर, नागेश शिंदे, शुभम कदम, ज्ञानेश्वर कदम, सागर भालेकर, अनिल भालेकर, सुनील भालेकर, आकाश वाघ, राजेंद्र वाघ, शरद बिडवे, किरण मदने आदिंनी परिश्रम घेतले.

Visits: 124 Today: 1 Total: 1098838

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *