वैकुंठ गमन समितीकडून गायकर कुटुंबाला एक लाखाची मदत
नायक वृत्तसेवा, अकोले
जगद्गुरु श्री संत तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी (३७५ वर्ष) सदेह वैकुंठ गमन सोहळा समिती ओतूर व
वारकरी संप्रदायाच्या वतीने वीर जवान संदीप गायकर यांच्या कुटुंबीयांना एक लाख रुपयाचा कृतज्ञता निधी सुपूर्द करण्यात आला.

तालुक्यातील करंडी (ब्राह्मणवाडा) गावचे सुपुत्र शहीद जवान संदीप पांडुरंग गायकर हे २२ मे २०२५ रोजी जम्मू-काश्मीरमधील किस्तवाड येथे दहशतवादविरोधी कारवाई दरम्यान शहीद झाले. यावेळी अकोले तालुका माजी सैनिक संघटनेच्या वतीने,शहीद संदीपच्या बलिदानास सलाम करतांना त्यांच्या कुटुंबासमवेत संघटनेच्या पाठबळाचा पुनर्निर्धार व्यक्त केला व शहीद संदीप यांना परत आणता येणार नाही, पण त्यांच्या कुटुंबामागे ठामपणे उभं राहणे आपले कर्तव्य असल्याचे सांगितले.

जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी (३७५) सदेह वैकुंठ गमन सोहळा समिती श्रीक्षेत्र ओतुर येथे पार पडला. यावेळी झालेल्या कीर्तनात गुरु बंडातात्या कराडकर यांनी आपण देशभक्तांची कृतज्ञता म्हणून काही देणे लागतो म्हणून सप्ताह पार पडल्यावर निधी शिल्लक राहिल्यास देशाच्या सैन्यासाठी आपण काही निधी समर्पित करावा असे आवाहन या सप्ताहाचे संयोजक मंडळाला आवाहन केले, त्या आवाहनाला प्रतिसाद देत सप्ताहाचे मुख्य मार्गदर्शक ज्ञानेश्वर महाराज कदम यांनी ते मान्य केले. दीपक महाराज देशमुख ,राजेंद्र महाराज सदगीर, चंद्रकांत महाराज चौधरी यांनी हा निधी सरकारला देण्या ऐवजी सप्ताहाच्या कार्यक्षेत्रातच दहशतवाद्यांसोबत लढताना वीरगतीला प्राप्त झालेल्या वीर जवानाच्या परिवाराला द्यावा, या केलेल्या सूचनेप्रमाणे छोटे कदम माऊली यांनी ती रक्कम परिवाराला सुपूर्द करण्याची सूचना केली. गंगाराम महाराज डुंबरे, राजेंद्र महाराज सदगीर,दीपक महाराज देशमुख, विनायक तांबे, बाळासाहेब गायकर यांच्या हस्ते जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे व आमदार डाॅ.किरण लहामटे यांचे उपस्थितीत वीरमाता सरुबाई, वीरपिता पांडुरंग व वीरपत्नी दिपाली गायकर यांचे कडे एक लाख रुपयाचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. इंद्रभान कोल्हाळ,संकेत महाराज आरोटे,नितीन महाराज देशमुख,संदीप महाराज थोरात, भीमराव महाराज हांडे यांनी संगीत प्रवचनातून देशभक्तीपर गीतांच्या माध्यमातून वीर जवान संदीप गायकर यांना श्रद्धांजली समर्पित केली.

सैनिकांच्या समर्पण व त्यागामुळेच देव, देश आणि धर्माचे कार्य करता येत असते. आणि म्हणून त्यांच्या प्रतीची कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने वीर जवान संदीप गायकर यांच्या पश्चात कुटुंबाला आधार म्हणून वारकरी संप्रदायाच्या वतीने ही मदत नाही तर देशभक्ता प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

Visits: 136 Today: 1 Total: 1101939
