नेवाशामध्ये गणपती सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

नेवाशामध्ये गणपती सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
नायक वृत्तसेवा, नेवासा
नेवासा शहर भारतीय जनता पक्षाच्यावतीने घरगुती गणपती सजावट स्पर्धेचे विनाशुल्क आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे शहराध्यक्ष मनोज पारखे यांनी सांगितले.


या घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 2 हजार 501, द्वितीय पारितोषिक 1 हजार 501, तृतीय पारितोषिक 1 हजार 01 असे ठेवण्यात आले आहे. शहरात राहणार्‍या नागरिकांसाठीच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे पारखे यांनी सांगितले. तरी शहरातील स्पर्धकांनी सजावट केलेल्या घरगुती गणेशोत्सवाचे फोटो नाव, संपर्क क्रमांक, पत्त्यासहीत 8484018988, 9921365505, 8983353584 या मोबाईल क्रमांकावरील व्हाट्सअ‍ॅपवर पाठवावेत असे आवाहनही त्यांनी केले आहे. डेकोरेशनचा फोटो हा फ्रंट फोटो असावा सेल्फी नसावा, फोटोत फक्त मूर्ती व डेकोरेशन असावे, प्रत्येक स्पर्धकाचा एकच फोटो ग्राह्य धरण्यात येईल, स्पर्धेचा निकाल 2 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

Visits: 117 Today: 1 Total: 1121057

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *