राहुरी परिसरात धमकी देत शिक्षिकेवर अत्याचार

राहुरी परिसरात धमकी देत शिक्षिकेवर अत्याचार
नायक वृत्तसेवा, राहुरी
राहुरी परिसरात राहणार्‍या राहणार्‍या एका 30 वर्षीय शिक्षिकेला बदनाम करण्याची धमकी देऊन तिच्यावर राहत्या घरात अत्याचार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या घटनेने शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.


लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील आरोपी धीरज रामराव नाईकवाडे याने वेळोवेळी पीडित शिक्षिकेला तुझा भाऊ, बहीण, आई यांना जीवे ठार मारेल अशी धमकी देत बदनामी देखील असे धमकावून वेळोवेळी राहुरी परिसरातील घरी, पैठण तालुक्यातील भाड्याच्या खोलीत, शिर्डीमधील लॉजवर नेऊन 2011 ते सप्टेंबर 2019 पर्यंत अत्याचार केला. अखेर वैतागलेल्या पीडित शिक्षिकेने राहुरी पोलिसांत बुधवारी (ता.26) तक्रार दिली. सदर तक्रारीत पीडितेने म्हंटले की, शिक्षक बँकेचा सात लाख रुपयांचा धनादेशही माझ्याकडून घेतला आहे. यावरुन पोलिसांनी आरोपी धीरज नाईकवाडे याच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मुकूंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक बागुल हे करत आहेत.

Visits: 161 Today: 1 Total: 2166039

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *