लॉकडाऊनमध्ये राजाभाऊ कुटेंनी विघ्नहर्ता पॅलेसचा कायापालट केला ः कुटे
नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोरोना महामारीच्या काळात करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवसायांवर मोठे संकट आले होते. या लॉकडाऊनचा सदुपयोग करत राजाभाऊ कुटे यांनी आपली कल्पकता वापरत विघ्नहर्ता पॅलेसचा कायापालट केला असल्याचे गौरवोद्गार दूधगंगा पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब कुटे यांनी काढले.
पुढे बोलताना कुटे म्हणाले, कोरोना महामारीच्या काळामध्ये मंगल कार्यालयात लग्न करायचे नाही असे आदेश सर्वच मंगल कार्यालय चालकांना देण्यात आले होते. त्यामुळे सर्वच मंगल कार्यालय चालकांवर मोठे संकट आले होते. मात्र या संकटाच्या काळामध्ये करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा राजाभाऊ कुटे यांनी सदुपयोग करून त्यांनी आपली कल्पकता वापरत आकर्षक लॉन्स बनविले आहे. त्यांचे वडील बाळासाहेब कुटे व माता कुसुमताई यांनी राजाभाऊवर चांगले संस्कार केल्याने त्यांची वाटचाल प्रगतीकडे जात असल्याचे कुटे म्हणाले.
याप्रसंगी दूध संघाचे ज्येष्ठ संचालक लक्ष्मण कुटे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष रामदास वाघ यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी कारखान्याचे संचालक दादासाहेब कुटे, माजी संचालक बाळासाहेब शिंदे, अमृत चिक्सचे नामदेव काशिद, अण्णासाहेब थोरात, विजय डहाळे, सुनील उकिर्डे, अण्णासाहेब गुंजाळ, सुनील शिंदे, संभाजी थोरात, रामनाथ कुटे, अनिल थोरात, संग्राम ठोंबरे, मधुकर काळे, नामदेव थिटमे, शिवाजी सातपुते, अण्णासाहेब गुंजाळ, गुलाब कुटे, तुकाराम कुटे, एस.बी. गुंजाळ, संजय कुटे, भागवत कुटे, विघ्नहर्ता मंगल कार्यालय व लॉन्सच्या व्यवस्थापनामध्ये काम करणारे सतीश गिते, महेश भुसाळ, सोमनाथ काकड, रवींद्र साळवे, दत्तू वाघ, झंकार बँडचे युसूफ भाई, अण्णासाहेब रहाणे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन नीलेश पर्बत यांनी केले तर आभार अमृत चिक्सचे नामदेव काशिद यांनी मानले.